ADVERTISEMENT
home / Recipes
chia seeds benefits in marathi

वजन कमी करण्यासाठी चिआ सीड्स खाण्याचे फायदे (Chia Seeds Benefits In Marathi)

वजन कमी करण्यासाठी कितीतरी वेगळे प्रयत्न केले जातात. अनेक जण डाएटसुद्धा करतात. आत तुमच्या डाएटमध्ये तुम्ही आणखी एका गोष्टीचा समावेश केला त्यामुळे तुमचे वजन कमी होईल असे कोणी सांगितले तर…. हो अशी एक गोष्ट आहे ज्याचा आहारात समावेश केल्यामुळे तुमचे वजन कमी होऊ शकते. बाजारात हल्ली नव्याने मिळणारी गोष्ट म्हणजे  chia seeds. याच्या नित्यसेवनामुळे तुम्ही तुमचे वाढलेले वजन अगदी आरामात कमी करु शकता.आता अनेकांना chia seeds आणि सब्जा हा एकच वाटतो. पण chia seeds आणि सब्जा हे दोन्ही वेगळे आहेत. दोघांच्याही रंगामध्ये तुम्हाला फरक जाणवेलच.  सब्जा हा अगदी बारीक बारीक असतो. chia seeds चा आकार थोडासा अंडाकृती असून तो सब्जाच्या तुलनेमध्ये थोडा मोठा असतो. सब्जा पाण्यात टाकल्यानंतर अगदी काहीच वेळात छान फुगतो. पण chia seeds पाणी शोषण्यासाठी थोडा वेळ घेते. सब्जामध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते. तर chia seeds मध्ये फायबर त्यामुळे या दोघांचेही गुणधर्म फार वेगळे आहेत. अशा या चिआ सीड्सचे फायदे (chia seeds benefits in marathi) लक्षात घेत त्यापासून वेगवेगळ्या रेसिपी तयार करता येऊ शकतात. जाणून घेऊया अशाच काही रेसिपीज.

चिआ सीड्स खाण्याचे फायदे (Chia Seeds Benefits In Marathi)

चिआ सीड्सचा आहारात समावेश करण्याआधी त्याचे फायदे काय (benefits of chia seeds in marathi) हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. 

  1. चिआ सीड्समध्ये मोठ्या प्रमाणात न्युट्रिएटंस असतात आणि फारच कमी प्रमाणात कॅलरीज असतात.
  2. चिआ सीड्समध्ये मोठ्या अँटीऑक्सिडंट असतात.
  3. चिआ सीड्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात फायबर असते.
  4.  चिआ सीड्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते. 
  5. चिआ सीड्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात ओमेगा 3 नावाचे फॅटी अॅसिड असते. 
  6. ह्रदयरोगांना दूर ठेवण्याचे कामही चिआ सीड्स करते.
  7.  हाडांना बळकट करण्याचे काम चिआ सीड्स करते 
  8.  रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याचे काम ही चिआ सीड्स करते

चिआ सीड्समधील पोषकत्वे (Nutritional Value Of Chia Seeds)

Nutritional Value Of Chia Seeds

चिआ सीड्स आरोग्यासाठी (chia seeds meaning in marathi) चांगले आहे असे म्हणताना त्यामध्ये नेमके कोणते चांगले घटक असतात हे जाणून घेणे देकील फारच गरजेचे असते. 

चिआ सीड्समधील पोषकतत्वे 

फायबर (Fiber) : 11 ग्रॅम्स
प्रोटीन( Proteins):  4 ग्रॅम्स 
फॅट (Fat) : 9 ग्रॅम्स 
कॅल्शिअम (Calcium) :  18 ग्रॅम्स 
मॅग्नीज (Magnese):30 %
मॅग्नेशिअम (Magnesium) : 30 %
फॉस्फरस (Phosphorus):  27 %

या शिवाय यामध्ये पोटॅशिअम, झिंक,  व्हिटॅमिन B3, B1, B2 हे घटकही असतात..

ADVERTISEMENT

वजन कमी करण्यासाठी चिआ सीड्स रेसिपी (Chia Seeds For Weight Loss In Marathi)

तुम्हाला चिआ सीड्सपासून रेसिपी तयार करायची असेल तर (Weight Loss With Chia Seeds In Marathi) या काही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करु शकता. चिआ सीड्स न्युट्री बार

चिआ सीड्स न्युट्री बार (Chia Seeds Nutrition Bar)

चिआ सीड्सचा उपयोग करुन तुम्हाला छान न्युट्रीबार तयार करता येतात. मधल्या वेळेत किंवा तुम्हाला काहीतरी गोड किंवा अरबट चरबट खायची इच्छा होत असेल त्यावेळी तुम्ही चिआ सीड्स न्युट्री बार खाऊ शकता.

साहित्य:
2 मोठे चमचे चिआ सीड्स, भोपळा, खरबूजच्या बिया, बदामाचे काप, ओले खजूर, लाह्या.

कृती :
खजूराची पेस्ट करुन घ्या. चिआ सीड्स, भोपळा, खरबूजाच्या बिया आणि बदामाचे काप चांगले रोस्ट करुन घ्या.
वाटलेल्या खजूराच्या पेस्टमध्ये रोस्ट केलेल्या सगळ्या गोष्टी घाला.
एका प्लेटमध्ये तुपाचा किंवा बटरचा हात लावून त्यावर हे सारण थापून घ्या.
वाळल्यानंतर याच्या वड्या पाड्या. तुमचे चिआ सीड्स न्युट्री बार तयार. 

डिटॉक्स वॉटर (Detox Water)

Detox Water

वजन कमी करणाऱ्यांना Detox water काही नवीन नाही.आता chia seeds चा वापर करुन हे पाणी कसे बनवायचे ते पाहुया. 

ADVERTISEMENT

साहित्य: 1 कप पाणी, 1मोठा चमचा chia seeds, लिंबाचा रस, मध, (आवडत असल्यास स्ट्रॉबेरी किंवा किवी)

कृती: एका काचेच्या भांड्यात एक कप पाणी घेऊन त्यात 1 मोठा चमचा chia seeds घाला. त्यात थोडे मध आणि चिरलेली फळ घालून मिश्रण रात्रभर ठेऊन द्या. सकाळी हे पाणी तुम्ही प्या. तुमचे detox water तयार

वजन कमी करण्याआधी लक्षात ठेवा या महत्वाच्या गोष्टी

हेल्दी रताळी (Sweet Potatoes And Chia Seeds)

Sweet Potatoes And Chia Seeds

साहित्य: रताळी, chia seeds, तुमच्या आवडीचे बटर (पीनट बटर आवडत असल्यास उत्तम. मीठ

ADVERTISEMENT

कृती: रताळी भाजून किंवा उकडून घ्या. गरमा गरम रताळी बाहेर काढून त्याला मध्ये एक काप त्या. त्यावर मीठ, बटर आणि chia seeds घालून तुम्ही ते रताळे खाऊ शकता. तुमच्या ब्रेकफास्टमध्ये तुम्ही ही रेसिपी खाऊ शकता.

तुम्ही बटाटाही अशा पद्धतीने खाऊ शकता.

या कारणामुळे महिलांनी आवर्जून खायला हवे चॉकलेट

Chia Seeds ड्रायफ्रुट एनर्जी बार

ड्रायफ्रुट एनर्जी बार

साहित्य:  मिक्स ड्रायफ्रुट, गूळ, chia seeds

ADVERTISEMENT

कृती: ड्रायफ्रुट भाजून घ्या. chia seeds वेगळे भाजून घ्या. गुळाचा एकतारी पाक तयार करुन त्यात ड्रायफ्रुट आणि chia seeds घालून त्याचे बार किंवा गोळे करुन लाडू  बनवून घ्या. तुम्हाला काहीही बाहरचे खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही chia seeds ड्रायफ्रुट एनर्जी बार खाऊ शकता. 
या पावसाळ्यात करा कडधान्यांच्या हेल्दी रेसिपी

Chia Seeds पुडींग

Chia Seeds पुडींग

chia seeds चा वापर फक्त टॉपिंग किंवा सजवण्यासाठी केला जात नाही तर त्यापासून काही गोडाचे पदार्थही केले जातात यापैकीच एक आहे पुडींग हा प्रकार. वजन कमी करणे म्हणजे गोड बंदच करणे असे होत नाही. तर तुम्ही chia seeds घालून केलेले पुडींग चविष्ट आणि हेल्दी असते. 

साहित्य: chia seeds, दुध, आवडतं फळ, मॅपल सिरप किंवा मध 

कृती: आदल्या रात्री दुधात chia seeds भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी तुमच्या आवडीच्या फळाचा क्रश तयार करुन तुम्ही ज्या भांड्यात पुडींग सेट करणार त्यात तो क्रश घाला. भिजवलेले chia seeds आणि बर फळांचे तुकडे घालून पुडींग थंड करा आणि मस्त पुडींगचा आस्वाद घ्या. 

ADVERTISEMENT

चिआ सीड्स शिकंजी (Chia Seeds Shikanji)

(Chia Seeds Shikanji
सौजन्य: Instagram

वजन कमी करायचं आहे आणि काहीतरी मस्त थंडगार आणि चटपटीत प्यायचं असेल तर तुम्ही चिआ सीड्स शिकंजी घरीच बनवून पिऊ शकता. ही शिकंजी तुम्हाला मस्त आवडेल. 

साहित्य:  चिआ सीड्स, पुदिन्याची पाने, चाट मसाला, लिंबाचा रस, बर्फाचे खडे

कृती : एका ग्लाासमध्ये बर्फ घेऊन त्यात लिंबाचा रस, चाट मसाला, मीठ, पुदिन्याची काही पाने, चिआ सीड्स, जलजिरा पावडर घाला. त्यात मस्त पाणी घाला. छान ठवळून त्याचा आनंद घ्या.यामुळे तोंडाची चव आणि पोटाचा घेर दोन्ही कमी होईल.

वाचा – खसखसचा उपयोग कसा करावा

ADVERTISEMENT

स्ट्रॉबेरी लस्सी (Strawberry Lassi)

Strawberry Lassi
सौजन्य: Instagram

लस्सी प्यायला आवडत असेल तर त्याला थोडा हेल्दी टच देऊन तुम्हाला मस्त अशी स्ट्रॉबेरी लस्सी करता येईल.

साहित्य:  फेटलेले दही, साखर, स्ट्रॉबेरीचा क्रश, चिआ सीड्स, बर्फाचे खडे, मीठ

कृती:
दही आणि साखर चांगले फेटून घ्या. त्यामध्ये स्ट्रॉबेरी क्रश घाला.
लस्सी किती पातळ हवी त्यानुसार त्यात पाणी किंवा बर्फ घाला.
त्यात किंचित मीठ घालून चिआ सीड्स घालून लस्सी चांगली फेटून घ्या
या मस्त लस्सीचा आनंद घ्या

चिआ सीड्स खीर (Quinoa Kheer)

Quinoa Kheer
सौजन्य : Instagram

चिआपासून तुम्ही खीरही बनवू शकता ही खीरही फार सुंदर लागते आणि पोटभरीची होते
.
साहित्य: ¼ कप चिआ सीड्स, अर्धा लीटर दूध, साखर चवीनुसार, वेलची पूड, काही ड्रायफ्रुट्स

कृती: एका भांड्यात चिआ सीड्स घेऊन त्यामध्ये चिआ सीड्स भिजतील एवढेच दूध घाला.
एका पॅनमध्ये तूप गरम करुन त्यामध्ये ड्रायफ्रुटस भाजून घ्या. एका पातेल्यात दूध उकळून घ्या.
त्यामध्ये साखऱ आणि केशराच्या काड्या घालून छान दूधाला आदाण आणा.
आता गॅस बंद करुन त्यामध्ये भिजवलेले चिआ सीड्स घालून एकजीव करा. ड्रायफ्रुट्स घालून पुन्हा उकळी आणा. तुमची चिआ सीड्स खीर तयार.

चिआ सीड्स कोशिंबीर (Chia Seeds Koshimbir)

कोशिंबीर खायला आवडत असेल तर तुम्ही चिआ सीड्सचा उपयोग करुनही चिआ सीडस् घालू शकता.

साहित्य: काकडी, टोमॅटो, लेट्युसची पाने, ऑलिव्ह ऑईल, मीठ, चिआ सीड्स

ADVERTISEMENT

कृती: एका भांड्यात बारीक केलेली काकडी, टोमॅटो, लेट्युसची पाने, मीठ घालून एकजीव करा.
(यामध्ये तुम्ही मोड आलेले वाफवलेले कडधान्य घातले तरी चालेल)
आता त्यात भिजवेले चिआ सीड्स घालून त्यावर एक चमचा ऑलिव्ह ऑईल घाला. पटकन संपवा

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

1. चिआ सीड्स रोज खाल्ले तर चालतात का?

हो, चिआ सीड्स रोज खाल्ले तरी चालू शकते. पण त्याचे प्रमाण योग्य असावे. चिआ सीड्समुळे कोणतेही नुकसान होत नाही पण कदाचित अतिसेवनामुळे पोट खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही

2. चिआ सीड्स पाण्यातून प्यायल्याने काय होते?

चिआ सीड्स सब्जाप्रमाणे पाण्यातून घेतला जातो. त्याला त्याची अशी काही चव नसते.

3. चिआ सीड्स तुमचे पोटाचे आरोग्य चांगले ठेवते का?

हो पोटाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठीही चिआ सीड्स फारच उत्तम आहे. याच्या सेवनामुळे तुमचे पोट चांगले राहील.

ADVERTISEMENT

You Might Like These:

Health Benefits Of Pistachios & Recipe In Marathi

जिऱ्याचे हे फायदे जाणून तुम्ही व्हाल आश्चर्यचकीत

Benefits of Seeds in Hindi

ADVERTISEMENT
21 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT