खाणंपिण आणि नाइटलाईफ

मुळा खाण्याचे फायदे, मिळवा त्वचेच्या समस्येपासून सुटका (Benefits Of Radish In Marathi)

Dipali Naphade  |  Aug 10, 2020
मुळा खाण्याचे फायदे, मिळवा त्वचेच्या समस्येपासून सुटका (Benefits Of Radish In Marathi)

 

आपण जेव्हा आपल्या आहाराकडे व्यवस्थित लक्ष देतो तेव्हा आहारात सलाडचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. या सलाडमध्ये वेगवेगळ्या कच्च्या भाज्यांचा आपण समावेश करून घेतो आणि त्यापैकी एक भाजी म्हणजे मुळा. मुळ्याची कोशिंबीर, मुळ्याची भाजी, मुळ्याचे पराठे या पदार्थाचा आपण आस्वाद घेतलाच आहे. पण बऱ्याच जणांना मुळा आवडत नाही. पण मुळा खाण्याचे फायदे खूप आहेत. मुळ्याचे फायदे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. अन्य भाज्यांप्रमाणे मुळ्याची भाजीही आपण खायला हवी. याचे सेवन अर्थातच प्रमाणात व्हायला हवे. पण मुळा खाण्याचे फायदे अनेक आहेत जे आपण जाणून घेऊया. मुळा हा आरोग्यासाठीच नाही तर तर तुमच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या त्वचेसाठीही तितकाच फायदेशीर आहे. त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळवून देण्यासाठीही मुळा तितकाच फायदेशीर ठरतो. जाणून घेऊया मुळ्याचे फायदे.

 

 

मुळ्याचे पोषक तत्व (Nutritional Value of Radish In Marathi)

Shutterstock

 

मुळ्यामध्ये शरीराला आवश्यक असणारे अनेक पोषक तत्व असतात. ज्याची प्रत्येकाला माहिती नसते. जाणून घेऊया यामध्ये नक्की कोणते पोषक तत्व आढळतात. पाणी, एनर्जी, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर, टोटल डएटरी, साखर, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, फॉस्फोरस, पोटॅशियम, सोडियम, जिंक, कॉपर, मँगनीज, फ्लोराईड ही सगळी मिनरल्स असून विटामिन सी, थियामिन, नियासिन, कॉलीन, बीटा, विटामिन ए आययू, विटामिन के, ल्यूटिनदेखील आढळतात. जे तुमच्या शरीराला आवश्यक असणारे योग्य सर्व पोषण देतात. 

जाणून घेऊया परवळचे असेच आरोग्यदायी फायदे

मुळ्याचे आरोग्यदायी फायदे (Health Benefits of Radish In Marathi)

मुळ्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. नक्की कोणत्या स्वरूपात ते आपण पाहूया.

Shutterstock

हृदय निरोगी राखण्यासाठी

हृदय हा शरीराचा महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे त्याची काळजी घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. मुळा खाण्याचे फायदे यासाठी जास्त होतात. वास्तविक एनसीबीई (The National Center of Biotechnology Information) च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीप्रमाणे मुळ्यामध्ये नायट्रेट असल्याने एथरोस्क्लेरोसिसच्या त्रासापासून सुटका मिळते. एथरोस्क्लेरोसिस एक गंभीर समस्या असून आतील नसांमध्ये चरबी आणि कोलेस्ट्रॉल साठते ज्यामुळे हार्ट अटॅक येतो. पण मुळ्यात असणारे फायबर ही समस्या कमी करण्यास मदत करते. त्यामुळे नियमित आहारामध्ये मुळ्याच्या भाजीचा समावेश करून घ्यावा.  

मधुमेही व्यक्तींना फायदेशीर

Shutterstock

मधुमेही व्यक्तींसाठी मुळा खाण्याचे फायदे भरपूर आहेत. मुळा हा अँटिडायबेटिक स्वरूपात कामम करतो. यातील अँटिऑक्सिडंट्स आणि एनर्जी मेटाबॉलिज्म अधिक चांगली करण्यास आणि फ्री रॅडिकल्सपासून बचाव करण्यास, ग्लुकोज नियंत्रित करण्यास आणि आतड्यातील ग्लुकोज अवषोषण कमी करण्यास मदत करते. केवळ मुळाच नाही तर मुळ्याची पाने आणि मुळ्याच्या बियादेखील मधुमेही व्यक्तींना लाभदायक आहेत. मुळ्यामध्ये विटामिन सी चा चांगला स्रोत असल्याने मधुमेही व्यक्तींना फायदा मिळतो. विटामिन सी हे इन्शुलिनवर अधिक प्रभावी ठरते. 

मुतखड्यावर लाभदायक

मुतखड्याची समस्या ही खूपच त्रासदायक असते त्यासाठीही तुम्हाला मुळ्याचा उपयोग होतो. मुळ्यातील कॅल्शियम ऑक्सालेट हे मुतखडा शरीरातून बाहेर काढण्यासाठी मदत करते. कॅल्शियम ऑक्सालेटमुळेच मुतखड्याची समस्या मुळात होते. मुतखड्यापासून वाचायचं असेल तर मुळ्याचे सेवन करणे योग्य आहे. याचे किती सेवन करायचे याची माहिती तुम्ही डॉक्टरांशी सल्लामसलत करून घेऊ शकता.

वजन कमी करण्यासाठी

Shutterstock

वजन कमी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर मुळा त्यावर उत्तम उपाय आहे. यातील फायबर आहार वजन नियंत्रित करून जाडी कमी करण्याचे काम करतात. मुळात मुळ्याची कोशिंबीर तुम्ही पोळीसह खाल्ल्यास तुम्हाला योग्य फायबर मिळते आणि पोट भरल्यासारखे राहते. त्यामुळे जास्त भूक लागत नाही आणि जाडी वाढण्याचा प्रश्नही उद्भवत नाही. तुम्ही डाएट करत असाल तर त्यामध्ये मुळ्याचा नक्की समावेश करून घ्या. याने कॅलरी कमी होण्यासही मदत  मिळते. 

कडधान्य सकाळी रिकाम्या पोटी खाऊन करा वजन कमी

बद्धकोष्ठावर गुणकारी

मुळ्यामध्ये उच्च फायबर असतात. तुम्ही 100 ग्रॅम मुळा खाल्यास, साधारणम 1.6 ग्रॅम फायबर तुम्हाला त्यातून मिळते. त्यामुळे तुम्ही जर रोज थोडा थोडा मुळा खाल्ला तर तुम्हाला असणारा बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. आतडी साफ करण्यासाठी फायबरमुळे फायदा होतो. म्हणूनच मुळा खाण्याचा फायदा बद्धकोष्ठावर गुणकारी ठरतो. फायबरयुक्त  पदार्थांनी मलपक्रिया अधिक सोपी होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास निघून जातो. 

त्वचेकरिता मुळ्याचे फायदे (Benefits of Radish for Skin)

Shutterstock

मुळ्यामध्ये विटामिन सी चे प्रमाण असते जे त्वचेसाठी अँटिऑक्सिडंटप्रमाणे काम करते. विटामिन सी त्वचेवरील कोलेजन वाढवून त्वचेवर चमक आणण्याचे काम करते. त्यामुळे मुळ्याचा उपयोग तुम्हाला त्वचेसाठी चांगल्या प्रकारे होऊ शकतो. नक्की मुळा खाण्याचे फायदे त्वचेसाठी काय होतात पाहूया. 

मुरूमं आणि अॅक्नेपासून सुटका

Shutterstock

आपल्या आयुष्यात मुरूमं आणि अॅक्ने ही समस्या खूपच महत्त्वाची आहे. मुळ्यामध्ये जास्त प्रमाणात नैसर्गिक पाणी असते. जे तुमच्या त्वचेला नैसर्गिकरित्या हायड्रेट ठेवण्यास मदत करते. त्यामुळे त्वचेवरील नको असलेले सेल्स आणि इतर घाण निघून जाण्यास मदत मिळते. मुळ्याच्या सेवनाने शरीरात पाण्याची पातळी व्यसस्थित राहून त्वचेला योग्य हायड्रेशन मिळाल्यामुळे त्वचेवरील मुरूमं आणि अॅक्नेच्या समस्यांपासून दूर राहण्यास मदत मिळते. 

त्वचा हायड्रेट राखण्यास करते मदत

Shutterstock

मुळ्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी असते जे त्वचेला अधिक पोषण मिळवून देण्यास फायदेशीर ठरते. तुम्ही जर त्वचेवर मुळ्याचा वापर केला अथवा नियमित मुळ्याचा आहारामध्ये समावेश करून घेतला तर तुमच्या त्वचेला चांगले पोषण मिळून त्वचा हायड्रेट राखण्यास मदत मिळते. विषारी पदार्थ आणि घाण शरीरातून काढून टाकून त्वचा नैसर्गिकरित्या हायड्रेट करण्याचे काम मुळा करतो. तसंच नैसर्गिक मॉईस्चराईजर म्हणूनही तुम्ही मुळ्याचा उपयोग त्वचेसाठी करून घेऊ शकता. यातील विविध अँटिऑक्सिडंट्स, विटामिन्स आणि मिनरल्समुळे तुमची त्वचा अधिक सुंदर होते आणि त्वचेच्या अनेक समस्यांपासूनही दूर राहाता  येते. नैसर्गिक चमक मिळून तुमची त्वचा अधिक मऊ बनते. 

त्वचेच्या समस्यांपासून ठेवते दूर

shutterstock

यातील विविध अँटिऑक्सिडंट्स, विटामिन्स आणि मिनरल्समुळे तुमची त्वचा अनेक त्वचेच्या आजारापासून दूर राखण्यास मदत मिळते. स्किन सेल्सवर अटॅक करणाऱ्या फ्री रॅडिकल्सपासूनही मुळा लढतो. त्यामुळे अगदी कॅन्सरसारख्या आजारापासूनही तुम्हाला दूर ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. आपल्या त्वचेवरील टिश्यूजचे रक्षण करण्याय मुळा फायदेशीर ठरतो.  त्यामुळे त्वचेची समस्या सहसा होऊ देत नाही. तसंच सुरकुत्या, काळे डाग, एजिंगची समस्या यासारख्या समस्यांपासूनही सुटका मिळवायची असेल तर मुळ्याचा उपयोग करून घेता येतो. मुळा खाण्याने या समस्यांपासून दूर राहाता येते. 

कोरड्या आणि निस्तेज त्वचेपासून सुटका

जसे आपल्याला श्वास घेण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते तसंच त्वचेलाही वेळोवळी गरज असते. निरोगी, निस्तेज आणि मऊ मुलायम त्वचा हवी असेल तर तुम्ही मुळ्याच्या उपयोग करून घेऊ शकता. तुम्ही मुळ्याचा रस, ओटमिल पावडर, पांढरे अंडे फेटून घ्या आणि हे मिश्रण तुम्ही पेस्ट करून स्क्रब म्हणून तुमच्या त्वचेवर लावा. तुम्हाला नैसर्गिक मऊ आणि निरोगी त्वचा मिळते. कोरड्या आणि निस्तेज त्वचेपासून सुटका मिळविण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. 

त्वचेवरील फ्रेकल्सपासून सुटका

Shutterstock

अँटिऑक्सिडंट्स, विटामिन्स आणि मिनरल्सचा चांगला स्रोत मुळ्यामध्ये असतो. ज्यामुळे त्वचेला चांगले पोषण मिळते. यातील अँटिऑक्सिडंट्स सर्व फ्री रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत करतात. त्वचेवर आलेल्या फ्रेकल्सपासून तुम्हाला सुटका करून घ्यायची असेल तर मुळा यावर चांगला उपाय आहे. तुम्ही ताज्या मुळ्याचा रस काढा. त्यामध्ये कापूस बुडवा आणि तुमच्या त्वचेवर लावा. साधारण 15-20 मिनिट्स तसंच ठेवा आणि मग थंड पाण्याने धुवा.  तुम्ही नियमित हा उपाय केल्यास, तुम्हाला सुटका मिळेल. 

चेहऱ्यावर लावा बर्फ आणि अवाढव्य चरबी करा कमी

केसांसाठी मुळ्याचे फायदे (Benefits of Radish for Hair)

केवळ आरोग्य आणि  त्वचाच नाही तर केसांसाठीही मुळ्याचे फायदे होतता. मुळ्याचा हेअर मास्क अथवा पेस्ट केसांना लावल्यास, केस मजबूत आणि घनदाट होतात. पण हे प्रत्येक माणसाच्या केसांच्या टेक्स्चरनुसार आहे. पाहूयात काय आहेत फायदे.  

केसांची वाढ होण्यास फायदेशीर

Shutterstock

केसांना मुळ्याचा ताजा रस लावल्यास खूपच चांगला परिणाम होतो. तुम्हाला जर केसगळती अथवा लवकर केस पांढरे होण्याची समस्या असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून पाहा. यामधील अँटिऑक्सिडंट्स, विटामिन्स आणि मिनरल्समुळे हे शक्य होते. अँटिऑक्सिडंट्समुळे केसातील डॅमेज निघून जाण्यास मदत होते. तसंच तुम्हाला याचा परिणाम कमी वेळात चांगला दिसून येतो आणि केसांची वाढ होण्यास हे फायदेशीर ठरते. मुळ्याचा रस स्काल्पला लावा आणि साधारण 5 मिनिट्स हलक्या हाताने तुम्ही मसाज करा. त्यानंतर केस धुवा. तुम्हाला लवकरच चांगला परिणाम दिसून येईल. तुमच्या केसांचे रक्षण करून केसांची वाढ होण्यास याची मदत मिळते. 

खाज येत असल्यास मिळते सुटका

Shutterstock

तुम्हाला कोंड्यामुळे सतत केसात खाज येत असेल तर तुम्हाला त्यापासून सुटका मिळवून देण्यासाठी मुळा हा उत्तम उपाय आहे.  त्वरीत सुटका मिळण्यासाठी तुम्ही मुळ्याच्या रसाचा वापर करा. कोणत्याही शँपू अथवा तेलाही जर तुमच्या केसातील कोंडा जात नसेल तर मुळ्याच्या रसाने नक्की जाईल. मुळ्याचा रस स्काल्पला लावा आणि साधारण 5 मिनिट्स हलक्या हाताने तुम्ही मसाज करा. कोरडा टॉवेल साधारण एक तास केसांवर बांधून ठेवा. त्यानंतर केस धुवा.

चमकदार केसांसाठी

Shutterstock

अँटिऑक्सिडंट्समुळे केसातील डॅमेज निघून जाण्यास मदत होते आणि मुळ्यामध्ये नैसर्गिक पाणी जास्त प्रमाणात असते. केसगळती अथवा लवकर केस पांढरे होण्याची समस्या असेल तर ते थांबविण्यासाठी  आणि केस अधिक चमकदार होण्यासाठी याची मदत मिळते. नैसर्गिक मॉईस्चराईजर म्हणून तुम्ही मुळ्याच्या रसाचा केसांवर आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा तरी उपयोग करा. 

घरगुती हेअर मास्कने करा घरच्या घरी हेअर स्पा

मुळ्याचे फेसपॅक कसे बनवाल (How to Make Radish Face Pack)

चेहरा चमकदार राहण्यासाठी तुम्ही घरच्या घरी मुळ्याचा फेसपॅकही बनवू शकता. त्याची प्रक्रिया नक्की काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो. 

मुळा खाल्ल्याने होणारे नुकसान (Side Effects of Radish)

Shutterstock

प्रत्येक गोष्टीचे  एक प्रमाण ठरलेले असते आणि त्याच प्रमाणात त्याचे सेवन करावे. मुळ्याने काय नुकसान होते ते जाणून घेऊया. 

प्रश्नोत्तरे (FAQs)

1. चेहऱ्यावर मुळा लावता येतो का? 
हो चेहऱ्यावर मुळा तुम्ही लाऊ शकता.  याचा फेसपॅक तुम्हाला चेहरा अधिक तजेलदार आणि चमकदार बनविण्यास मदत करतो. 

2. अॅक्नेसाठी मुळा चांगला आहे का? 
मुळ्याच्या सेवनाने शरीरात पाण्याची पातळी व्यसस्थित राहून त्वचेला योग्य हायड्रेशन मिळाल्यामुळे त्वचेवरील मुरूमं आणि अॅक्नेच्या समस्यांपासून दूर राहण्यास मदत मिळते. 

3. फुफ्फुसांसाठी मुळा योग्य आहे का? 
मुळ्यामध्ये उच्च फायबर असतात. जे तुमच्या हृदय आणि फुफ्फुसांसाठी फायदेशीर ठरतात. याचे योग्य सेवन तुम्हाला हेल्दी राहण्यास मदत करते. 

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा  

Read More From खाणंपिण आणि नाइटलाईफ