ADVERTISEMENT
home / फॅशन
साडी नेसताना या ’14’ चुका टाळा (Saree Wearing Tips In Marathi)

साडी नेसताना या ’14’ चुका टाळा (Saree Wearing Tips In Marathi)

भारतीय वेशभूषेत साडीचा नंबर सगळ्यात आधी येतो. साडीबाबत जितकं बोलू तितकं कमीच आहे. तुम्ही जर का साडी अगदी परफेक्ट नेसली तर कुठल्याही हिरोईनपेक्षा कमी दिसणार नाही. पण जर साडी व्यवस्थित नेसली नाही तर मात्र लोकं तुमच्यावर हसूही शकतात बरं. त्यामुळेच साडी नेसताना काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी. मैत्रिणींनो, साधारणतः साडी नेसताना 14 चूका होतात आणि आता त्याच चुकांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जेणेकरुन पुढच्यावेळी साडी नेसताना तुम्ही त्या टाळू शकाल आणि तुमचा साडी लूक परफेक्ट दिसेल.

प्लॅटफार्म हील घालणं

सूटकेसच्या साईजची पर्स कॅरी करणं

शरीराची ठेवण लक्षात न घेता ब्लाऊज घालणं

ADVERTISEMENT

साडी जरा जास्तच खाली नेसणं

साडी ड्रॅप करताना कधीही बनवलेल्या चुका (Avoid Mistakes While Draping A Saree)

1. साडीवर जास्त दागिने घालणं (Avoid Wearing Lots Of Ornaments)

1. Saree Wearing Tips In Marathi

साडी नेसली म्हंटल्यावर खूप दागिने घालायचेच असा नियम नाहीये. दागिने जरा कमी आणि साडीला शोभतील असेच घालावे. त्यामुळे तुम्ही एलीगेंट दिसाल.

2. प्लॅटफार्म हील घालणं (Avoid Wearing Platform Heel)

सॅँडल्सने तुमचं काही वाकडं केलं आहे का? की, तुम्ही त्यांना घालणं इतकं टाळता?  तुम्हाला सांगते, प्लॅटफॉर्म हीलमुळे साडीचा लूक खराब होतो. कमीत कमी साडी नेसल्यावर तरी त्या प्लॅटफॉर्म हिल्सला शू रॅकमध्येच राहू द्या.

3. नखशिखांत मॅचिंग करणं (Mismatch Is The New Trend)

तुम्हाला जुन्या जमान्यातल्या बॉलीवूड हीरोइन्स माहीत आहेत का?. ज्यांचा लूक अगदी डोक्यापासून पायांच्या नखांपर्यंत मॅचिंग असायचा. पण आता काळ आणि फॅशन दोन्ही बदलली आहे. साडीवर मॅचिंग टिकली, बांगड्या घालण्याची आणि त्यावर मॅचिंग गुलाब लावण्याची फॅशन इसवी सन 1950 मध्ये होती बरं का?  2018 मध्ये इतकं मॅचिंग करणं स्टायलिश दिसणं तर सोडाच पण हस्यास्पद नक्कीच वाटेल.

ADVERTISEMENT

4. सूटकेसच्या साईजची पर्स कॅरी करणं (Bags, The Smaller The Better)

एकतर साडी नेसल्यावर तिचा पदर सांभाळा, निऱ्या सुटणार तर नाही ना, याची काळजी घ्या, हे सगळं पहावं लागतं. अशावेळी मोठी पर्स कॅरी करण्याऐवजी लहानसा सुंदर असा क्लच वापरा. कडक दिसाल.

5. जास्त मेकअप करणं (Doing More Makeup)

मेकअप गरजेचा असतोच, पण तो गॉडी वाटला नाही पाहिजे. म्हणजे कसं आहे ना गुलाबी साडी आणि निळा ब्लॉऊज असेल तर त्याच्यावर अगदी मॅचिंग गुलाबी लिपस्टिक आणि निळं आयशॅडो सर्वांनाच सूट करेल असं नाही.

6. शरीराची ठेवण लक्षात न घेता ब्लाऊज घालणं (Avoid Ill-Fitted Blouse)

2. Saree Wearing Tips In Marathi

ना तुमचा ब्लाऊज तुरूंग आहे ना  तुमचं शरीर त्यातून सुटकेसाठी तरसणारा कैदी. त्यामुळे ब्लाऊज फिटींगचाच घाला पण तो इतकाही फिट्ट बसायला नको की, तुमच्या शरीरातल्या एक्स्ट्रा कॅलरीज लोकांना दिसू लागतील.

7.  झगामगा मला बघा (All About That Bling)

साडी इतकीही चमचमणारी नको की बघणाऱ्यांच्या डोळ्यांना ती खटकेल. साड्यांची खरेदी करताना साडीवर जरी, गोटा, आरश्यांचं हेवी वर्क असलेल्या साड्या निवडू नका. हलकसं वर्क असलेल्याच साड्या शक्यतो निवडा. ज्या तुम्हाला कधीही नेसताना विचार करावा लागणार नाही.   

ADVERTISEMENT

मराठीमध्ये पहाण्यासाठी 5 वेगवेगळ्या साडी स्टाईल देखील वाचा

8. मोठाले गोंडे-लटकन, अजिबात नको (Avoid Tassels)

साडी नेसताना तिच्या लूकमध्ये ब्लाऊजची महत्त्वाची भूमिका असते. फॅशन म्हणून ब्लाऊजच्या दोरीला मोठाले गोंडे किंवा लटकन लावू नका. ते तुमच्या पदरात अडकण्याची शक्यता असते. ज्यामुळे ऐनवेळी तुमची फजिती होऊ शकते. त्यामुळे ब्लाऊजला लटकन नेहमी नॉर्मल साईजचीच लावा.

वाचा – Old Sadicha Dress Design In Marathi

9. वजनदार दागिने (Avoid Wearing Heavy Jewellery)

3. Saree Wearing Tips In Marathi

साडीवर सहज मिरवता येतील असेच दागिने घाला. इतकेही वजनदार दागिने घालू नका की, ते कॅरी करणं ही तुम्हाला अवघड जाईल.

ADVERTISEMENT

10. साडी नाही तर हाय वेस्ट पॅंटच जणू (High Vest Pants)

साडी नेसताना काळजी घ्या की, ती कंबरेवर नेसली जाईल. कंबरेच्या अगदी वर म्हणजेच पोटावर नको.

11. साडी जरा जास्तच खाली नेसणं (Never Tie Your Saree Too High Or Too Low)

4. Saree Wearing Tips In Marathi

लक्षात घ्या, साडी म्हणजे लो-वेस्ट जीन्स नाही. त्यामुळे ती कमरेवरच नेसावी. त्याच्यावर किंवा जास्त खाली नाही.

12. शिफॉन आणि नेटच्या साडीला सेफ्टीपिन लावताना (Safety Lace Up The Chiffon And Net Saree)

बॉलिवूडच्या हिरोईन्सना मस्त साडी नेसून पदराचं टोक हातात घेऊन ते वाऱ्यावर उडताना तुम्ही अनेकदा पाहिलंच असेल. मग तुम्ही तुमचा पिनअप केलेला पदर मोकळा सोडून साईड पिन लावा आणि सोडून द्या. त्याशिवाय उडणाऱ्या पदराची भूरळ तुमच्या प्रिन्स चार्मिंगला कशी पडेल?

13. ब्रा आणि परकर दिसणं (Wear Right Bra)

म्हणतात ना ‘आतल्या गोष्टी आतच राहाव्यात’. साडी नेसणं आणि ती कॅरी करणं खरंच एक कला आहे. जर तुमची ब्रा सारखी बाहेर डोकावत असेल, तर ती व्यवस्थित करून तिला पिनअप करा. त्याचबरोबर परकर दिसू नये म्हणून साडीच्या उंचीपेक्षा कमी लांबीच्या परकरची निवड करा  म्हणजे तो दिसणार नाही.

ADVERTISEMENT

14. साडीच्या निऱ्या आणि ब्लाऊजला पदर चुकीच्या पध्दतीने पिनअप करणे (Pin Your Saree Correctly)

साडी पिनअप करताना काळजी घ्या की लावलेली पिन दिसून येणार नाही. तसं पाहिला गेलं तर तुमचा हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आता बाजारात प्री स्टीच्ड साड्याही मिळू लागल्या आहेत बरं का…

Image Source : Instagram

21 Nov 2018

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT