लॉकडाऊनंतर वर्क फ्रॉम होम हा सर्वाच्या जीवनशैलीचाच एक भाग झाला. अजूनही सर्व पून्हा कधी सुरू होईल आणि कामासाठी ऑफिसमध्ये जाणं सर्वांनाच शक्य होईल का हे यावर्षी तरी सांगणं कठीण आहे. वर्क फ्रॉम होम ही कामाची पद्धत कितीही सुरक्षित असली तरी अशा पद्धतीने काम करणं सोपं मुळीच नाही. कारण घरी असल्यामुळे ऑफिसची कामे करताना अनेक अडथळे निर्माण होतात. यासाठीच घरातून काम करत असला तरी तुमचं वर्क फ्रॉम होम स्वच्छ आणि सुंदर ठेवा. ज्यामुळे तुम्ही ऑफिसमध्येच काम करत आहात असं समजणं तुम्हाला सोपं जाईल. यासाठी घरातील एक शांत जागा शोधण्यापासून ती जागा नियमित स्वच्छ राखण्यापर्यंत अनेक गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. यासाठीच आम्ही शेअर केलेल्या या टिप्स नक्की फॉलो करा.
घरातील योग्य आणि शांत जागा निवडा –
जर तुम्ही अजूनही घरात कुठेही बसून लॅपटॉपवर ऑफिसचं काम करत असाल तर असं करणं आजपासून बंद करा. अजून किती दिवस तुम्हाला वर्क फ्रॉम होम करावे लागेल हे कुणीच सांगू शकत नाही. यासाठी तुमच्या घरातील एखादी शांत जागा निवडा जिथे तुम्ही तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे ऑफिस थाटू शकता. असं केल्यामुळे तुमचं कामावरील लक्ष भरकटणार नाही. तुमच्या कामाची जागा स्वयंपाकघर, फ्रीज, टिव्ही, बेड अशा गोष्टींपासून थोडी धूर ठेवा. शिवाय तिथे योग्य प्रकाशयोजना असेल याची पुरेशी काळजी घ्या. संध्याकाळी काम आटपल्यावर पुन्हा त्या जागी जाऊ नका. ज्यामुळे तुम्हाला ते तुमचं ऑफिस आहे असंच वाटू लागेल.
Shutterstock
ऑफिस ऑर्गनाईझ करा –
बेडवर लोळत, सोफ्यावर पाय पसरून काम करण्यापेक्षा तुम्ही ऑफिससाठी निवडलेल्या जागी एक आरामदायक खुर्ची आणि टेबल ऑर्गनाईझ करा. ज्यामुळे ते तुमचं हक्काचं ऑफिस डेस्क तयार होईल. या टेबलवर तुमचा लॅपटॉप, मोबाईल. हेडफोन, डायरी, पेन, चार्जर आणि ऑफिससाठी लागणाऱ्या वस्तू ठेवा. स्टिकी नोटपॅडवर तुमच्या कामाची यादी लिहून या ठिकाणी चिकटवून ठेवा. ज्यामुळे तुमचा काम करताना गोंधळ उडणार नाही.
Shutterstock
ऑफिस दररोज सॅनिटाईझ आणि स्वच्छ करा –
जरी तुम्ही घरातून काम करत असला तरी तुमच्या ऑफिसच्या गोष्टी जसं की लॅपटॉप, मोबाईल, डेस्क दररोज स्वच्छ आणि निर्जंतूक करणं आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक गॅझेट आठवड्यातून कमीत कमी तीन वेळा निर्जंतूक करण्याची गरज असते. यासाठी तुम्ही सॅनिटाईझर अथवा गॅझेट स्वच्छ करण्याचं कोणतंही लिक्विड वापरू शकता. मात्र आम्ही तुम्हाला हे सांगू इच्छितो की मायग्लॅमचे नवीन वाईपआऊट सॅनिटाईझर वाईप्स आणि सॅनिटाईजर स्प्रे तुम्ही यासाठी बिनधास्त वापरू शकता. कारण यात खास नैसर्गिक घटकांचा वापर केलेला आहे. ज्यामुळे तुमच्या ऑफिसमध्ये लेमनग्रास, लिंबू अशा नैसर्गिक सुंगध दरवळेल शिवाय तुमचं ऑफिस स्वच्छ आणि निर्जंतूकही होईल. यातील घटक तुमच्या सौम्य हातांन मुळीच इजा करत नाहीत. त्यामुळे जर तुमचे हात वारंवार धुवून कोरडे झाले असतील तर ते स्वच्छ करण्यासाठी या वाईपआऊट प्रॉडक्टचा अवश्य वापर करा. ज्यामुळे तुमच्या हाताची त्वचा टवटवीत आणि मऊ होईल.
दररोज काम झाल्यावर अथवा कामाला सुरूवात करण्यापू्र्वी तुमच्या लॅपटॉप अथवा मोबाईलचे पॉवर कनेक्शन काढून टाका आणि या वाईपआऊट वाईप्सने ते स्वच्छ पुसून घ्या. तुम्ही या वाईप्सने लॅपटॉपची स्क्रीन, की- बोर्ड, माऊस, मोबाईल स्वच्छ करू शकता. पुसल्यानंतर या वस्तू थोड्यावेळ वाऱ्यावर ठेवा ज्यामुळे त्या सुरक्षित राहतील. तुम्ही या वाईप्सने तुमचे वर्क फ्रॉम होम करण्याचे संपूर्ण टेबल आणि खुर्चीदेखील स्वच्छ करू शकता. वाईप आऊट सॅनिटाईझर स्प्रेच्या सुंगधाने तुमच्या आजूबाजूचे वातावरणही सुवासिक होईल. ज्यामुळे तु्म्हाला काम करताना नेहमीच उत्साहित वाटेल.
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
अधिक वाचा –
वर्क फ्रॉम करताना स्वयंपाकघरातील काही ट्रिक्स येतील कामी
आयुष्य अधिक सुखकर करणाऱ्या क्लिनिंग हॅक्स (Best Cleaning Hacks In Marathi)
झाडांच्या वाढीसाठी उपयुक्त आणि सोप्या टिप्स (Plants To Grow From Cuttings In Marathi)