ADVERTISEMENT
home / xSEO
ह वरून मुलांची नावे | H Varun Mulanchi Nave

150+ नवीन ह वरून मुलांची नावे | H Varun Mulanchi Nave

कुटुंबात लहान मूल झाल्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. हा आनंद आयुष्यात येण्यासाठी लोक आपली सगळी संपत्ती खर्च करण्यास तयार असतात. घरात नवा पाहुणा यावा म्हणून वैद्यकीय उपायांबरोबरच उपास-तापास, नवस, व्रतवैकल्ये असे सगळे उपाय केले जातात. घरात नवा पाहुणा आला की सगळे त्याला छोट्या छोट्या गोंडस नावांनी हाक मारतात. लाडूपासून छोटू आणि बाबूपर्यंत, सर्वजण त्याला अनेक नवीन नावे देतात परंतु त्याचे कुटुंब विशेषतः त्याचे पालक त्याच्यासाठी एक नाव शोधतात, ज्यामुळे त्याला ओळख मिळते आणि त्याला आयुष्यभर त्याच नावाने हाक मारली जाते. 

पूर्वी बाळासाठी नावे निवडताना पालक फारसा विचार करत नसत. ते एखादे देवाचे चांगले नाव निवडत असत. जेणेकरून त्या नावाचा अर्थ देखील शुभ असावा आणि  बाळाला हाक मारताना देवाचे नाव देखील घेतले जाईल असा त्यामागचा हेतू असायचा. म्हणूनच गणपतीवरून मुलांची नावे , कृठेवायला लोकांना आवडते.पण आता मात्र पालक बाळाचे नाव ठेवताना खूप विचारविनिमय करतात. आपल्याला एखादे नाव आवडले तरीही त्याचा अर्थ काय आहे याकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत आपण प्रत्येक नाव खूप खोलवर शोधतो आणि त्याचा अर्थही आपल्याला शोधावा लागतो, मग आपल्याला खूप मेहनत करावी लागते.तुमचे हे टेन्शन दूर करण्यासाठी, आम्ही इथे ह आद्याक्षर आलेल्या मुलांसाठी काही चांगली व अर्थपूर्ण ह वरून मुलांची नावे ((H Varun Mulanchi Nave) सुचवत आहोत. तुमच्या मुलाचे आद्याक्षर ह आले असेल आणि तुम्ही बाळासाठी एक अद्वितीय नाव शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी ह वरून मुलांची नावे (H Varun Mulanchi Nave)  आणली आहेत. जर तुम्ही पालक होणार असाल तर लहान मुलांसाठी ट्रेंडी नावांची ही यादी बुकमार्क करा.

ह वरून मुलांची नावे अर्थासह | H Varun Mulanchi Nave Marathi

ह वरून मुलांची नावे | H Varun Mulanchi Nave
ह वरून मुलांची नावे

अनेकांना त्यांच्या बाळाचे नाव हे देवाच्या नावावरून ठेवायची इच्छा असते. घरात मुलाचा जन्म झाला की घरात बाळकृष्ण आला असे म्हणण्यात येते. आपल्याकडे भारतीय परंपरेनुसार मुलासाठी श्रीविष्णूची, गणपतीची किंवा  भगवान शिवशंकराची नावे निवडण्यात येतात आणि त्यातील एखादे नाव ठेवले जाते. वाचा ह वरून मुलांची नावे अर्थासह – 

नाव नावाचा अर्थ
हर्ष आनंद 
हर्षल तेजस्वी तारा 
हर्षद आनंद देणारा 
हर्षित आनंदी 
हर्षवर्धन आनंद वाढवणारा 
हरी श्रीविष्णू 
हरिवंश हरीच्या वंशातला 
हरबन्सश्रीकृष्णाच्या वंशातला 
हरिवल्लभ श्रीविष्णूला प्रिय 
हरिप्रिय श्रीविष्णूचा आवडता / श्रीकृष्णाच्या शंखाचे नाव 
हर्षिल प्रेमळ 
हरीश श्रीविष्णू 
हरदेव श्रीशंकर 
हनुमान पवनपुत्र मारुती 
हनुमंत हनुमान 
हरिश्चंद्र सूर्यवंशांतील सत्यवादी राजा 
हरिहर श्रीविष्णू व श्रीशंकर 
हरिकिरण 
हरिन्द्र श्रीविष्णू 
हरेन श्रीशंकर 
ह वरून मुलांची नावे

अधिक वाचा –  व वरून मुलांची नावे

ADVERTISEMENT

ह वरून मुलांची नावे 2022 | H Varun Mulanchi Nave 2022 

ह वरून मुलांची नावे | H Varun Mulanchi Nave
ह वरून मुलांची नावे

आपल्याकडे अजूनही बाळाचा जन्म झाल्यावर त्याच्यासाठी पारंपरिक नावे निवडण्याची पद्धत आहे. हल्लीचे पालक सुद्धा आधुनिक आणि पारंपरिकतेचा मेळ साधता येईल असे छानसे नाव स्वतःच्या बाळासाठी शोधत असतात. लोकांना भगवान शिव वरून मुलांची नावे ठेवण्याची इच्छा असते.  तुम्ही तुमच्या बाळासाठी ह वरून मुलांची अर्थपूर्ण नावे शोधत असाल तर खालील यादी वाचा. 

हलधर बलराम 
हितेश भगवान व्यंकटेश्वर 
हितांश आपल्या सुखाच्या अनुकूल 
हितेंद्र हितसंबंधांचा स्वामी 
हिंमत धैर्य 
हिरण्य सुवर्ण 
हिरेन 
हरेंद्र श्रीविष्णू 
हिंडोल पहाटेचा पहिला प्रहर 
हिमांशू चंद्र 
हितांशू हितसंबंधांचा स्वामी 
हृदयनाथ मदन 
ह्रिदय हृदय 
हेमल सुवर्ण 
हेमंत एक ऋतू 
ह्रिषीकेश श्रीविष्णू 
हृदयेशप्राणनाथ 
हेमचंद्र इक्ष्वाकुवंशी एक राजा
हेमकांत तेज 
हेमराज सुवर्णाचा राजा 
H Varun Mulanchi Nave 2022 

अधिक वाचा –  बाळासाठी दोन अक्षरी नावे

ह वरून मुलांची नावे | H Varun Mulanchi Nave
ह वरून मुलांची नावे

बाळ झाल्यावर घरात आनंदाचे उधाण येते. बाळ झाल्यावर लगेच बाळाला कुठे नाव ठेवायचे हा विचार सुरू होतो. बाळाचा जन्म झाल्यावर त्याच्या पत्रिकेप्रमाणे जे आद्याक्षर आले असेल त्यावरून अनेक लोक नाव ठेवणे पसंत करतात. तर काही लोक स्वतःच्या नावाच्या अक्षरावरून बाळासाठी मॅचिंग नाव शोधतात. काही जण बाळाच्या जन्माच्या आधीपासूनच नावांची यादी करून ठेवतात तर काही जण बाळाचा जन्म झाल्यानंतर त्यावेळी जे आद्याक्षर येते ते पाहून नंतर नावे शोधतात. तुमच्या बाळाचे आद्याक्षर ह आले असेल तर वाचा ह वरून मुलांची ट्रेंडिंग नावे- 

हेमांगसोन्याने मढलेला  
हेमू 
हेमेंद्र सुवर्णाचा स्वामी 
हंसराज हंसाचा राज 
हंबीर योद्धा 
होनाजी 
ह्रिषी 
हार्दिक शुभ 
हेरंब श्रीगणेश 
होमेश 
हर्षा आनंदी 
हरप्रीत ईश्वराचा भक्त 
हरमीत ईश्वराचा मित्र 
हिमालय बर्फाचा डोंगर
हिमेश सुवर्णाचा यश 
हिरल
हृदया प्रिय 
हरिप्रसाद श्रीविष्णूचा प्रसाद 
ह्रीयांश 
ह्रषीराज अभिराम 
H Varun Mulanchi Trending Nave

अधिक वाचा – मुलांसाठी खास हनुमानाची नावे

ADVERTISEMENT

ह वरून मुलांची युनिक नावे । H Varun Mulanchi Unique Nave

ह वरून मुलांची नावे | H Varun Mulanchi Nave
ह वरून मुलांची नावे

तशी ह वरून मुलांची अनेक नावे आहेत. पण पालक वेगवेगळ्या अर्थाची नावे, देवाच्या नावावरून मुलांची नावे, युनिक नावे वाचून मग नावे शॉर्टलिस्ट करतात आणि त्यातील एखादे सुंदर अर्थपूर्ण नाव बाळासाठी निवडतात. तुमच्या घरात जुळ्या बाळांच्या रूपाने दुप्पट आनंद आला असेल तर जुळ्या मुलांची युनिक नावे असलेली यादी इथे आम्ही खास तुमच्यासाठी देत आहोत. वाचा ह वरून मुलांची युनिक नावे- 

हरिज क्षितिज 
हरजस 
हरषु हरीण 
हरानाध – 
हरिभद्र विष्णूचे नाव 
हर्षमन आनंदी 
हवीश भगवान शंकर 
हिमकर चंद्राचे एक नाव 
हेतल एक चांगला मित्र 
हेमाकेश भाग्यवान शंकराचे एक नाव 
हेमदेव सुवर्णाचा देव 
हरिराम ईश्वराचे एक नाव 
हरिराज बलवान 
हनूप सूर्याचा प्रकाश / तेज 
हर्यक्षा भगवान शंकराचे नेत्र 
हरजीत  विजयी 
हरचरणईश्वराच्या चरणी असणारा 
हरिप्रकाश ईश्वराचे तेज/ प्रकाश 
हर्मन सर्वांना प्रिय असणारा 
हरमंगल ईश्वराची स्तुती असणारे गीत 
ह वरून मुलांची नावे

पालकांना त्यांच्या मुलासाठी एक युनिक आणि ट्रेंडिंग नाव हवे असते. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ह वरून मुलांची नावे त्यांच्या अर्थासह! या यादीत दिलेली बहुतेक आधुनिक नावे संस्कृत भाषेतून घेतली गेली आहेत आणि ती अगदी अनोखी आहेत. यातील एखादे नाव तुम्हाला तुमच्या बाळासाठी नक्कीच आवडेल.

हे देखील वाचा,

द वरून मुलांची नावे, अर्थपूर्ण आणि युनिक
स वरून मुलांची नावे

ADVERTISEMENT
22 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT