DIY सौंदर्य

त्वचा अधिक कसदार (टाईट) करण्यासाठी सोप्या टिप्स (Skin Tightening Tips In Marathi)

Dipali Naphade  |  Nov 3, 2020
Skin Tightening Tips In Marathi

आपण सुंदर दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर सुरकुत्या आणि त्वचा कसदार न राहणं या गोष्टी सुरू होतातच. साधारण वयाच्या तिशीनंतर चेहऱ्यावर वेगवेगळे परिणाम दिसून येतात. विशेषतः त्वचा सैल पडण्यास सुरूवात होते. जो प्रत्येकासाठी चिंतेचा विषय आहे. ज्यांना आपण नेहमी तरूण दिसावं असं वाटतं त्यांच्यासाठी तर अगदीच त्रासदायक ठरतं. त्यामुळे त्वचा अधिक कसदार अर्थात टाईट करण्यासाठी काही सोप्या टिप्स POPxo मराठीची टीम तुम्हाला देत आहे. या टिप्स वापरून तुम्ही घरच्या घरी उपयोग करून तुमची त्वचा अधिक कसदार ठेऊ शकता. या अतिशय सोप्या टिप्स (skin tightening tips in marathi) असून याचा वापर करणंही सोपं आहे. तसंच तुम्हाला तुमच्या घरातील गोष्टींचा वापर करून याचा उपयोग करून घेता येतो. जाणून घेऊया काय आहेत या सोप्या टिप्स.

त्वचा टाईट करण्यासाठी काही सोप्या टिप्स (Skin Tightening Tips In Marathi)

त्वचा सैलसर होणं कोणालाही आवडत नाही. त्यामुळे घरच्या घरी काही सोपे उपाय करता येतात आणि या सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे देत आहोत. त्वचा टाईट करण्यासाठी तुम्ही काही घरच्या वस्तूंचा उपयोग करून त्वचेची काळजी घेऊ शकता. कशा प्रकारे याचा उपयोग करता येईल ते पाहूया. 

कॉफी पावडर (Coffee Powder)

Shutterstock

अँटिऑक्सिडंट वाढत्या वयाचा प्रभाव कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. कॉफीमध्ये अँटिऑक्सिडंट गुण आढळतात. त्यामुळे कॉफीचा उपयोग सैलसर त्वचा टाईट करण्यासाठी करता येतो. सध्या कॉफी स्क्रबची चलती आहे. यामुळे त्वचेमध्ये बराच फरक पडतो आणि त्वचा अधिक सुंदर दिसण्यासाठी आणि त्वचेवरील घाण स्वच्छ करण्यासाठीही याचा उपयोग करून घेता येतो. कॉफी स्क्रब घरच्या घरीही तयार करता येतो. त्यामुळे केवळ बाजारात जाऊन आणावा लागेल असा समज करून घेऊ नका.  सोप्या टिप्स अवलंबून तुम्ही तुमची काळजी घेऊ शकता. 

कसा करावा वापर – 

कोरफड जेल (Aloe-Vera Gel)

Shutterstock

कोरफड जेल ही त्वचेसाठी उत्तम मानली जाते. त्वचेच्या कोणत्याही समस्या असतील तर कोरफड जेलचा वापर करणं सोयीस्कर ठरते. कोरफडमध्ये अनेक प्रकारचे फाईटोकेमिकल्स आढळतात, जे त्वचेला सुरक्षा देण्याचे काम करतात. यामुळे त्वचेवर अधिक उजळपणा येतो आणि वाढत्या वयाचा परिणाम कमी होण्यास फायदेशीर ठरते. 

कसा करावा वापर – 

तुरटी (Alum)

Shutterstock

त्वचा अधिक कसदार होण्यासाठी तुरटीचा चांगला फायदा मिळतो. कारण यामध्ये अँटिपर्सपिरेंट्स (Antiperspirant) असल्याने त्वचा अधिक कसदार होते. यामध्ये अल्युमिनिअम, जिंक आणि मँगनीज याचा मेळ असल्याने त्वचेला अधिक टाईट ठेवण्यास फायदेशीर ठरते. तसंच यामध्ये अल्युमिनिअमचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे बऱ्याचजा घरच्या घरी चेहऱ्यावर तुरटीचा वापर करणे उत्तम ठरते. 

कसा करावा वापर – 

टोमॅटो (Tomato)

Shutterstock

त्वचा टाईट होण्यासाठी तुम्ही टॉमेटोचाही उपयोग करून घेऊ शकता. टॉमेटोमध्ये विटामिन सी असते, जे त्वचेला अधिक उजळ बनविण्याचे आणि त्वचा अधिक टाईट करण्याचे काम करते. तसंच टॉमेटोमधील अँटिऑक्सिडंट्स त्वचेला अधिक सुंदर बनविण्यास मदत करतात. तसंच टॉमेटो हे अतिशय स्वस्तही असतात आणि खिशाला परवडण्यासारखा उपाय  आहे. 

कसा करावा वापर – 

लिंबाचा रस (Lime Juice)

Shutterstock

विटामिन सी हे त्वचा अधिक कसदार करण्यासाठी उपयुक्त ठरते हे आम्ही तुम्हाला आधीदेखील सांगितले आहे. लिंबाच्या रसामध्ये विटामिन सी चे प्रमाण अधिक असते. त्यामुळे स्किन टाईटनिंगसाठी लिंबाच्या रसाचा उपयोग करून घेता येतो. घरात कायम उपलब्ध  असणारा आणि पटकन करता येण्याजोगा हा उपाय आहे. त्यामुळे ही सर्वात सोपी टिप म्हणून याचा वापर तुम्ही करून घेऊ शकता. 

कसा करावा वापर – 

मुलतानी माती (Multani Mitti)

Shutterstock

मुलतानी माती त्वचेवर वापरून फायदा मिळतो. यामुळे त्वचेला नैसर्गिक मॉईस्चराईजर मिळते. तसंच मुरूमं हटविण्यासाठी आणि सनबर्नवर उपचार करण्यासाठी आणि त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. यामुळे त्वचा अधिक उजळते आणि एजिंग अर्थात वय कमी दर्शविण्यासाठीही याचा उपयोग होतो. त्वचा अधिक कसदार होते आणि मऊ आणि मुलायमही राहाते. 

कसा करावा वापर – 

पपई (Papaya)

Shutterstock

वाढत्या वयाचा परिणाम कमी करायचा असेल तर पपई हा उत्तम उपाय आहे. पपई हे विटामिन सी ने युक्त आहे. तसंच स्किन टाईटनिंगसाठी याचा उपयोग होतो.  हे नैसर्गिक असल्याने चेहऱ्याला काही त्रासही होत नाही. तसंच केवळ चेहऱ्याला लाऊनच नाही तर तुम्हाला चांगली त्वचा हवी असेल तर तुम्ही नियमित पपईचे सेवनही करायला हवे. यामुळे त्वचा अधिक चांगली राहाते. 

कसा करावा वापर – 

दही (Yogurt)

Shutterstock

त्वचा अधिक कसदार करण्यासाठी दह्याचा उपयोग करण्यात येऊ शकता. कारण दह्यामध्ये विटामिन सी चा चांगला स्रो आहे. हे त्वचेला सुरक्षा देण्यासह त्वचा कसदार बनविण्याचे काम करते. तसंच दह्यामुळे त्वचा अधिक तजेलदारही दिसते. तुम्हाला जर त्वरीत उजळ त्वचा हवी असेल तर तुम्ही याचा वापर करू शकता. 

कसा करावा वापर – 

नारळाचे दूध (Coconut Milk)

Shutterstock

असं म्हटलं जातं की नारळाच्या दुधाचा उपयोग स्किन टाईट करण्यासाठी उत्तम आहे आणि यामध्ये कुठेही दुमत नाही. यामध्ये असणारे विटामिन सी आणि नैसर्गिक घटक त्वचा अधिक मऊ,  मुलायम आणि कसदार राखण्यासाठी मदत करतात. 

कसा करावा वापर – 

त्वचा कसदार करण्यासाठी फेसमास्क (Face Mask For Skin Tightening In Marathi)

चेहऱ्याची त्वचा अधिक टाईट करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी काही फेसमास्कचाही उपयोग करून पाहू शकता.  तुम्हाला याचा वापर करून त्वचा अधिक कसदार करता येईल. 

अंड्याचा फेसमास्क (Egg White Mask)

Shutterstock

तुम्ही जर विचार करत असाल की चेहऱ्याची त्वचा कसदार कशी करायची तर, एग व्हाईट मास्क अर्थात अंड्याचा मास्क हा उत्तम पर्याय आहे. अंड्याचा सफेद भाग तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी उपयोगी ठरतो आणि चेहरा अधिक कसदार करतो. 

केळ्याचा फेसमास्क (Banana Mask)

Shutterstock

पिकलेल्या केळ्यात अनेक पोषक तत्व असतात. विटामिन सी आणि विटामिन ई चा यामध्ये भरणा  असतो. त्यामुळे वाढत्या वयाचा प्रभाव कमी करण्यासाठी याचा उपयोग करून घेता येतो. त्वचा अधिक कसदार करण्यासाठी केळ्याचा उपयोग करून घ्या. 

मातीचा फेसमास्क (Soil Mask)

Shutterstock

अनादी काळापासून चेहऱ्यावर मातीचा उपयोग करण्यात येतो. यामध्ये मिनरलचे प्रमाण चांगले असते आणि माती ही त्वचा पुनर्जीवित करण्याचे काम करते. याचा सकारात्मक प्रभाव त्वचेवर दिसून  येतो. म्हणूनच त्वचा टाईट करण्यासाठी  मातीचा वापर करता येतो. 

त्वचा कसदार करण्यासाठी डाएट (Diet For Skin Tightening In Marathi)

Shutterstock

कोणत्याही गोष्टीसाठी आहार योग्य असणं गरजेचे आहे. त्वचा कसदार करण्यासाठी नक्की कोणता आहार घ्यायचा ते आपण जाणून घेऊया.  

ग्रीन टी – ग्रीन टी रोज तुम्ही प्यायल्यास, सैलसर त्वचा कसदार होण्यासाठी मदत मिळते. तसंच तुम्हाला ताजेतवानेदेखील वाटते 

केळं – केळ्यामध्ये विटामिन सी, ई आणि ए सारखे  पोषक तत्व आढळतात. त्यामुळे वाढत्या वयाचा  प्रभाव कमी करण्यासाठी केळ्याचा आपल्या आहारात समावेश करून घ्यायला हवा

टॉमेटो – टॉमेटोमध्ये असणारे विटामिन सी स्किन टाईट करण्यासाठी उपयुक्त ठरते. तसंच सुरकुत्या  घालविण्यासाठीही याचा उपयोग होतो. त्यामुळे आहारात टॉमेटो घ्यावा 

अंडं आणि मांस – अंडे आणि मांस हे प्रोटीनयुक्त असतात. मांसपेशींसह त्वचा अधिक मजबूत करण्यासाठी याचा उपयोग होतो. याचा सकारात्मक परिणाम त्वचेवर होताना दिसतो. 

हिरव्या भाजी – हिरव्या भाज्यांमध्ये मिनरल्स आणि विटामिन्स  भरपूर प्रमाणात आढळतात. यामध्ये विटामिन सी, ई आणि ए असून एजिंगचा प्रभाव कमी करण्यास उपयुक्त ठरते. तसंच त्वचा अधिक कसदार करण्यास उपयोगी ठरते. 

प्रश्नोत्तरे (FAQs)

1. स्किन टाईटनिंगसाठी सर्वात जास्त कोणते विटामिन उपयुक्त ठरते?

स्किन टाईटनिंगसाठी विटामिन सी,  ए आणि डी हे उपयुक्त ठरते. मात्र सर्वात जास्त परिणामकारक ठरते ते म्हणजे विटामिन सी. त्वचा अधिक कसदार होण्यासाठी याचा तुम्हाला जास्त  वापर करून घेता येतो. म्हणूनच विटामिन सी युक्त  पदार्थ जास्त उपयोगी ठरतात. 

2. त्वचा कसदार करण्यासाठी नारळाच्या तेलाचा उपयोग होतो का आणि कसा वापर करावा?

हो त्वचा कसदार करण्यासाठी नारळाच्या  तेलाचा उपयोग तुम्ही करून घेऊ शकता. याचा वापर करणंही सोपं आहे. नारळाच्या  तेलाने व्यवस्थित मालिश करून घ्या. आठवड्यातून दोन ते तीन वेळा आंघोळीला जाण्याआधी  एक तास तुम्ही याचा वापर शरीरावर करा आणि तुम्हाला परिणाम दिसून येईल. 

3. योगा केल्याने काय फरक पडतो?

योगा केल्याने तुमची त्वचा अधिक कसदार राहाते आणि सैल पडत नाही. यासाठी तुम्ही भुजंगासन, धनुरासन आणि ब्रिदिंग पोझ याचा आधार घ्यावा. हे योग केल्याने तुमची त्वचा अधिक चांगली राहण्यास मदत मिळते.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य