बॉलीवूड

बेस्ट मराठी चित्रपटांची यादी (Best Marathi Movies List)

Leenal Gawade  |  Jun 25, 2019
Best Marathi Movie List

आठवड्याचा वीकेंड अनेकांना त्यांच्या कुटुंबासोबत घालवायला आवडतो. खाणं -पिणं, मॉलमध्ये फिरणं काय चालूच राहतं. कधी जर एखादा चांगला चित्रपट कुटुंबासोबत पाहाण्यासारखा असेल तर तो देखील पाहिला जातो. पण घरबसल्या काही चांगले दर्जेदार चित्रपट पाहण्याच्या तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही मराठी चित्रपट हमखास पाहायला हवे. आम्ही खास तुमच्यासाठी काही खास वेगळ्या विषयांच्या मराठी चित्रपटांची यादी (best marathi movies list) काढली आहे. आम्ही काढलेले काही निवडक चित्रपट तुम्ही नक्की पाहा

मराठी चित्रपट बदलतोय ?

गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपट बदलले आहेत. सासू- सून किंवा अन्याय- अत्याचार अशा गोष्टी चित्रपटातून दाखवण्याचा काळ आता मागे पडला आहे. अनेक वेगळ्या विषयांचे चित्रपट आता मराठीतही होऊ लागले आहेत. म्हणूनच मराठी चित्रपटांकडे अन्य भाषिक लोकांचा ओढाही वाढत चालला आहे. हिंदी चित्रपटातील अनेक कलाकारांनाही त्यामुळे मराठी चित्रपटात कॅमिओ करण्याची संधी मिळाली तरी ते आवडीने करायला तयार असतात. हिंदी चित्रपटात कायमच नोकर म्हणून मराठी कॅरेक्टर उभे केले जायचे ते आता बदलताना दिसत आहे. त्यामुळे मराठीचा हा दर्जा आता चित्रपटातही चांगलाच वाढला आहे.

बेस्ट मराठी चित्रपटांची यादी (Best Marathi Movie List In Marathi)

आम्ही वेगवेगळ्या विषयानुसार मराठी चित्रपटांची यादी (marathi movies list) केली आहे. एकदा या मराठी चित्रपटांच्या यादीवर नजर टाका.

वाचा – जीवन बदलणारी पुस्तके

मराठीत आलेले बायोपिक (Marathi Biopic Movies)

1) आनंदी गोपाळ (Anandi Gopal)

दिग्दर्शक (Director): समीर विध्वंस

रिलीज झाल्याचे वर्ष (Released Year): 15 फेब्रुवारी 2019

स्टोरी लाईन (Story Line): भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदबाई  गोपाळराव रानडे यांच्या प्रवासाची ही कथा आहे. त्यांचा प्रेरणादायी प्रवास यामध्ये दाखवण्यात आला आहे.

स्टार कास्ट (Star Cast): ललित प्रभाकर, भाग्यश्री मिलिंद

वाचा – ऐतिहासिक कादंबर्‍या

2) भाई : व्यक्ती की वल्ली (Bhai – Vyakti Kee Valli)

दिग्दर्शक (Director): महेश मांजरेकर

रिलीज झाल्याचे वर्ष (Released Year): 4 जानेवारी 2019

स्टोरी लाईन (Story Line): लेखक पु.ल. देशपांडे यांच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट आहे.भाईंच्या आयुष्यातील महत्वपूर्ण कंगोरे या चित्रपटातून मांडण्यात आले आहे.

स्टार कास्ट (Star Cast): सागर देशमुख, इरावती हर्षे,मृण्मयी देशपांडे,महेश मांजरेकर, सचिन खेडेकर

वाचा – कोण आहे सनी लिओनी

3) लोकमान्य: एक युगपुरुष (Lokmanya: Ek Yugpurush)

दिग्दर्शक (Director): ओम राऊत

रिलीज झाल्याचे वर्ष (Released Year): 2 जानेवारी 2015

स्टोरी लाईन (Story Line): बाळगंगाधर टिळक यांच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट असून भारताच्या बदलत्या राजकारणाविषयी, टिळकांचे विचार, योगदान यावर हा चित्रपट आधारीत आहे.

स्टार कास्ट (Star Cast): सुबोध भावे, प्रिया बापट, अंगद म्हसकर, चिन्मय मांडलेकर

4) नटरंग (Natrang)

दिग्दर्शक (Director): रवी जाधव

रिलीज झाल्याचे वर्ष (Released Year): 1 जानेवारी 2010

स्टोरी लाईन (Story Line): डॉ.आनंद यादव यांच्या नटरंग या कादंबरीवर आधारलेला हा चित्रपट आहे. ही गुणा नावाच्या एका नाच्याची कहाणी आहे. त्याचे आयुष्य तमाशातील फडात नाचता नाचता तमाशा होऊन जाते

स्टार कास्ट (Star Cast): अतुल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, किशोर कदम, विभावरी देशपांडे

वाचा – मुंबईत साल्सा नृत्य वर्ग

5) बालगंधर्व (Balgandharva)

दिग्दर्शक (Director): रवी जाधव

रिलीज झाल्याचे वर्ष (Released Year): 6 मे 2011

स्टोरी लाईन (Story line): नारायण राजहंस म्हणेच बालगंधर्व यांच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट आहे. पण त्यांच्या आयुष्यातील काही खासगी गोष्टींमुळे त्यांचे आयुष्य पुरते बदलून जाते.

स्टार कास्ट (Star Cast): सुबोध भावे, किशोर कदम, अविनाश नारकर, किशोर कदम

6) डॉ. प्रकाश बाबा आमटे (Dr. Prakash Baba Amte)

दिग्दर्शक (Director): समृद्धी पोरे

रिलीज झाल्याचे वर्ष (Released Year): 10 ऑक्टोबर 2014

स्टोरी लाईन (Story Line):  हेमलकसा सारख्या दुर्गम भागात राहणाऱ्या डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट आहे.

स्टार कास्ट (Star Cast): नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी, मोहन आगाशे, भारत गणेशपुरे

वाचा – मराठी चित्रपट नवीन 2021

7) डॉ. काशिनाथ घाणेकर (Kashinath Ghanekar)

दिग्दर्शक (Director): अभिजीत देशपांडे

रिलीज झाल्याचे वर्ष (Released Year): 7 नोव्हेंबर 2018

स्टोरी लाईन (Story Line): डॉक्टर काशिनाथ घाणेकरांच्या आयुष्यावर आधारीत असा हा चित्रपट आहे. काशिनाथ घाणेकर हे मराठीतील पहिले सुपरस्टार त्यांचा जीवनप्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

स्टार कास्ट (Star Cast): सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी,सुमीत राघवन

Also Read List of 45 Heart Broken Films In Marathi

वाचा – मुंबईत पब आणि क्लब

8) ठाकरे (Thackrey)

दिग्दर्शक (Director): अभिजीत पानसे

रिलीज झाल्याचे वर्ष (Released Year): 25 जानेवारी 2019

स्टोरी लाईन (Story Line): टाईम्समधील कार्टुनिस्ट ते राजकारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनप्रवासातील काही महत्वपूर्ण घटना या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत.

स्टार कास्ट (Star Cast): नवाझुद्दीन सिद्दकी,अमृता राव, प्रकाश बेलावाडी

लव्हस्टोरी (Marathi Love Story Movies)

1) मुंबई- पुणे-मुंबई (Mumbai-Pune-Mumbai)

दिग्दर्शक (Director): सतीश  राजवाडे

रिलीज झाल्याचे वर्ष (Released Year): 11 जून 2010

स्टोरी लाईन (Story Line): पुण्याचा मुलगा आणि मुंबईची मुलगी यांची लव्हस्टोरी जुळणार का? हे सांगणारा हा चित्रपट… पण एका वेगळ्या अंदाजात तो चित्रपटातून मांडण्यात आला आहे. याचे सिक्वेन्सदेखील आले आहेत.

स्टार कास्ट (Star Cast): स्वप्निल जोशी, मुक्ता बर्वे

वाचा – मराठीतील विनोदी प्रसिद्ध डायलॉग्ज्स

2) टाईमपास (Timepass)

दिग्दर्शक (Director): रवी जाधव

रिलीज झाल्याचे वर्ष (Released Year): 3 जानेवारी 2014

स्टोरी लाईन (Story Line): एका रिक्षा चालकाचा मुलगा प्राजक्ता नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. शाळेत होणारे हे प्रेम टिकेल का? त्याला पालकांचा विरोध होईल का? ही कथा या ठिकाणी मांडण्यात आली आहे. या चित्रपटाचाही सिक्वेन्स येऊन गेला.

स्टार कास्ट (Star Cast): केतकी माटेगावकर, प्रथमेश परब, वैभव मांगले, भालचंद्र कदम, भूषण प्रधान

3) तुझं तू माझं मी (Tujha Tu Majha Mi)

दिग्दर्शक (Director): कुलदीप जाधव

रिलीज झाल्याचे वर्ष (Released Year): 16 जून 2017

स्टोरी लाईन (Story Line): एका प्रवासात दोघं भेटतात. प्रेम नसतानाही त्यांचे घरातील लग्न लावून देतात. या खोट्या नात्यात जगता जगता त्यांचे एकमेकांवर प्रेम होते.

स्टार कास्ट (Star Cast): ललित प्रभाकर,नेहा जोशी

4) प्रेमाची गोष्ट (Premachi Goshta)

दिग्दर्शक (Director): सतीश राजवाडे

रिलीज झाल्याचे वर्ष(Released Year): 1 फेब्रुवारी 2013

स्टोरी लाईन (Story Line): राम आणि सोनल त्यांच्या आपआपल्या वैवाहिक जीवनात खूश नसतात. ते एकमेकांना भेटतात. प्रेमात पडतात. ते त्यांच्या जोडीदाराला ही गोष्ट सांगणारच असतात. पण…

स्टार कास्ट (Star Cast): सारिका घाटगे, अतुल कुलकर्णी, सतीश राजवाडे,सुलेखा तळवळकर

5) कॉफी आणि बरचं काही (Coffee Ani Barach Kahi)

दिग्दर्शक (Director): प्रकाश कुंटे

रिलीज झाल्याचे वर्ष (Released Year): 3 एप्रिल 2015

स्टोरी लाईन (Story Line): जाई आणि अनिषच्या प्रेमाची ही कहाणी आहे. जाईचे त्याचा मॅनेजर निषादसोबत प्रेम असते. पण असे असूनही जाई वडिलांखातर अनिषशी भेटते. तिथे त्यांचे प्रेम जुळते.

स्टार कास्ट (Star Cast): प्रार्थना बेहरे, वैभव तत्ववादी, भूषण प्रधान, नेहा महाजन

6) चि. आणि चि. सौ.का.(Chi Ani Chi Sau Ka)

दिग्दर्शक (Director): परेश मोकाशी

रिलीज झाल्याचे वर्ष (Released Year): 19 मे 2017

स्टोरी लाईन (Story Line): ही सावित्री आणि सत्यप्रकाशची कहाणी आहे. लग्नासाठी त्यांचे एकमेकांना स्थळ येते. दोन वेगवेगळी माणसं एकत्र येताना काय होणार? यावर हा आधारीत चित्रपट आहे.

स्टार कास्ट (Star Cast): ललित प्रभाकर,मृण्मयी गोडबोले

7) मितवा (Mitwaa)

दिग्दर्शक (Director): स्वप्ना वाघमारे जोशी

रिलीज झाल्याचे वर्ष (Released Year): 13 फेब्रुवारी 2015

स्टोरी लाईन (Story Line): शिवम सारंग हा प्रेमावर कधीही विश्वास न ठेवणारा श्रीमंत.. नंदिनीच्या प्रेमात पडतो.पण तिचीही एक वेगळी स्टोरी आहे

स्टार कास्ट (Star Cast): स्वप्निल जोशी, सोनाली कुलकर्णी,प्रार्थना बेहरे

8) मला काही प्रॉब्लेम नाही (Mala Kahich Problem Nahi)

दिग्दर्शक (Director): समीर विध्वंस

रिलीज झाल्याचे वर्ष (Released Year): 11 ऑगस्ट 2017

स्टोरी लाईन (Story Line): अजय आणि केतकी हे लग्नाचा निर्णय फारच घाईत घेतात. पण नात्यात तेव्हा ट्विस्ट येतो जेव्हा लग्नानंतर ते आपआपल्या आयुष्यात व्यग्र होतात.त्यांच्या नात्यात येणाऱ्या अडचणी या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत.

स्टार कास्ट (Star Cast): स्पृहा जोशी, गश्मीर महाजनी, निर्मिती सावंत

9) तु ही रे (Tu Hi Re)

दिग्दर्शक (Director): संजय जाधव

रिलीज झाल्याचे वर्ष (Released  Year): 4 सप्टेंबर 2015

स्टोरी लाईन (Story Line): ही कथा भैरवी, सिद्धार्थ आणि नंदिनीची आहे.या तिघांमध्ये प्रेमाचा ट्रँगल होतो. हा गुंता कसा सुटणार

स्टार कास्ट (Star Cast): तेजस्विनी पंडीत, सई ताम्हणकर, स्वप्निल जोशी

10) व्हॉटसअप लग्न (What’s Up Lagna)

दिग्दर्शक (Director): विश्वास जोशी

रिलीज झाल्याचे वर्ष(Released Year): 16 मार्च 2018

स्टोरी लाईन (Story Line): प्रेमाची ही एक लेटेस्ट स्टोरी तरुणांनी पाहावी अशी आहे.

स्टार कास्ट (Star Cast): प्रार्थना बेहरे, वैभव तत्ववादी, शिल्पा तुळसकर, विक्रम गोखले, मोहन गोखले

अॅक्शन- सस्पेंन्स चित्रपट (Action-Suspense Movie)

1) लय भारी (Lai Bhari)

दिग्दर्शक (Director): निशिकांत कामत

रिलीज झाल्याचे वर्ष (Released Year): 11 जुलै 2014

स्टोरी लाईन (Story Line): हा चित्रपट एक फॅमिला ड्रामा आहे.बळजबरीने प्रॉपर्टी काढून घेतल्यानंतर सुमित्राचा दुसरा मुलगा माऊली आईसाठी कसा लढा देतो. त्याची विठ्ठल भक्ती यात दाखवण्यात आली आहे

स्टार कास्ट (Star Cast): रितेश देशमुख, राधिका आपटे,शरद केळकर, तन्वी अझमी

2) फास्टर फेणे (Faster Fene)

दिग्दर्शक (Director): आदित्य सरपोतदार

रिलीज झाल्याचे वर्ष (Released Year): 27 ऑक्टोबर 2017

स्टोरी लाईन (Story Line): प्रसिद्ध कॉमिक  फास्टर फेणे याचा हा चित्रपट व्हर्जन आहे.ही कथा मेडिकलमधील एका स्कॅमची आहे. याचा शोध बनेश फेणे कसा लावतो हे सांगणारा हा चित्रपट आहे.

स्टार कास्ट (Star Cast): अमेय वाघ, पर्ण पेठे, गिरीश कुलकर्णी, अंशुमन जोशी

3) सावरखेड एक गाव (Sawarkhed Ek Gaon)

दिग्दर्शक (Director): राजीव पाटील

रिलीज झाल्याचे वर्ष (Released Year): एप्रिल 2004

स्टोरी लाईन (Story Line): सावरखेड एक शांत आणि चांगल गाव असतं. पण या गावात अचानक काहीतरी अघटीत घडायला लागतं.

स्टार कास्ट (Star Cast): अंकुश चौधरी, श्रेयस तळपदे, सदाशिव अमरापुरकर, मकरंद अनासपुरे, सोनाली खरे

भयपट (Marathi Horror Movies)

1) सविता दामोदर परांजपे (Savita Damodar Paranjpe)

दिग्दर्शक (Director): स्वप्ना वाघमारे जोशी

रिलीज झाल्याचे वर्ष (Released Year): 31 ऑगस्ट 2018

स्टोरी लाईन (Story Line): ही एक हॉरर सस्पेंन्स कथा असून मागच्या एका जोडप्याला त्यांच्या काही चुकांचा कसा त्रास होतो यामध्ये दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट नाटकावरुन चित्रपटात रुपांतरीत करण्यात आला आहे.

स्टार कास्ट (Star Cast): तृप्ती तोरडमल,सुबोध भावे, राकेश वशिष्ठ, पल्लवी सुभाष, हेमांगी कवी

2) लपाछपी (Lapachappi)

दिग्दर्शक (Director): विशाल फुरिया

रिलीज झाल्याचे वर्ष (Released Year): 2016

स्टोरी लाईन (Story Line): गरोदर नेहाला तिचा नवरा घेऊन गावी येतो. गावी ती ज्या घरात असते त्या घरात काहीतरी घडलेले असते. तिथे तिला कोणाचा तरी भास होऊ लागतो. त्याचा ती मागोवा घेऊन झालेल्या चुका सुधारते.

स्टार कास्ट (Star Cast): पूजा सावंत, उषा नाईक, विक्रम गायकवाड

3) झपाटलेला (Zhapatlela)

दिग्दर्शक (Director) महेश कोठारे

रिलीज झाल्याचे वर्ष (Released Year): 1993

स्टोरी लाईन (Story Line): CID इन्स्पेक्टर महेश  तात्या नावाच्या एका आरोपीला मारतात. हा आरोपी मरताना त्याची आत्मा एका बाहुल्यात टाकतो. ही आत्मा पुन्हा एकदा शरीर मिळण्यासाठी धडपडते आणि कसा त्रास देते हे दाखवणारी ही कथा आहे.

स्टार कास्ट (Star Cast): लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, विजय चव्हाण,दिलीप प्रभावळकर

4) तुंबाड(Tumbbad)

दिग्दर्शक (Director): राहील अनिल बर्वे

रिलीज झाल्याचे वर्ष (Released Year): 12 ऑक्टोबर 2018

स्टोरी लाईन (Story Line): ही एक जुन्या काळातील कथा असून एका खजिन्याचा शोध एकाला लागतो. या ठिकाणी एक राक्षस असतो. या राक्षसाला मात देण्यासाठी आणि तेथील खजिना लुटण्यासाठी नेमकं काय करतात हे या कथेत असून ही कथा खिळवून ठेवते.

स्टार कास्ट (Star Cast): सोहम शहा, रोंजिनी चक्रवर्ती, अनिता दाते, ज्योती मालशे, मोहम्मद सामद

5) कनिका (Kanika)

दिग्दर्शक (Director): पुष्कर मनोहर

रिलीज झाल्याचे वर्ष (Released Year): 31 मार्च 2017

स्टोरी लाईन (Story Line): एक डॉक्टर आणि त्याची सहकारी अवैद्यरित्या गर्भाची चाचणी करतात. त्यानंतर त्यांना अनेक वाईट घटनांचा अनुभव येतो. हा चित्रपट हॉररपटात मोडणारा आहे.

स्टार कास्ट (Star Cast): स्मिता शेवाळे, शरद पोंक्षे

6) अनवट(Anvat)

दिग्दर्शक (Director): गजेंद्र अहिरे

रिलीज झाल्याचे वर्ष (Released Year): 25 जुलै 2104

स्टोरी लाईन (Story Line): घरातील वडीलधाऱ्यांच्या इच्छेनुसार एक जोडपं दूर गावात राहायला येते. काही काळानंतर त्यांना तेथे विचित्र अनुभव येऊ लागतात

स्टार कास्ट (Star Cast): उर्मिला कानिटकर, आदिनाथ कोठारे, मकरंद अनासपुरे, किशोर कदम, भार्गवी चिरमुले

7) उन्मत्त (Unmatta)

दिग्दर्शक (Director): महेश राजमाने

रिलीज झाल्याचे वर्ष (Released Year): 22 फेब्रुवारी 2019

स्टोरी लाईन (Story Line): साय- फाय असा हा चित्रपट असून टेलिपथीवर आधारीत असा हा चित्रपट आहे.

स्टार कास्ट (Star Cast): आरुषी वेदिका, संदीप ढबाले

फॅमिली ड्रामा (Marathi Family Drama Movie)

1) नटसम्राट (Natsamrat) 

दिग्दर्शक (Director): महेश मांजरेकर

रिलीज झाल्याचे वर्ष (Released Year): 1 जानेवारी2016

स्टोरी लाईन (Story Line): वि. वा. शिरवाडकरांच्या नटसम्राट या कादंबरीवर आधारीत असलेला हा चित्रपट असून ही गणपत बेलवलकर नावाच्या थिएटर आर्टीस्टची कहाणी आहे.

स्टार कास्ट (Star Cast): नाना पाटेकर, मेधा मांजरेकर, मृण्मयी गोडबोले, नेहा पेंडसे

2) दुनियादारी (Duniyadari) 

दिग्दर्शक (Director): संजय जाधव

रिलीज झाल्याचे वर्ष (Released Year): 19 जुलै 2013

स्टोरी लाईन (Story Line): जुन्या काळातील कॉलेजमधल्या मुलांची मस्ती, मैत्री, रँगिंग आणि फुलणारं प्रेम यावर आधारीत असा हा चित्रपट आहे. पुरेपूर ड्रामा असलेला हा चित्रपट मराठीमधील एक वेगळा प्रयत्न आहे.

स्टारकास्ट (Star Cast): स्वप्निल जोशी, सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, उर्मिला कानिटकर, जितेंद्र जोशी

3) क्लासमेट (Classmates)

दिग्दर्शक (Director): आदित्य सरपोतदार

रिलीज झाल्याचे वर्ष (Released Year): 16 जानेवारी 2015

स्टोरी लाईन (Story Line): सत्या आणि आदितीची एक अनोखी लव्हस्टोरी सांगणारा हा चित्रपट आहे. या दोघांचे एकमेकांवर प्रेम असते पण कॉलेजमधील इलेक्शन या दोघांना एकमेकांसमोर आणून ठेवते.

स्टारकास्ट (Star Cast): सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी,अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव,सिद्धार्थ चांदेकर, पल्लवी पाटील

4) सैराट(Sairat)

दिग्दर्शक (Director): नागराज मंजुळे

रिलीज झाल्याचे वर्ष(Released Year): 29 एप्रिल 2016

स्टोरी लाईन (Story Line): आर्ची आणि परश्या एकाच कॉलेजमध्ये शिकत असतात. जातीची बंधन झुगारुन ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. लहान वयातच ते स्वत:चा संसार उभा करतात. पण या प्रेमाचा शेवट ह्रदयद्रावक होतो.

स्टार कास्ट (StarCast): रिंकु राजगुरू,आकाश ठोसर, नागराज मंजुळे,तानाजी गालगुंडे

5) नाळ (Naal)

दिग्दर्शक (Director): सुधाकर रेड्डी यंक्कटी

रिलीज झाल्याचे वर्ष (Released Year): 16 नोव्हेंबर 2018

स्टोरी लाईन (Story Line): ही एका लहान मुलाची कथा आहे. ज्याला त्याची आई त्याच्यावर प्रेम करत नाही असे वाटते. या लहान मुलाच्या मनात नेमकं काय चाललं आहे हे अगदी सुंदरपद्धतीने सांगण्याचा यामध्ये प्रयत्न करण्यात आला आहे.

स्टारकास्ट (Star Cast): श्रीनिवास पोकळे, देविका दफ्तरदार, नागराज मंजुळे

6) श्वास(Shwaas) 

दिग्दर्शक (Director): संदीप सावंत

रिलीज झाल्याचे वर्ष (Released Year): 2004

स्टोरी लाईन (Story Line): ही एक आजोबा आणि नातूची ह्रदयस्पर्शी कहाणी आहे. नातवाला कॅन्सर झाल्यानंतर त्याला उर्वरित आयुष्याचा खरा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतात.या चित्रपटाला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

स्टारकास्ट (Star Cast): अरुण नलावडे, अश्विन चितळे,संदीप कुलकर्णी,अमृता सुभाष

7) देऊळ बंद (Deool Band) 

दिग्दर्शक (Director): प्रवीण तरडे,प्रणीत कुलकर्णी

रिलीज झाल्याचे वर्ष (Released Year): 31 जुलै 2015

स्टोरी लाईन (Story Line): देवाचे अस्तित्व न मानणारा डॉ. राघव भारतात आल्यानंतर येथील लोकांना देवाची पूजा करताना पाहतो. लोकांना यातून बाहेर काढण्यासाठी तो चक्क देवाला चॅलेंज देतो.

स्टारकास्ट (Star Cast): गश्मीर महाजनी, गिरिजा जोशी, मनोज जोशी, रवींद्र महाजनी

8) गुलाबजाम (Gulabjaam)

दिग्दर्शक (Director): सचिन कुंडलकर

रिलीज झाल्याचे वर्ष (Released Year): 16 फेब्रुवारी 2018

स्टोरी लाईन (Story Line): अमेरिकेत राहणारा आदित्य पुण्यात टीफिन पुरवणाऱ्या राधाकडून जेवण शिकायला येतो. उत्तम स्वयंपाक करणारी राधा त्याला जेवण शिकवण्यास तयार होणार का ? हे सांगणारा हा चित्रपट आहे.

स्टारकास्ट (Star Cast): सिद्धार्थ चांदेकर, सोनाली कुलकर्णी, मधुरा देशपांडे, प्रिया बापट

9) मुरांबा (Muramba)

दिग्दर्शक (Director): वरुण नार्वेकर

रिलीज झाल्याचे वर्ष (Released Year): 2 जून 2017

स्टोरी लाईन (Story Line): आलोक आणि इंदू खूप वर्षांचे रिलेशनशीप एका फोन कॉलवर संपवतात. ही गोष्ट जेव्हा त्यांच्या पालकांना कळते. तेव्हा काय होतं ? हे सांगणारा हा चित्रपट आहे.

स्टारकास्ट (Star Cast): मिथिला पालकर, अमेय वाघ, चिन्मयी सुमीत, सचिन खेडेकर

10) हॅपी जर्नी (Happy Journey)

दिग्दर्शक (Director): सचिन कुंडलकर

रिलीज झाल्याचे वर्ष (Released Year): 28 नोव्हेंबर 2014

स्टोरी लाईन (Story Line): परदेशात राहणारा निरंजन बहिणीच्या निधनानंतर देशात परततो. घरापासून नात्यांपासून दुरावलेल्या निरंजनला त्याची मृत बहीण दिसत राहते. तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारा आणि बहीण- भावाचे नाते दाखवणारा हा चित्रपट आहे.

स्टारकास्ट (Star Cast): अतुल कुलकर्णी, प्रिया बापट, पल्लवी सुभाष, चित्रा पालेकर

विनोदी चित्रपट (Marathi Comedy Movies)

1) अशी ही बनवाबनवी (Ashi Hi Banvabanvi) 

बनवाबनवी हा विनोदी चित्रपट अगदी कधीही पाहिलात तरी तो एव्हरग्रीन आहे. लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, अशोक सराफ, निवेदिता सराफ, सुप्रिया पिळगावकर, अश्विनी भावे यांचा हा एव्हरग्रीन चित्रपट.. या चित्रपटातील धमाल कॉमेडी.. आणि धनंजय माने आजही अनेकांच्या लक्षात आहे. जर तुम्ही हा चित्रपट पाहिला नसेल तर तुम्ही हा चित्रपट आवर्जून पाहायला हवा.

दिग्दर्शक (Director): सचिन पिळगावकर

रिलीज झाल्याचे वर्ष (Released Year): 23 सप्टेंबर 1988

स्टोरी लाईन (Story Line): पुण्यात कामासाठी आलेला धनंजय माने आणि त्याचा भाऊ भाड्याचे घर मिळवण्यासाठी त्याच्या दोन मित्रांना त्यांची बायको बनून राहण्यासाठी स्त्री वेशभूषा करायला भाग पाडतात. जी खोली त्यांना भाड्याने हवी असते त्या ठिकाणी केवळ विवाहित जोडप्यांनाच परवानगी असल्यामुळे ते असे करायचे ठरवतात. पण त्या सगळ्यांमध्ये फारच गोंधळ होतो.

स्टार कास्ट (Star Cast): सचिन पिळगावकर, अशोक सराफ,लक्ष्मीकांत बेर्डे, अश्विनी भावे, सिद्धार्थ रे, प्रिया बेर्डे, सुप्रिया पिळगावकर, विजू खोटे.सुधीर जोशी, निवेदिता सराफ

2) दे धक्का (De Dhakka)

दिग्दर्शक (Director): अतुल काळे, सुदेश मांजरेकर

रिलीज झाल्याचे वर्ष (Released Year): 16 मे 2008

स्टोरी लाईन (Story Line): खेड्यात राहणारा  मकरंद जाधव घरातील हालाखीची परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपल्या मुलीला एका डान्सच्या स्पर्धेसाठी मुंबईला घेऊन जाण्याचा निर्णय घेतो.ही स्पर्धा जिंकल्यानंतर त्यांना खूप मोठी रक्कम बक्षीस म्हणून मिळणार असते.  त्यांचा गाव ते मुंबईचा प्रवास आणि मकरंदची मुलगी ही स्पर्धा जिंकणार का? हे सांगणारा हा सगळा प्रवास आहे.

स्टारकास्ट (Star Cast): मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम, ऋषिकेश जोशी, सक्षम कुलकर्णी, मेधा मांजरेकर, गौरी वैद्य, संजय खापरे

3) बॉईज (Boyz)

दिग्दर्शक (Director): विशाल देवरुखकर

रिलीज झाल्याचे वर्ष (Released Year): 8 सप्टेंबर 2017

स्टोरी लाईन (Story Line): तीन शाळेच्या मुलांभोवती फिरणारे हे कथानक आहे. हॉस्टेलमध्ये आल्यानंतर होणारी मजामस्ती आणि या वयात असणारे आकर्षण यामधून घडणारे विनोद या चित्रपटाचा USB आहे.

स्टारकास्ट (Star Cast): सनी लिओन, रितिका श्रोत्री, शिल्पा तुळसकर,पार्थ भालेराव, सुमंत शिंदे,भालचंद्र कदम, वैभव मांगले, संतोष जुवेकर

4) पोश्टर बॉईज (Poster Boys)

दिग्दर्शक (Director): समीर पाटील

रिलीज झाल्याचे वर्ष (Released Year): 1 ऑगस्ट 2014

स्टोरी लाईन (Story Line): तीन वेगवेगळ्या वयोगटाच्या पुरुषांचे फोटो नसबंदीच्या जाहिरातीवर लावले जातात. त्या एका जाहिरातीमुळे तिघांचे आयुष्य एका रात्रीत बदलून जाते. यातून घडणारी कॉमेडी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

स्टारकास्ट (Star Cast): श्रेयस तळपदे, दिलीप प्रभावळकर, ऋषिकेश जोशी, अनिकेत विश्वासराव, नेहा जोशी, पुजा सावंत

5) अगं बाई अरेच्चा (Aga Bai Arrecha!)

दिग्दर्शक (Director): केदार शिंदे

रिलीज झाल्याचे वर्ष (Released Year): 2004

स्टोरी लाईन (Story Line): श्रीरंग देशमुख यांना महिलांच्या मनात नेमकं काय सुरु असतं हेच कळत नसतं. कामाच्या ठिकाणी,घरी महिलांच्या मनात काय सुरु आहे ते कळत नसतं. त्याला देवाकडून महिलांच्या मनातील ऐकण्याचे वरदान मिळते आणि मग त्यातूनच चित्रपट खुलत जातो.

स्टार कास्ट (Star Cast): प्रियांका यादव, संजय नार्वेकर, दिलीप प्रभावळकर,शुभांगी गोखले, भारती आचरेकर, विजय चव्हाण

6. वळू(Valu)

दिग्दर्शक (Director): उमेश विनायक कुलकर्णी

रिलीज झाल्याचे वर्ष (Released Year): 25 जानेवारी 2008

स्टोरी लाईन (Story Line): एका गावात एक वळू म्हणजेच एक मोठा बैल.. येतो. त्याला पकडण्यासाठी फॉरेस्ट ऑफिसर येतात.ते या वळूच्या शोधावर एक डॉक्युमेंटरी बनवतात. त्यावेळी येणारी गंमत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या चित्रपटाचा शेवट.

स्टार कास्ट (Star Cast): गिरीश कुलकर्णी, अतुल कुलकर्णी, उर्मिला मातोंडकर,मोहन आगाशे, अमृता सुभाष, वीणा जामकर, दिलीप प्रभावळकर

7. जत्रा: ह्यालागाड रे त्यालागाड रे (Jatra)

दिग्दर्शक (Director): केदार शिंदे

रिलीज झाल्याचे वर्ष (Released Year): 2006

स्टोरी लाईन (Story Line): ही कथा ह्यालागाड आणि त्यालागाड या दोन गावांची आहे. या दोन गावांमध्ये एक दरवर्षी जत्रेदरम्यान एक स्पर्धा रंगत असते. या स्पर्धेदरम्यान एका गावाचा माणूस दुसऱ्या गावात अडकतो आणि मग त्याला काढण्यासाठी दुसऱ्या गावातील माणसांचा जो गोंधळ उडतो.ते सांगणारी ही कथा आहे.

स्टार कास्ट (Star Cast): भरत जाधव, क्रांती रेडकर,सिद्धार्थ जाधव, विजय चव्हाण, प्रिया अरुण, उपेंद्र लिमये

8. नवरा माझा नवसाचा (Navra Maza Navsacha)

दिग्दर्शक (Director): सचिन पिळगावकर

रिलीज झाल्याचे वर्ष (Released Year): एप्रिल 2005

स्टोरी लाईन (Story Line): वक्रतुंड लहान असताना त्याच्या आईने केलेला अजब नवस फेडण्याचा प्रयत्न त्याची बायको करते. तो नवस इतका विचित्र असतो की, तो नवस करताना त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

स्टारकास्ट (Star Cast): सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर,अशोक सराफ, सोनू निगम, रिमा लागू, किशोरी शहाणे, विजू खोटे

9. इश्शय! (Ishhya)

दिग्दर्शक (Director): प्रशांत गिरकर

रिलीज झाल्याचे वर्ष (Released Year): 2006

स्टोरी लाईन (Story Line): पुरुषाने गरोदर होणे ही केवळ फँटसीच असू शकते. पण एके दिवशी  वैभव नावाच्या एका व्यक्तीच्या आयुष्यात असे काही होते. एके सकाळी उठल्यानंतर तो त्याला अचानक मळमळू लागते. त्याला असा त्रास होणे हे गरोदरपणाचे लक्षण आहे हे कळल्यानंतर त्याला तो गरोदर आहे हे कळते. त्यानंतर घडलेली सगळी घटना या चित्रपटात दाखवण्यात आली.

स्टारकास्ट (Star Cast): अंकुश चौधरी, श्वेता शिंदे,तृप्ती भोईर, विजय चव्हाण, भरत जाधव

10. येरे येरे पैसा (Yere Yere Paisa)

दिग्दर्शक (Director): संजय जाधव

रिलीज झाल्याचे वर्ष (Released year): 5 जानेवारी 2018

स्टोरी लाईन (Story Line): ही कथा 5 जणांची आहे.वेगवेगळ्या बॅकराऊंडची 5 जण एकमेकांच्या आयुष्यात येतात. त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठीची त्यांची ही धडपड आणि त्यातून घडणारी कॉमेडी यामध्ये दाखवण्यात आली आहे.

स्टारकास्ट (Star Cast): तेजस्विनी पंडीत, मृणाल कुलकर्णी,सिद्धार्थ जाधव,उमेश कामत

आता वीकेंडला कशाला जाता घराबाहेर पाहा हे मराठी चित्रपट घरच्या घरी…

Read More From बॉलीवूड