ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
#CoronaOutbreak : मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी आयडियाज (Activities For Kids At Home)

#CoronaOutbreak : मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी आयडियाज (Activities For Kids At Home)

सुट्टी सगळ्यांनाच हवी असते. पण आता corona चा उद्रेक झाल्यामुळे सगळ्यांना घरी राहावे लागत आहे. मोठ्यांचे ठिक आहे. पण लहान मुलांना घरात बसवून ठेवणे सगळ्याच पालकांसाठी तारेवरची कसरत झाली आहे. तुमच्याही मुलांना काळात थोडे व्यग्र ठेवून चांगले काहीतरी शिकवावे असे तुम्हाला वाटत असेल तर आम्ही काही खास आयडियाज तुमच्यासाठी काढल्या आहेत. या कोरोनातून बाहेर पडेपर्यंत आपल्या मुलांना कधी शाळेत जाता येईल याची माहिती कोणालाही नाही. त्यामुळे या आयडियाजवर आजपासूनच काम करायला सुरुवात करा. म्हणजे तुमच्या मुलांचे हे दिवस फुकट जाणार नाहीत तर ते या दिवसात महत्वाच्या गोष्टी शिकून शकतील (list of activities for kids at home).

मुलांसोबत घ्या हस्तकलेचे धडे (Craft Classes With Kids)

मुलांसोबत घ्या हस्तकलेचे धडे - Activities For Kids At Home In Marathi

shutterstock

ADVERTISEMENT

मुलांचे डोके रिकामी असेल तर त्यांना काहीच करावेसे वाटत नाहीत. म्हणजे त्यांना अभ्यासही करावासा वाटणार नाही. बाहेर खेळायला जावे असे वाटेल. पण तुम्हाला त्यांना या Quarentine वेळामध्ये खालीही पाठवता येणार नाही. अशावेळी तुम्ही त्यांच्यासोबत घरीच राहून काही वेळ घालवू शकता. आता हस्तकलेचा विचार केला तर तुम्हीच विचार करा तुम्हाला किती वर्ष झाली गोटीवपेपर किंवा साधा वर्तमानपत्राचा वापर करुन ही करु शकता. 

नेमकं काय कराल? (How To Do It) : आता तुम्हाला घरी युट्युबवर काही गोष्टी शिकता येतील म्हणजे पेपरची फुलं बनवणे, पेपरचे पक्षी, प्राणी जर तुम्ही बनवायला शिकलात तर तुम्हाला त्यांना दाखवता येईल. हल्ली अनेकांकडे स्मार्ट टीव्ही आहेत तुम्ही या स्मार्ट टीव्हीवरही असे व्हिडिओ लावून त्यांना या गोष्टी करायला लावू शकता. त्यामधून त्यांना काहीतरी नवे शिकता येईल.

#COVID 2019: या काळात ध्यान साधना करुन मिळवा मन:शांती (Meditation Benefits In Marathi)

शब्द तयार करायला शिकवा (Teach Them Creating Words)

स्पेलिंग तयार करायला शिकवा - Activities For Kids At Home In Marathi

ADVERTISEMENT

shutterstock

शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी स्पेलिंग या फारच महत्वाच्या असतात. जर तुम्हाला तुमच्या मुलांनी स्पेलिंग विसरावे असे वाटत नसेल तर तुम्ही या मोकळ्या वेळेचा उपयोग करुन घ्या. आताच त्यांच्या डोक्यात बाहेर जाण्याचे किंवा इतर कोणतेही विचार नाही. स्पेलिंग पाठ करायला लावताना त्यांच्यासोबत थोडे खेळीमेळीचे वातावारण ठेवा आणि त्यांना हे करायला लावा 

नेमकं काय कराल? (How To Do It): स्पेलिंग पाठ करण्याची शाळेतील पद्धत म्हणजे कविता करणे तुम्हाला तसे शक्य असेल तर तुम्ही तशा पद्धतीने त्यांच्याकडून स्पेलिंग करुन घ्या. किंवा तुम्ही ते उठण्याआधीच स्पेलिंगचे एखादे कोडे तयार करुन ठेवा. म्हणजे शाळा सुरु झाल्यानंतर तुमच्या मुलांना जास्त अडचणी येणार नाही. 

ADVERTISEMENT

अक्षर सुधारण्याची वेळ (Improving Handwriting In Marathi)

स्पेलिंग बनवायला शिकवा - Handwriting In Marathi

shutterstock

तुमच्या मुलाचे अक्षरही कोंबडीचे पाय असतील तर हीच ती योग्य वेळ आहे. ज्यावेळी तुम्ही तुमच्या मुलांचे अक्षर सुधारु शकता. आता तुम्ही त्याला अक्षर सुधारण्यासाठी म्हणून घेऊन येत बसलात तर तुम्ही अजिबात त्यांना बसवू शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला काही खास गोष्टी कराव्या लागतील.

नेमकं काय कराल? (How To Do It) : आता तुम्हाला एक करता येईल. जर तुम्ही काही जुनी पुस्तक देऊन त्यांना त्यातील काही शब्द शोधून काढून लिहायला सांगितले. तर त्यांच्यासाठी हा खेळ होऊ शकेल. त्यांना छान मोठं पुस्तक द्या. त्यातील काही साधे शब्द म्हणजे काना मात्रा, वेलांटी (त्यांच्या इयत्तेनुसार) तुम्ही ते शब्द त्यांना द्या आणि त्यांना एका वहीत लिहायला सांगा. असे करताना पान क्रमांक आणि तो शब्द लिहायला लावा. असे करताना तुम्ही त्याचा अर्थ काय माहीत करुन द्या. म्हणजे तुम्हाला त्यांना दोन्ही गोष्टी कळतील.

ADVERTISEMENT

स्वयंपाकघराची करुन द्या ओळख (Introduce The Kids To Kitchen)

मुलांना घेऊन जा स्वयंपाकघरात - Activities For Kids At Home In Marathi

shutterstock

स्वयंपाक घरात मुलांना आपण कुठे फार जाऊ देतो. त्यांनी काही उद्योग करु नये म्हणून आपण त्यांना लांबच ठेवतो. पण आताच्या या महामारीच्या परिस्थितीत मुलांना आहे त्यामध्ये राहण्यासाठी घरात नेमकं काय काय असावं लागतं हे सांगू शकता. हे सांगताना एक आणखी गोष्ट होईल ती म्हणजे तुम्हाला त्यांना कडधान्य, तृणधान्य, पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ अशी ओळख करुन देता येईल. पुस्तकातून वाचण्यापेक्षा त्यांना तुम्ही त्या वस्तू दाखवल्या त्याची चव त्यांना प्रत्यक्षात चाखता आली की, त्यांना त्या गोष्टीचे अधिक ज्ञान मिळेल. एकूणच तुम्ही त्यांच्या इंद्रियांचा संपूर्ण अभ्यास यामध्ये करुन घेऊ शकता. शिवाय त्यांना घरात लागणाऱ्या गोष्टी कळतील. 

नेमकं काय कराल? (How To Do It): मुलांना स्वयंपाक घरात घेऊन जा. त्यांना एक एक गोष्टीची ओळख करु द्या. देशावर अशाप्रकारचे संकट आले की, घरी असणाऱ्या साहित्यातून कसे दिवस काढता येईल हे समजून सांगा. मुलांना आवडणारे खाद्यपदार्थ अचानक मिळायचे बंद झाले तर.. त्यांनी त्या परिस्थितीत कसं समजून घ्यायला हवं ते त्यांना कळेल. शिवाय आता तुम्हाला त्यांना जर यातून गणित शिकवायचं असेल तुमच्या किचनमध्ये वजनकाटा असेल किंवा माप असतील तर तुम्ही त्यांना मापामधून गणित शिकवून शकता. उदा. एक कप माप, मेजरमेंट स्पून चा वापर तुम्ही करु शकता. 

ADVERTISEMENT

कुटुंबासोबत घरीच बसून खेळता येणारे सोपे खेळ (Indoor Games To Play With Your Family)

गोष्टी बनवा (Story Telling)

गोष्टी सांगणे - Activities For Kids At Home In Marathi

shutterstock

ADVERTISEMENT

तुम्ही कधी लहान मुलांना खेळताना पााहिले आहे का? खेळताना खेळण्यापेक्षा त्यांच्या गप्पा जास्त रंगतात. या गप्पा म्हणजे काय त्यांनी बनवलेल्या काल्पनिक गोष्टी. तुम्ही जर त्यांच्यासोबत हा खेळ खेळलात तर तुम्हाला देखील ते बऱ्याच अशा गोष्टी सांगतील ज्या कधीही घडलेल्या नसतात. त्यांची ही कला तुम्हाला योग्य पद्धतीने वापरायची असेल तर तुम्ही त्यांना चांगल्या गोष्टी करायला शिकवा. 

नेमकं काय कराल? (How To Do It): आता तुम्हाला त्यांना चांगल्या गोष्टी शिकवायच्या असतील तर त्यांना तुम्ही एखादी अशा गोष्टी सांगा ज्यातून त्यांना चांगल्या वाईटाचा शोध लागेल. तुम्ही त्यांच्यासमोर अशा काही गोष्टी सांगा आणि गोष्ट तयार करायला लावा. कदाचित पुस्तकातील गोष्टींपेक्षाही जास्त गोष्टी त्यांना करता येतील. गोष्टी बनवण्यानंतर ती लिहण्याची सवय लागल्यानंतर त्यांचे अक्षरही सुधारेल (कारण किमान तुम्ही आता त्यांना लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर सध्याच्या घडीला हातात देणार नाही.

स्वच्छतेची लावा सवय (Take Out Time For Cleaning)

स्वच्छतेची लावा सवय - Activities For Kids At Home In Marathi

shutterstock

ADVERTISEMENT

तुमचं मुलं कितीही लाडाचं असलं तरी त्याला काही गोष्टी योग्य वयात आल्याच पाहिजे. आता त्यांनी लगेचच सगळं घर झाडावं, भांडी घासावी असा सल्ला आम्ही देत नाही. तर स्वच्छता राखण्याच्या अनेक पद्धती आहेत. पाणी प्यायलानंतर ग्लास उचलून जागेवर ठेवणे. शक्य असल्यास तो धुणे. जेवणाचे ताट, वाटी, पेला, दूधाचा ग्लास त्यांना त्यांच्या पद्धतीने धुवू द्या. 

नेमकं काय कराल? (How To Do It): आता मुलांना तुम्ही काम म्हणून सांगाल तर ते अजिबात ही गोष्ट करणार नाही. पण तुम्ही त्यांना थोडं समजून सांगितलं आणि प्रेमाने त्यांच्याकडून ही कामं करुन घेतली की, त्यांना ती करायला आवडतात. त्यांच्याकडे टेडिबेअर असेल तर तो त्यांना धुवायला लावा. त्यांची खेळणी त्यांच्याकडून धुवून घ्या. त्यांना त्यांच्या गोष्टी कशा जपून ठेवायच्या हे कळायला हवं. म्हणूनच तुम्ही त्यांच्याकडून या गोष्टी करुन घ्या. थोड्या मोठ्या मुलांना तुम्ही त्यांचे कपडे धुवा असे सांगायला काहीच हरकत नाही. त्यामुळे ते स्वावलंबी होतील.

विज्ञानावर आधारीत चित्रपट पाहा (Watch Science Movies)

मस्त घालवा फॅमिली टाईम - Activities For Kids At Home In Marathi

shutterstock

ADVERTISEMENT

आता दिवसभर तुम्ही मुलांना कामाला आणि अभ्यासाला जुंपाल तर ती त्यापैकी एकही काम करायला पाहणार नाही. कधी कधी तुम्ही त्यांनाही ब्रेक द्यायला हवा. अशावेळी थोडावेळ टीव्ही बघणं आता अगदीच चालू शकेल असं आहे. आता मुलांसोबत काय बघायचे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यांना असे चित्रपट दाखवा. त्यातून त्यांना विज्ञान कळेल किंवा असे चित्रपट ज्यातून ते समाज ज्ञान घेऊ शकतील. 

नेमकं काय कराल? (How To Do It): आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, मुलांसाठी असा चित्रपट निवडायचा कसा? अगदी सोपे आहे. गुगल करा आणि असे चित्रपट निवडा जे तुमच्या मुलांच्या वयासाठी साजेसे आहे आता असे करणे प्रत्येक पालकासाठी कठीण नाही. त्यामुळे दिवसातील एखादा वेळ निवडून तुम्ही कुटुंबासाठी मस्त फिल्म टाईम ठेवा. छान घरीच काहीतरी स्नॅक करा आणि हा वेळ आपल्या कुटुंबासोबत घालवा.

कपाट लावणे (Organizing Your Closet)

कपाट लावणे - Activities For Kids At Home In Marathi

ADVERTISEMENT

shutterstock

आपली मुलं अभ्यास आणि करिअरमध्ये इतकी गुंतलेली असतात की, बरेचदा आपण त्यांना घरातलीच कामं शिकवत नाही. तू अभ्यास कर मी बघून घेईन असे म्हणतो. पण आता घरी असल्यामुळे आणि खूप वेळ असल्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांना अगदी हमखास शिकवता येईल ती गोष्ट म्हणजे कपाट आवरण्याची. त्यांना त्यांच्या कपड्यांची घडी घालायला शिकवा. त्यांच्या पुस्तकांचे कपाट लावायला शिकवा. त्यामुळे मुलांचा जास्तीत जास्त वेळ त्यामध्ये जाईल. 

नेमकं काय कराल? (How To Do It): मुलांच्या पुस्तकांच्या कपाटात त्यांची पुस्तके, वह्या आणि व्यवसाय असतील तर त्यांची विषयानुरुप मांडणी करायला लावा. त्यांच्याकडे असलेले कॉमिक्स किंवा इतर गोष्टींची पुस्तकं नीट लावायला लावा. चित्रकलेच्या वह्या, ब्रश आणि इतर सामान त्यांना स्वच्छ धुवून कपाटात मांडायला सांगा. यामध्येही त्यांचा बराच वेळ जातो. शिवाय त्यांना त्यांच्या गोष्टी करण्याची सवय लागते.

चला प्रयोग करुया (Try Science Experiments at Home)

करुन पाहा विज्ञान प्रयोग - Activities For Kids At Home In Marathi

ADVERTISEMENT

shutterstock

मुलांना सतत काहीतरी नवं करायचं असतं. एखादी गोष्ट त्यांनी पाहिली आणि ती कशी काय घडली यामागचे कुतूहल त्यांना कायम असते. मुलांच्या पुस्तकात कितीतरी विज्ञानाचे सोपे प्रयोग असतात. शिवाय पालकांना त्यांना घरी बसवून ठेवायचे असेल तर तुम्ही ही गोष्ट नक्कीच करुन पाहायला हवी. काही प्रयोग हे अभ्यासाचे नसतील. पण त्यांना काय करु नये याची माहिती तरी करुन देतील. 

नेमकं काय कराल? (How To Do It) : लहान मुलांना दाखवण्यासारखे अनेक प्रयोग घरीच करण्यासारखे आहेत. तुम्ही त्यांना बटाट्यातून उर्जेची निर्मिती, जुने अंडे ओळखणे, घरीच स्लाईम बनवणे असे शंभर प्रयोग तुम्हाला युट्युबवरही मिळतील. तुम्ही यातील काही प्रयोग तुमच्या मुलांच्या वयानुसार निवडून असे प्रयोग करुन त्यांचे मन रमवू शकता. 

मुलाने हे खायलाच हवं हा हट्ट वाढवू शकतो तुमच्या मुलांमधील लठ्ठपणा

ADVERTISEMENT

चला झाडे लावूया (Gardening)

मुलांना शिकवा झाडं लावायला - Activities For Kids At Home In Marathi

shutterstock

मातीत खेळायला मुलांना खूप आवडतं. तुम्ही त्यांना कितीही सांगितलं तरी त्यांना मातीमध्ये खेळायचेच असते. आता तुमच्या घरात कुंड्या असतील आणि त्यामध्ये आधीच माती असेल तर चांगली गोष्ट आणि तुमच्याकडे जर माती नसेल तर तुम्ही वापरेलली चहा पावडर किंवा नारळाची किशी देखील वापरु शकता. मुलांना गुंतवण्यासाठी तुम्हाला कोणतेही कारण देऊन अजिबात चालणार नाही.

नेमकं काय कराल? (How To Do It): आता तुम्हाला झाडं आणण्यासाठी बाहेर जाण्याची काहीही गरज नाही. स्वयंपाकघरात इतक्या गोष्टी असतात की, आपण त्यापासून झाडं उगवू शकतो. आता उदा. द्यायचे झाले तर धणे पेरुन कोथिंबीर उगवणे, मेथीचे दाणे, मिरची, टोमॅटो अशा गोष्टींचा उपयोग करुन तुम्ही झाडं उगवू शकता. बिया पेरणं आणि त्यातून झाडं उगवणं हे पाहायला मुलांना नक्कीच आवडेल. शिवाय त्या झाडामध्ये लक्ष देण्यात त्यांचा अधिक वेळ जाईल. 

ADVERTISEMENT

घेऊया थोडे कुकींग क्लासेस (Take Cooking Classes)

कुकींग क्लासेस - Activities For Kids At Home In Marathi

shutterstock

इतर वेळी तुम्ही स्वयंपाकघरात जरा काम करायला गेलात की, मुलं लुडबूड करायला अगदी हमखास येतात. त्यावेळी त्यांना आपण किचनमधून हकलतो कारण आपल्याला कामाचा व्याप वाढवायचा नसतो. पण मुलांना या दिवसात थोड्या थोड्या गोष्टींमध्ये तुम्हाला मदत करायला लावा. आता त्यांना अगदीच कठीण काम द्यायची नाही. पण त्यांना नो कुक अशा काही रेसिपी शिकवता येतील .

नेमकं काय कराल? (How To Do It):  मुलांना सँडवीच, चीझ स्लाईस सँडवीच, चॉकलेट सँडवीज, भेळ असे सोपे सोपे पदार्थ करायला देऊ शकता. तुम्ही या सगळ्याची पूर्वतयारी करुन त्यांना द्या. त्यांना फक्त तुम्ही सगळ्या गोष्टी मिक्स करायला द्या. त्यानाही नक्कीच हे करायला बरं वाटेल. विशेषत: मुलींना या गोष्टी आवडू शकतात. पण मुलांनाही तुम्ही या गोष्टी करायला सांगू शकता. 

ADVERTISEMENT

मुलांचे सॉफ्ट टॉईज धुण्यासाठी वापरा या सोप्या पद्धती

अभ्यास शिकवणारे खेळ (Play Indoor Games In Marathi)

शिकवणारे खेळ - Indoor Games In Marathi

shutterstock

मुलांना अभ्यासाची गोडी लागण्यासाठी पालकांना किती उद्योग करावे लागतात हे पालकांनाच माहीत आहे. पण आता मुलांना सतत अभ्यास करायला लावणे फारच अशक्य झाले आहे. अशावेळी जर तुम्हाला त्यांना खेळातून शिकवता आले तर फारच उत्तम असेल. सध्या अनेक ठिकाणी असे खेळ मिळतात. ज्याचा उपयोग तुम्हाला त्यांना शाळा सुरु झाल्यावर नक्की होईल. 

ADVERTISEMENT

नेमकं काय कराल? (How To Do It): खूप जणांकडे स्पेलिंग तयार करणारे वर्ड स्क्रँबल असे अनेक प्रकार जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही असे खेळ घरीच तयार करा. मुलांची सगळी खेळणी बाहेर काढा आणि एकदा बघा. कदाचित त्यांच्या खेळण्यांमध्ये अशा प्रकारची खेळणी असू शकतील. त्यामुळे तुम्हाला नव्याने विकत घेण्याची काही गरज नाही.

बोलायला शिकवणे (Learn Phonics Basics)

बोलायला शिकवा - Activities For Kids At Home In Marathi

shutterstock

तुमचे मुलं लहान असेल तर तुम्हाला त्यांना काही नव्या गोष्टी शिकवता येतील. मुल बोलताना पाहायला सगळ्यांनाच आवडते. आता तुम्हाला तुमच्या मुलांना शिकवायला पुरेसा आणि खूप वेळ आहे. तुम्ही तुमच्या मुलांना अगदी आरामात या काळात बोलायला शिकवू शकता. 

ADVERTISEMENT

नेमकं काय कराल? (How To Do It): मुलांशी थेट संवाद साधण्याची वेळ तुम्हाला या निमित्ताने मिळाली आहे. तुम्ही त्यांना अल्फाबेट, बाराखडी शिकवू शकता. तुम्ही मोबाईलचा उपयोग न करता मुलांना या गोष्टी स्वत: शिकवल्या तर त्यांना या गोष्टी अधिक लक्षात राहतील. तुम्हाला पुढे कधीही न मिळणारा वेळ मुलांसोबत अशा पद्धतीने घालवता येईल. त्यामुळे तुम्ही फावल्यावेळतही ही गोष्ट करु शकता. 

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ)

1. लहान मुलांना सगळ्यात जास्त काय करायला आवडते ?
हल्ली मुलं मोबाईलमध्ये कितीही गुंतलेली असली तरी चार मुलं एकत्र आली की, त्यांना मैदानी खेळ खेळायला फारच आवडतात. त्यामुळे मुलांना बाहेर खेळायला सगळ्यात जास्त आवडते. अभ्यासापेक्षा त्यांना नक्कीच खेळासाठी वेळ द्यायला आवडते. 

2. मुलांचे मनोरंजन कसे करावे? 
मुलांना एखाद्या गोष्टीमध्ये गुंतवून ठेवणे फारच कठीण असते. त्यांना एखादी गोष्ट केल्यानंत लगेचच कंटाळा येतो. हल्ली तर पालक त्यांना काम करायला मिळावे म्हणून त्यांना हल्लीच्या दिवसात टिव्ही लावून दिला तरी त्यांना टिव्ही पाहायचा नसतो. अशावेळी तुम्ही त्यांचे मनोरंजन करण्यासाठी त्यांना आवडतील अशा गोष्टी सांगा. त्यांना जर एखादा चित्रपट पाहायचा असेल तर माहिती देणारा चित्रपट पाहा. तुम्ही त्यांच्यासोबत जर असे काही चांगले चित्रपट पाहिले तर तुमच्यामधील नातेही अधिक घट्ट व्हायला मदत होईल. 

3. तुम्ही घरात राहून कोणत्या क्रिएटिव्ह गोष्टी करु शकता?
मग आता मुलं कंटाळण्याआधी त्यांच्याकडून या काही गोष्टी खेळीमेळीने करुन घ्या. कोरोना व्हायरसमुळे मिळालेला #selfquarentine चा वेळ तुम्हाला पुन्हा मिळणार नाही.

03 Apr 2020
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT