Advertisement

आरोग्य

गर्भावस्थेत खाऊ नका ही फळं

Aaditi DatarAaditi Datar  |  Sep 5, 2019
गर्भावस्थेत खाऊ नका ही फळं

Advertisement

आई होणं एक सुंदर अनुभव आहे. गर्भावस्थेच्या काळात प्रत्येक आईला काही ना काही खाण्याचे डोहाळे लागतात किंवा इच्छा निर्माण होते. पण याच काळात काही गोष्टी खाणं टाळणं आवश्यक आहे. कारण गर्भावस्थेत आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. या आहाराबाबतच्या गोष्टी प्रत्येक आईला माहीत असल्याच पाहिजेत. त्यामुळे या लेखात आम्ही सांगणार आहोत की, प्रेग्नंसीदरम्यान महिलांनी कोणती फळ खाऊ नयेत. 

प्रेगंन्सीदरम्यान खाऊ नका ही फळं – Do not eat these fruits during pregnancy

Shutterstock

1. पपई

गर्भावस्थेच्या सुरूवातीच्या 5-6 महीन्यापर्यंत पपई खाऊ नका मग ती कच्ची पपई असो वा पिकलेली. पण तुम्ही प्रेग्नंसीच्या शेवटच्या तीन महिन्यात पपई खाऊ शकता. पिकलेल्या पपईमध्ये व्हिटॅमीन सी आणि इतर पौष्टिक तत्त्व असतात. ज्यामुळे बद्धकोष्ठ होत नाही. मध आणि दूधासोबत पपई खाल्ल्यास ते गर्भवती मातेसाठी एक उत्तम टॉनिक ठरतं. 

2. अननस

Pregnancy च्या काळात अननस खाणं हानीकारक मानलं जातं. कारण अननस हा उष्ण असतो. याच्या सेवनाने प्रसूती लवकर होण्याची शक्यता असते. पण जर गर्भवती महिलेने जुलाबाचा त्रास होत असल्यास थोड्या प्रमाणात अननसाचा रस प्यायल्यास कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. पण पहिल्या तिमाहीदरम्यान याचं सेवन करू नये.

3. द्राक्षं

डॉक्टरसुद्धा गर्भवती महिलांना प्रेग्नंसीदरम्यान शेवटच्या तीन महिन्यात द्राक्षं खाणं टाळायला सांगतात. कारण द्राक्षं उष्ण प्रकृतीची असल्याने अवेळी प्रसूती कळा होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो गर्भावस्थेदरम्यान द्राक्षं खाऊ नका. 

4. पीच

पीच हे फळं आपल्याकडे जास्त खाल्लं जात नाही. पण तरीही जर तुमच्या प्रेग्नंसीदरम्यान हे फळ खाण्याची इच्छा झाल्यास ते टाळा. कारण हे फळ खाल्ल्यास प्रेग्नंसीदरम्यान रक्तस्त्राव होऊ शकतो.

Home Remedies For Morning Sickness In Marathi

5. फळं स्वच्छ करूनच खा – Maintain Hygine

तसं तर कोणतंही फळं धुतल्याशिवाय खाऊ नये. पण गर्भावस्थेदरम्यान जर तुम्ही ही काळजी घेतली नाहीतर ते धोकादायक ठरू शकतं. कारण अनेकदा फळांना लागलेली माती किंवा फळांवर फवारलेली केमिकल्स यामुळे नुकसानदायक बॅक्टेरिया तुमच्या पोटात जाऊ शकतात. त्यामुळे नेहमी फळं धुवून मगच खा.

6. प्रेग्नंसीदरम्यान खाऊ नका या भाज्या – Avoid these Vegetables

गर्भवती महिलांनी प्रेग्नंसीदरम्यान कोणत्याही कच्च्या भाज्या किंवा फ्रोजन भाज्या किंवा फळं खाऊ नये. कारण गर्भावस्थेदरम्यान कोणतंही इन्फेक्शन टाळणं महत्त्वाचं आहे. तसंच मोड आलेली कडधान्य खाणं ही टाळावं.

8. गर्भावस्थेत कॉफीचं सेवन टाळा

तुम्हाला इतर वेळी जरी कॉफी प्रिय असली तरी गर्भावस्थेत मात्र कॉफी टाळा. कारण कॉफीमध्ये कॅफीनची मात्रा जास्त असते. जी उत्तेजकाचं काम करते. ज्यामुळे गर्भातील बाळाच्या हार्ट रेटवर परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा –

जर तुम्हाला ही लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही प्रेग्नंट असू शकता

जुळ्या बाळांना जन्म देताय, मग ही माहिती जरूर वाचा

After Pregnancy Tips In Marathi

Pregnancy Outfit Ideas In Marathi

नको असलेली गर्भधारणा थांबवण्यासाठी करा हे उपाय

गरोदरपणाचा तिसरा महिना (3rd month of pregnancy and care tips)