साडी हा अनेकांसाठी स्टाईल स्टेटमेंट आहे. कित्येकांकडे अनेक प्रकारच्या साड्या असतात. पण सहावारी साडी नेसण्याची एक विशिष्ट पद्धत असते. त्यात थोडीशी व्हरायटी करण्यासाठी आपण साडीचा पदर वेगवेगळ्या पद्धतीने पिनअप करतो. पण या पलीकडे आपण फार काही बदल करायला पाहात नाही. पण आता याच सहावारीसाडीला ड्रेप करत एक वेगळा लुक दिला जातो. तुम्ही साडी कधी वेगळ्या पद्धतीने ड्रेप केली आहे का? नाही! तर मग तुम्ही नक्की अशा पद्धतीने ड्रेप करा साडी. करुया सुरुवात
फेस्टिव्ह सीझनसाठी तुमच्याकडे हवेत हे फुटवेअरचे पर्याय
ड्रेप 1 – क्लासिक लुक
साहित्य: कोणतीही साडी (काठापदराची असल्यास उत्तम), एखादा फॅन्सी ब्लाऊज, एखादा आवडीचा स्कर्ट, कंबरेचा बेल्ट
कृती:
- जर तुम्ही एखादी साऊथ इंडियन स्कर्ट-ब्लाऊज हा लुक पाहिला असेल तर हा लुक साधारणपणे तसाच आहे.
- स्कर्ट, ब्लाऊज घालून घ्या. आता तुम्हाला हवा असलेला पदर काढून घ्या. पदर आधी पीन अप केला तर फार उत्तम तो ब्लाऊजला पीनअप करु नका. पण तो काढून ठेवा.
- आता साडीचे दुसरे टोक निऱ्या काढतो तिथचे खोवायचे आहे. आता पदर तुमच्या उंचीप्रमाणे लावून घ्यायचा आहे.
- साडीचा पाठीमागे शिल्लक राहिलेल्या भागाच्या निऱ्या काढून तुम्हाला मागच्या बाजूला खोवायचे आहे.
- आता संपूर्ण साडी अशापद्धतीने नेसून झाल्यानंतर हा लुक पूर्ण करण्यासाठी तुम्ही कंबरेला एखादा फॅन्सी बेल्ट लावा.
जर तुम्हाला थोडा वेस्टनाईज लुक करायचा असेल तर तुम्ही यामध्ये लेदर बेल्ट वापरु शकता. कारण असे बेल्टसुद्धा दिसायला फारच चांगले दिसतात. त्यामुळे तुम्हाला हा एक बदल करायला काहीच हरकत नाही. साडी आणि स्कर्टची निवड करताना त्याचा एकमेकांशी काहीतरी मेळ बसायला हवा ( मटेरिअल निवडताना) तरचा या साड्या अधिक खुलून आणि उठून दिसतात. त्यामुळे तुम्ही हा प्रकार नक्की ट्राय करा
Cotton and Handloom Blouse Designs: कॉटन आणि हॅंडलूम ब्लाऊजच्या हटके डिझाईन्स
ड्रेप 2- चनिया, चोळी लुक
साहित्य: कोणतीही साडी, ब्लाऊज, ओढणी,एखादा फुललेला घेरदार स्कर्ट
कृती :
- तुमच्याकडे असलेला एखादा घोळदार आणि विशेष करुन फुललेला स्कर्ट घाला.
- तुम्ही साडीनुसार ब्लाऊजची निवड करा.
- आता साडीच्या निऱ्या खोचत खोचत तुम्हाला गोलाकार स्कर्ट तयार करायचा आहे. निऱ्यांमुळे ही साडी अधिक घेरदार दिसते.
- स्कर्टवर अशा पद्धतीने नुसता ब्लाऊज घालणे चांगले दिसणार नाही. त्यामुळे तुम्ही एखादी ओढणी घेऊन ती ड्रेप करु शकता.
आता तुम्ही अशा दोन पद्धतीने साडी नक्की नेसून पाहा. तुम्हाला थोडा वेगळा लुक नक्की मिळेल. या फेस्टिव्ह सीझनमध्ये तुम्हाला कपाटातील वेगवेगळ्या साड्यांवर असे प्रयोग करता येतील. हल्ली अनेक ठिकाणी नववधूंनाही अशापद्धतीने साडी नेसवली जाते. तुम्ही याला थोडासा तुमचा टच दिला तरी हा प्रकार तुम्हाला चांगला दिसेल.
या साडीचा लुक अधिक चांगला करण्यासाठी MyGlammच्या लिपस्टिक नक्की ट्राय करा