किचनमधून आताच काढून टाका या जुन्या गोष्टी

किचनमधून आताच काढून टाका या जुन्या गोष्टी

घरामधील महिलांचा सगळ्यात जवळचे म्हणजे स्वयंपाक घर… आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी असून आपण आपले किचन छान सजवतो. पण असे करताना किचनमधील काही गोष्टींशी आपले भावनिक नाते जुळते की आपण काही वस्तू जुन्या झाल्या तरी टाकायला पाहात नाही. असे करत करत आपल्या किचनमध्ये अशा अनेक जुन्या वस्तू साचून राहतात. तुम्हीही किचनमध्ये अशाच काही जुन्या वस्तू ठेवून दिल्या आहेत का? जर उत्तर असेल हो… तर तुम्ही आताच या जुन्या गोष्टी किचनमधून काढून टाकायला हव्यात. चला जाणून घेऊयात या जुन्या गोष्टी ज्या तुमच्यासाठी ठरु शकतात घातक

पाकिटात चुकूनही ठेवू नका या गोष्टी

तुटकी भांडी

Instagram

आपण घेतलेली महागडी भांडी तुटली तरी ती टाकण्याची इच्छा अनेकांना नसते. तुटलेलं झाकणं, मोडलेल्या कानाच्या कढई अनेक जण जोडू या हिशोबाने किचनच्या एका कोनाड्यात ठेवून देतात. पण अशी तुटकी भांडी घरात विशेषत: किचनमध्ये ठेवणे त्रासदायक ठरु शकते. तुटक्या भांड्यांमुळे घरात कायम क्लेष येते. अशी तोडकी-मोडकी भांडी असंतोषासाठी कारणीभूत असतात. त्यामुळे तुम्ही पुढे वापराल या हिशोबाने ही भांडी ठेवून दिली असेल तर तुम्ही आताच ती तुटकी भांडी आताच काढून टाका.

या संख्यांना का मानले जाते अशुभ, जाणून घ्या कारण

खराब झालेले अन्नधान्य

घरात अन्नधान्य भरुन ठेवणे हे भरभराटीचे लक्षण असते. जर तुमचे डबे छान भरलेले असतील तर तुमच्याकडे कायम स्थैर्य आहे असे दिसून येते. पण या अन्नधान्याची काळजी घेणेही गरजेचे असते अनेकदा आपल्याकडे फार जुने असे धान्य असते. त्यांना टोके किंवा अळ्या येतात. पण तरीही आपण त्याकडे लक्ष देत नाही. असे खराब झालेले धान्य असेल तर तुम्ही ते योग्य पद्धतीने साफ करुन घ्या. कारण असे खराब झालेले अन्न दारिद्रय दर्शवते. त्यामुळे धान्यांची योग्य काळजी घ्या.

तुटलेली सुरी

खूप जणांना एखादी सुरी वापरायची सवय झाली की, तिचे हँडल मोडले तरी ती टाकायची इच्छा होत नाही. पण असे करु नका. जशी मोडलेली सुरी ही तुमच्या हाताच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्रासदायक असते तशीच ती घरात अशांतता आणण्यासाठी कारणीभूत असते. त्यामुळे घरी अशी अर्धवट तुटलेली सुरी किंवा काटा चमचा राहून गेला असेल तर तो आताच बदला. घरात शांती येईल. 

राशीनुसार 'हे' पाळीव प्राणी ठरू शकतात तुमच्यासाठी लकी

फुटलेली ताट

Instagram

हल्ली स्टीलची भांडी वेगवेगळ्या क्वालिटीची असतात. एखादे भांडे त्यांच्या कडा या कधीकधी फुटतात. आपल्या अनेकांकडे असे डबे, प्लेट अशा काही भांडीचे प्रकार असतात. जर तुमच्याकडे अशी काही भांडी राहून गेली असतील तर ती किचनमधून काढून टाका.  कारण  अशी ही कडा तुटलेली  फुटकी भांडी उगाचच घरात कलहाचे वातावरण निर्माण करतात. घरातील कलह टाळण्यासाठी तुम्ही स्टीलची अशी फुटकी भांडी काढून टाका. 

जुनी चिमणी किंवा पंखा

किचनमधील धूर घरातून बाहेर काढण्यासाठी अनेक जण चिमणी किंवा एक्झोस्ट फॅन्स लावतात. किचनमध्ये धूर साचून राहिला तर तो धूर किचनमध्ये नकारात्मक उर्जा भरुन ठेवतो. चिमणी आणि एक्सझोस्ट फॅन्स जुना झाला असेल तर तुम्ही तो आताच बदलून टाका. कारण तो त्याचे योग्य काम करत नाही.  तो नकारात्मक उर्जा तुमच्या घरात निर्माण करतो. 


आता किचनमध्ये तुम्हीही अशा काही जुन्या वस्तू ठेवून  दिल्या असतील तर आताच या गोष्टी घरातून काढून टाका आणि किचन शुद्ध आणि स्वच्छ करा