Fitness

त्वचेच्या समस्या आणि त्वचा रोग घरगुती उपाय | Skin Problems Solution In Marathi

Leenal Gawade  |  Dec 3, 2020
Skin Problems Solution In Marathi

भारतासारख्या देशात त्वचेसंदर्भात अनेक तक्रारी आढळतात. खरुज, नायटा, गजकर्ण हे काही त्वचा विकार शरीरासाठी फारच त्रासदायक असतात. पण थोडीशी काळजी घेतली आणि योग्य औषधोपचार केले की, त्वचा रोग बरा होण्यास मदत मिळते. त्वचा रोगासंदर्भात तुम्हाला काही माहिती नसेल तर आज आपण त्वचेसंदर्भातील अशाच त्वचा रोगांची माहिती घेऊया. ही महत्वपूर्ण माहिती वाचून तुम्हाला त्वचेसदंर्भातील समस्यांवर योग्य निर्णय घेता येईल. जाणून घेऊया त्वचा रोगाचे प्रकार आणि त्वचा रोग घरगुती उपायासंदर्भात अत्यंत महत्वाची माहिती

त्वचा रोगाचे प्रकार आणि त्वचा रोग घरगुती उपाय – Skin Problems Solution In Marathi

त्वचा रोगाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यांची लक्षणे आणि त्यांचा त्रासही तितकाच वेगळा आहे. त्यामुळे यांच्याबद्दल जाणून घेत त्यांच्यावरील सोपे आणि परिणामकारक अशा घरगुती उपायांची माहिती घेणेही गरजेचे आहे. चला जाणून घेऊया हे त्वचा विकार

त्वचा फुटणे (Cold Sore)

Instagram

थंडीत त्वचा फुटण्याचा त्रास हा सगळ्यांनाच होतो. पण हा त्रास जर तुम्हाला वर्षभर होत असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज आहे. कारण जर तुमची त्वचा फुटत असेल तर तुमच्या त्वचेला काही अंतर्गत त्रास असण्याची दाट शक्यता आहे. त्वचा फुटण्याचा हा त्रास अधिक त्रासदायक त्यावेळी  वाटतो. ज्यावेळी त्वचा फुटते आणि तिथे जखमा होऊ लागतात. त्वचेच्या खपल्या पडू लागतात. त्वचा फुटण्याचा हा त्रास वेळीच निस्तरायचा असेल तर तुम्ही त्वचेची काळजी  योग्यवेळी घेणे फारच गरजेचे आहे. अगदी साध्या सोप्या उपायांनी तुम्हाला तुमच्या त्वचेची काळजी घेता येऊ शकते.

घरगुती उपाय (Solution):

वाचा – Kadulimba Che Fayde In Marathi

पिंपल्स (Acne)

Instagram

पिंपल्स आले नसतील अशी एकही व्यक्ती पृथ्वीतलावर नसेल. पिंपल्सचा त्रास हा सगळ्यांनाच असतो. पण पिंपल्स सतत येत असतील आणि ते त्वचेवरुन जाण्याचे नावच घेत नसतील तर हा एक गंभीर त्रास असू शकतो. कारण पिंपल्स नुसते चेहऱ्यावर येत नाहीत. तर तुमच्या संपूर्ण शरीरावर येऊ शकतात. पिंपल्सकडे दुर्लक्ष केले की, त्यामध्ये पू साचण्याची शक्यता असते. असे पिंपल्स फोडले की, त्वचेवर खड्डे पडतात आणि त्यामुळे सौंदर्य बिघडते. पिंपल्सचा त्रास हा साधारण 15 वर्षांपासून सुरु होतो किंवा शरीरात हार्मोन्स बदलू लागले की, हा त्रास अधिक जाणवून लागतो. तेलकट त्वचा असेल तर हा त्रास अधिक तापदायक होऊ लागतो. पिंपल्सवर आतून आणि बाहेरुन असे दोन्ही उपाय होणे गरजेचे असते.

घरगुती उपाय (Solution):

वाचा – सुरमा त्वचा रोग माहिती आणि उपाय

त्वचेवरील लालिमा (Rosacea)

Instagram

गाल लालबुंद दिसावे असे अनेकांना वाटते. काश्मीर किंवा पहाडी मुलींचे लाल गाल पाहिल्यानंतर आपल्यालाही तसेच गाल असावे असे वाटते. पण तुम्हाला माहीत आहे का? त्वचेवरील लालिमा हा देखील एक त्वचा रोग आहे. चेहऱ्यावर येणारी ही लालिमा अनेक कारणांमुळे येऊ शकते. सूर्यप्रकाशात जास्त काळासाठी राहणे किंवा रोझेशिआ नावाच्या त्रासामुळेही त्वचेवर अशा प्रकारे लाली येऊ शकते. या त्रासामध्ये त्वचेमध्ये असणाऱ्या रक्तवाहिन्या पातळ होतात. त्यामुळेच रक्ताचा लालसरपणा हा त्वचेवर अगदी सहज दिसू लागतो.  यावर योग्य उपचार होणे फारच गरजेचे असते. असे झाले नाही. तर त्वचा ही दिवसेंदिवस अधिक लाल होत जाते. त्वचेची ही अशी स्थिती सुधारण्यासाठी खूप कालावधीही लागतो.

घरगुती उपाय (Solution):

वाचा – उन्हाळ्यात येणाऱ्या घामोळ्यांवर घरगुती उपाय

सेल्युलाईटिस (Cellulitis)

Instagram

सेल्युलाईटिस हा त्वचेसंदर्भातील गंभीर आजार आहे. हा आजार पायांच्या त्वचेला होतो. जर याचा त्रास अधिक वाढला तर हा त्रास चेहरा आणि हात या भागांनाही होण्याची दाट शक्यता असते. सेल्युलाईटिस हा एक संसर्गजन्य आजार असून हा आजार शरीरात पसरण्याची जास्त शक्यता असते. यामध्ये सेल्युलाईटिस झालेली त्वचा ही लालसर, सुजलेली दिसू लागते. त्वचेची एखादी जखम, प्राण्यांचा चावा, अल्सर, दुखापत या सगळ्या कारणांमुळे सेल्युलाईटिस होण्याची शक्यता असते. या रोगाकडे दुर्लक्ष करुन मुळीच चालत नाही. कारण यामध्ये तुम्हाला तापही येऊ शकतो. ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते.

घरगुती उपाय (Solution):

वाचा – त्वचा रोग आणि आयुर्वेदिक उपाय

गोवर (Measles)

Instagram

गोवर हा लहान मुलांमध्ये आढळून येणारा गंभीर असा त्वचा रोग आहे. हा केवळ त्वचा रोग नाही तर हा वेगळ्या कारणामुळे होतो आणि यामध्ये तापही येते. पण गोवर आल्याचे तुमच्या त्वचेवर पुरळ आल्यानंतर लक्षात येते. गोवरमुळे आतापर्यंत अनेक लहान बाळांचे मृत्यू झाले आहेत. गोवरवर योग्य अशी लस उपलब्ध असून लहान मुलांना ती पहिल्या वाढदिवाच्या आधीच दिली जाते. लहान मुलांच्या लसीकरणामध्ये याचा समावेश असतो. गोवरप्रमाणेच असणारा आणखी एक त्रास असतो नागीण. नागीण या आजाराची माहिती ही तुम्ही घेणे गरजेचे आहे. 

घरगुती उपाय (Solution):

त्वचा क्षय (Lupus)

Instagram

लुपस हा असा त्वचा रोग असून या त्वचा रोगामुळे अन्य अवयवांवरही परिणाम होण्याची दाट शक्यता असते. या ऑटोइम्यून अशा आजारामुळे मेंदू, ह्रदय, मूत्रपिंड, फुफ्फुसे अशा अवयवांनाही हानी पोहोचण्याची शक्यता असते.लुपसचा त्रास सुरु झाला की, त्वचेवर वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. डोळ्याखाली सूज येऊ लागते. त्वचेवरील काही भाग लाल दिसू लागतो. हातापायाची बोटं निस्तेज आणि जांभळी दिसू लागतात. चेहऱ्यावर ‘बटरफ्लाय रॅशेश’ दिसू लागतात.

घरगुती उपाय (Solution):

पांढरे कोड (Vitiligo)

Instagram

पांढरे कोड हा त्वचा रोग त्वचेतील रंगद्रव्यामुळे होते. आपले शरीर मेलनिन अर्थात रंगद्रव्याची निर्मिती करत असते. ही निर्मिती थांबली की, त्वचेवर पांढरे चट्टे यायला सुरुवात होते. हे चट्टे सुरुवातीला वेगवेगळ्या ठिकाणी दिसत राहतात. जर यावर योग्य उपाय केला नाही तर हा त्रास वाढतो आणि संपूर्ण शरीरावर चट्टे येत राहतात. दिसायला कोडं भयंकर दिसत असले तरी त्याचा फारसा त्रास होत नाही.उन्हात गेल्यानंतर हा भाग लाल होतो आणि त्वचा जळू लागते.

घरगुती उपाय (Solution):

नायटा (Ringworm)

Instagram

अपुऱ्या स्वच्छतेमुळे होणारा आणखी एक आजार म्हणजे ‘नायटा’ नायटा हा वेगवेगळ्या प्रकाराचे असतात. नायटा हा पसरत जाणारा आजार आहे. यामध्ये त्वचेला खूप खाज सुटते. हा आजार बुरशीमुळे होतो. अपुरी स्वच्छता, ओले कपडे, एकमेकांचे कपडे घालणे या सगळ्यामुळे हा आजार अधिक बळावण्याची शक्यता असते. खरुज, नायटा, गजकर्ण हे एकाच प्रकारातील असून हा त्रास गुप्तांगाकडे जास्त जाणवतो. यामध्ये सतत खाज येत राहणे, त्वचेचा दाह होणे, खरपुड्या पडणे, त्वचा सुकणे असा त्रास होऊ लागतो.

घरगुती उपाय (Solution):

वांग (Melasma)

Instagram

त्वचेवरील पिग्मेंटेशेन जास्त झाले की, त्वचा वेगळीच दिसू लागते. त्वचा काळवंडल्यासारखी आणि वयस्क दिसू लागते. वांगचा त्रास हा महिलांना अगदी कोणत्याही वयात होऊ शकतो. हा त्रास प्रामुख्याने चेहऱ्यावर होतो. त्यामुळेच त्वचा ही वेगळी दिसू लागते.आपल्या त्वचेत रंगद्रव्य निर्माण करणाऱ्या पेशींमुळे आपल्याला रंग प्राप्त होत असतो. ज्याला मेलानोसाईट्स असं म्हटलं जातं. मेलानोसाईट्स मेलनिनचं उत्पादन करतात. ज्यामुळे त्वचेला रंग मिळतो. जेव्हा मेलानोसाईट्स प्रभावित होतात तेव्हा त्वचेतील काही भाग जास्त प्रमाणात मेलनिन निर्माण होतं. ज्यामुळे त्वचेच्या काही भागाचा रंग हा इतर भागाच्या तुलनेत जास्त गडद दिसू लागतो

घरगुती उपाय (Solution):

मस्सा (Wart)

Instagram

त्वचेसंदर्भातील हा त्रास फारसा त्रासदायक वाटत नसला तरी देखील तुमच्या सौंदर्यात बाधा आणण्याचे काम मस्सा करते. असे म्हणतात की, तुमच्या त्वचेवर एखादी जखम झाली असेल त्या ठिकाणी तुमची त्वचा उघडी झाली असेल तर काही ठराविक जंतू संसर्गामुळे तुम्हाला मस्सा येण्याची शक्यता असते. मस्सा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पसरु शकतो. मस्साचे वेगवेगळे प्रकार असतात. मस्सा हा त्वचेच्या कोणत्याही भागावर होऊ शकतो. हात, हाताचा तळवा, पाय- पायाचा तळवा असा कुठेही मस्सा येऊ शकतो. मस्सा हा एखाद्या तीळाप्रमाणे दिसू शकतो. पण नंतर तो वाढत जातो. कधी तो चॉकलेटी दिसतो तर कधी तो लालही दिसतो. शरीरावरील मस्सा वाढण्याआधीच तुम्ही त्याची योग्य काळजी घ्यायला हवी.

घरगुती उपाय (Solution):

सोरायसिस (Psoriasis)

Instagram

त्वचा रोगासंदर्भातील हा आणखी एक आजार आहे. हा आजार अनुवंशिक किंवा कोणत्याही जंतू संसर्गामुळे होत नाही. सोरायसिसमध्ये त्वचेवर पांढऱ्या रंगाचे चट्टे येतात, त्वचेचा भुसा पडू लागतो ही काही सोरायसिसची लक्षणे आहेत. त्वचेवर एखादी जखम झाली आणि त्याकडे दुर्लक्ष केले गेले की, ती वाढण्याची शक्यता असते. सोरायसिसची सुरुवात नेमकी कशी होते ते कळत नाही. ते अद्याप कोणालाही कळलेले नाही. त्वचेची ही जखम अचानक वाढू लागते. हे चट्टे खूप वाढू लागतात. त्वचेवरुन साल निघाल्याप्रमाणे त्वचा सोलू लागते. मृत त्वचा निघणे असे पहिले लक्षण सोरायसिसमध्ये दिसू लागते.

घरगुती उपाय (Solution):

इसब (Eczema)

Instagram

‘इसब’ हा त्वचा रोग असून यामध्ये त्वचेला खूप खाज येते. ही खाज इतकी असह्य असते की, त्वचा सतत खाजवल्यामुळे त्वचेला खूप जखमा होतात. या जखमा इतक्या खोलवर होत जातात की, त्वचा नाजूक होऊन जाते आणि त्वचेतून कधी कधी रक्तही येऊ लागते. इसब हा त्वचेचा त्रास अनेक कारणामुळे होतो. अस्वच्छता हे त्यामागील सगळ्यात पहिले कारण आहे.  त्वचा रोगाच्या या प्रकारामध्ये त्वचेवर लाल चट्टे उठणे, त्वचेवर खरपुड्या येणे आणि त्वचेवर कोरडे पॅच तयार होणे असे काही त्रास होऊ लागतात. तुम्हाला जर असा त्रास होऊ लागला असेल तर तुम्ही घरातच राहून याची काळजी घ्या. इसबची संपूर्ण माहिती जाणून घेणेही तितकेच गरजेचे आहे.

घरगुती उपाय (Solution):

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

त्वचेसंदर्भातील एक सर्वसाधारण त्रास कोणता?

वातावरण बदलानुसार त्वचेच्या अनेक सर्वसाधारण तक्रारी असतात. त्वचा फुटणे, मुरुमं येणे, पुळ्या पुटकुळ्यांनी चेहरा भरणे असा त्रास आहारात आणि वातावरणात बदल झाला की, अगदी साहजिकपणे होतो. पण त्वचेसंदर्भातील या त्रासाचे योग्यवेळी निवारणही करता येते. घरगुती उपाय आणि त्वचा रोग तज्ज्ञांच्या मदतीने हे त्रास कमी करता येतात. 

त्वचेसंदर्भातील कोणत्या तक्रारी घरच्या घरी सोडवता येतात?

मुरुमं, त्वचा फुटणे, पुटकुळ्या, त्वचेवरील लालिमा यांना घरच्या घरी कमी करता येऊ शकते. काही सोपे आणि साधे घरगुती उपाय हे यासाठी फारच फायदेशीर असतात. ज्यांचा उपयोग तुम्ही करु शकता. या शिवायही त्वचेच्या अन्य काही समस्या केवळ काळजी घेत सोडवता येतात. 

सगळ्यात वाईट त्वचारोग कोणता?

प्रत्येकाची शरीरप्रवृत्ती ही वेगळी असते. त्यानुसार होणारा त्वचा रोग तुम्हाला त्रासदायक ठरत असतो.काहींची सहनशक्ती आणि प्रतिकारशक्ती फारच चांगली असते. त्यामुळेच त्यांना त्वचेच्या इतर समस्यांचा फारसा परिणाम होत नाही. तर काहींना अगदी साध्या त्वचा रोगानेही त्रास होऊ लागतो. त्यामुळे सगळेच त्वचा रोग हे थोडयाफार फरकाने परिणामकारकच असतात. 

त्वचा रोगाचे प्रकार आणि घरगुती उपाय जाणून घेतल्यानंतर ही माहिती पुढेही पाठवायला विसरु नका. 

Read More From Fitness