ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
कपाटातील जुन्या कपड्यांचा असाही करता येऊ शकतो वापर

कपाटातील जुन्या कपड्यांचा असाही करता येऊ शकतो वापर

 प्रत्येक महिलेच्या कपाटात इतके कपडे असतात की, ते काढून टाकायचा विचार केला तरी मन ते कपडे फेकून द्यायला तयार होत नाही. काही कपडे बोहारी घेतात. त्या बदल्यात एखादं भांड, बादली,टब अशा काही वस्तू तुम्हाला परत देतो. त्यात साड्या, पँट, शर्ट अशा काही कपड्यांचा समावेश असतो. लहान मुलांचे कपडे, टिशर्ट वगैरे अशा वस्तू सहसा कोणी घेत नाही (म्हणजे तुम्ही गरीबांना देता, पण हल्ली त्यांनाही फार गरज नसते.)अशा कपड्यांचा उपयोग तुम्ही वेगळ्या पद्धतीने करु शकता. कदाचित तुम्ही या आधी याचा असा वापर कधीच करुन पाहिला नसेल.

जुन्या साड्यांपासून बनवा असे मस्त ड्रेस की तुम्हालाही विश्वास बसणार नाही

होजिअरीपासून बनवता येतील या वस्तू

कपाटात टिशर्ट म्हणजेच होजिअरी मटेरिअलच्या अनेक कपडे असतात. त्यांचे बरेच उपयोग आतापर्यंत तुम्ही केले असतील.म्हणजे होजिअरी टिशर्टचा पायपुसण हा वापर अगदी सगळ्याच घरात सर्रास केला जातो. जुना टिशर्ट घेतला की, तो टाकला बाथरुम बाहेर… हो ना.. पण ‘कुछ अलग सोचो यार’ त्या प्लेन टिशर्टपासून तुम्हाला एखादे फॅन्सी पायपुसणे बनवता येऊ शकते. जे तुमच्या घराची शोभा देखील वाढवू शकते. आता या टिशर्टपासून आपल्याला काय काय बनवता येईल ते देखील पाहुयात

  • पायपुसण

doormat

ADVERTISEMENT

  आता टिशर्ट असाच बाथरुम किंवा वॉशरुम बाहेर टाकण्यापेक्षा थोडा काहीतरी नवा विचार करा ना… टिशर्टचं पायपुसण यात काय नवी असे तुम्हाला वाटत असेल तर आहे ना. तुमच्याकडे जर खूप टिशर्ट असतील तर तुम्ही हे मल्टीकलर आणि सुंदर डीझाईन्सच पायपुसण बनवूच शकता. असे डोअरमॅट हल्ली अनेक ठिकाणी रेडिमेडसुद्धा मिळतात किंवा तुमचे जुने टिशर्ट घेऊन असे डोअरमॅट बनवून देणारेही अनेक जण सध्या आहेत. 

कसे बनवाल पायपुसण:

तुम्हाला जे टिशर्ट फाडायचे असतील. त्यांचे 4 ते 5 इंचाचे कपडे लांब लांब तुकडे करुन घ्या. तुम्हाला वेणी घालणे माहीतच असेल असे समजून तुम्हाला आता सगळे लांब लांब तुकडे जोडून घ्यायचे आहेत. तुम्हाला जितक्या मोठ्या आकाराचे पायपुसणे हवे असतील तितके तुकडे तुम्हाला जोडावे लागतील. तीन तुकड्यांच्या सुरुवातीला एक टाका घालून तुम्हाला लांबसडक वेणी बांधायला घ्यायची आहे.  वेणी घालून झाल्यानंतर तुम्हाला वेणीचे एक टोक घेऊन गोलाकार आकारात गुंडाळायला घ्यायचे आहे. तुम्हाला पाय पुसण्याचा आकार किती हवा आहे तितके तुम्हाला गुंडाळायचे आहे. तुम्हाला तुमचे क्रिएटिव्ह पायपुसणे तयार झालेले दिसले. जर तुमचे टि-शर्ट कलर फुल असतील तर ते पायपुसणे अधिक सुंदर दिसेल.

  •  हेअरबँड

hair band

ADVERTISEMENT

पायपुसणं बनवून झाल्यानंतर काही पट्टया शिल्लक असतील. तर त्याचे हेअरबँड चांगले दिसू शकतात. बाजारात मिळणारे हेअर बँड तुम्हाला कानापाठी लागतात. पण टिशर्ट पासून बनवलेले हेअरबँड अजिबात लागत नाहीत. ते दिसायलाही चांगले दिसतात.

कसे बनवाल हेअरबँड:

टिशर्टचा लांब तुकडा कापून तुमच्या डोक्याचे माप घेऊन त्याला खाली गाठ किंवा धाव दोऱ्याने शिलाई मारुन घ्या. झाल तुमचा हेअर बँड तयार. शिवाय तुम्ही बारीक बारीक पट्टा काढून त्याची वेणी बांधूनही हेअरबँड तयार करु शकता.

मुंबईत आलात आणि इथे नाही गेलात तर तुमच्या मुबंई दौऱ्याला नाही अर्थ

ADVERTISEMENT
  •  क्लिपहोल्डर

hairclip holder

घरात ठिकठिकाणी दिसणार हेअर क्लिप तुम्हाला एकत्र ठेवायचे असतील. तर त्यासाठी घरच्या घरी, वॉशेबल, टिशर्टपासून बनवता येणारे क्लिपहोल्डर बनवा.

कसे बनवाल क्लिप होल्डर:

टिशर्टचे साधारण 4 ते 5 इंचाचे लांब तुकडे काढून घ्या. तुकडे थोडे ताणून घ्या. त्याची सैलसर वेणी घालून घ्या. अगदी आपण केसांची वेणी घालतो.तशी वेणी घाला.  बरं वेणीच्या वरच्या बाजूला टिशर्टपासूनच एक होल्डर करुन घ्या. हे होल्डर तुम्ही खिडक्यांना पडद्याच्या रॉडवर अडकवू शकता आणि त्याला तुमचे सगळे क्लिप लावू शकता.

ADVERTISEMENT
  • क्रोकरी क्लिनर 

crockery cleaning

बनियन, टिशर्टचा कपडा इतका नरम आणि मुलायम असतो की, तुमच्या नाजूक वस्तू साफ करण्याचे काम तो करु शकतो. जर तुमच्या टिशर्ट किंवा बनियनची अगदीच दुरवस्था झाली असेल. तर त्याचे साधारण चौकोनी तुकडे कापून तुम्ही त्यांचा वापर क्रोकरी क्लिनर म्हणून करु शकता. या शिवाय घरी असलेल्या काचेच्या इतर वस्तू पुसण्यासाठी, टेबल टॉप पुसण्यासाठी तुम्ही याचा वापर करु शकता.

  • ट्रेंडी बॅग

trendy bag

प्लास्टिक बंदी झाल्यापासून अनेक जण कापडी बॅगा वापरायला लागले आहेत. जर तुम्हाला मजबूत आणि हटके बॅग हवी असेल तर तुम्ही जुन्या टिशर्टपासून बॅग बनवू शकता. आता बॅग बनवण्यासाठी अशा टिशर्टची निवड करा. जे टिशर्ट बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत असतील. टिशर्ट जर प्रिंटेट असतील तर तुमची बॅग जास्त कलरफुल आणि चांगली दिसू शकेल.

ADVERTISEMENT

कशी बनवाल बॅग:

तुम्हाला ज्या आकाराची बॅग बनवायची आहे. त्या आकाराचा टिशर्ट तुम्ही घ्या. टिशर्टचा खालील भाग शिवून घ्या. आणि बाह्या कापून टाका… तुमची बॅग तयार… तुम्हाला तुमचे क्रिएटिव्ह डोकं लावूनही बॅगसच्या वेगवेगळ्या डीझाईन्स करता येऊ शकतात.

  •  उशीचे कव्हर

pillow cover

जर तुम्ही तुमच्या उशीला थेट उशीचे कव्हर घालत असाल तर आतापासून तसे करु नका. कारण उशीला थेट कव्हर घालण्यामुळे उशीवर थेट डाग पडण्याचू शक्यता जास्त असते. तुम्ही तुमची उशी नीट पाहा त्याला घामाचे, तेलाचे डाग असतात. आता हे डाग तुम्हाला कमी करायचे असतील. तर मुख्य कव्हरच्या आत आणखी एक  कव्हर घालणे कधीही चांगले. जुन्या टिशर्टचा उपयोग याच कव्हरसाठी तुम्ही करु शकता.टिशर्टचा गळ्याचा आणि बाहयांचा भाग कापून उरलेला आयताकृती तुकडा तुम्ही तुमच्या उशीभोवती शिवू शकता. त्यावर उशीचे कव्हर चढवू शकता.

ADVERTISEMENT

 होजिअरी मुलायम असल्यामुळे तुम्हाला तुमच्या उशीचा स्पर्श ही मुलायम लागेल. साधारण दोन महिने सलग तुम्ही हे उशीचे कव्हर वापरले तर चालेल. पण तुम्ही तेलकट केस घेऊन उशीवर झोपत असाल तर तुम्ही होजिअरी मटेरिअलच्या उशीच्या कव्हरना झीप लावू शकता. शिवाय तुम्ही क्रिएटिव्ह असाल तर तुम्ही थेट उशीचे कव्हरही अशा टिशर्टपासून बनवू शकता.

पिरेड्समध्ये फ्लो सुरळीत करण्यासाठी करा हे घरगुती उपाय

सिथेंटिक कपड्यांचा करता येईल हा उपयोग

bed cover

आता हे झाले होजिअरी मटेरिअल संदर्भात… पण सिंथेटिक मटेरिअलचे करायचे काय.? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर  त्याचाही उपयोग तुम्हाला करता येऊ शकतो.

ADVERTISEMENT

*हल्ली सगळीकडे बेड कव्हर नावाचा प्रकार मिळतो. तो तसा महागही असतो. पावसाळ्यात बाहेरुन आल्यानंतर चादर भिजण्याची शक्यता जास्त असते अशावेळी तुम्ही ओढणी किंवा सिथेंटिक मटेरिएल एकत्र करुन त्याचे बेडकव्हर तयार करु शकता. त्यामुळे बेड भिजण्याची शक्यता थोडी कमी असते. शिवाय हा कपडा पाणी शोषून घेतो आणि लवकर वाळतो.

*जर तुमच्याकडे अशा मटेरिअलच्या साड्या असतील त्याचे उत्तम पडदे बनवता येऊ शकता. पावसाचे चार महिने तुम्ही तुमच्या घरांना या मटेरिअलचे पडदे शिवून लावू शकतात. कारण ते वाळायला अगदी सोपे असतात.

 कॉटन मटेरिअलचे उपयोगच उपयोग

घरात असलेल्या कॉटन कपड्यांचे तर उपयोगच उपयोग असतात. घरी आजी असेल तर तिने जुन्या कॉटनच्या साड्यांपासून गोधड्या बनवलेल्या तुम्ही पाहिल्यात असतील. मग काय अगदी सोपे आहे की, कॉटन मटेरिअलपासून तुम्ही अशाच प्रकार गोधड्या बनवू शकता.

hankerchief

ADVERTISEMENT

या शिवाय कॉटनच्या बॅग्स, रुमाल, टॉवेल अशा वस्तू देखील तुम्ही यापासून बनवू शकता.

 आता या सगळ्या वस्तू बनवण्यासाठी तुमच्याकडे थोडी क्रिएटिव्हिटी हवी. आम्ही तुम्हाला नुसत्या आयडिया दिलेल्या आहेत. आता तुम्हाला त्यापासून काहीतरी छान बनवायचे आहे. तुमच्याकडेही काही नव्या आयडिया असतील तर तुम्ही आम्हाला तुम्ही काही बनवलेल्या वस्तू पाठवू शकता.

(सौजन्य- shutterstock, Instagram)

 

ADVERTISEMENT

 

26 May 2019
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT