ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
how to clean non stick tawa pan in Marathi

कधीच खराब होणार नाही नॉन स्टिक तवा, स्वच्छ करताना वापरा या टिप्स

नॉन स्टिकची भांडी आता प्रत्येकाच्या किचनमध्ये शोभून दिसू लागली आहेत. याचं कारण ही भांडी दिसायला आकर्षक असतातच शिवाय त्यामध्ये शिजवलेलं अन्न जळण्याची शक्यता कमी असते. तेल आणि मसाले कमी लागत असल्यामुळे अशा भांड्यांमध्ये स्वयंपाक करणं खूप सोयीचं आणि फायदेशीर ठरत आहे. मात्र असं असलं तरी जास्त काळ वापरण्यामुळे आणि घासून स्वच्छ केल्यामुळे नॉन स्टिक तवा, कढई, पॅन लवकर खराब होतात. नॉन स्टिकच्या भांड्यावरील कोटिंग निघून गेल्यास ते अन्नातून पोटात जाण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ही भांडी स्वच्छ करताना विशेष काळजी घेण्याची गरज असते.

नॉन स्टिक भांडी स्वच्छ करण्यासाठी टिप्स

नॉन स्टिक भांडी वापरत असाल तर ती स्वच्छ करताना विशेष काळजी घ्या. ज्यामुळे ती लवकर खराब होणार नाहीत.

  • नॉन स्टिक तवा अथवा पॅन स्वच्छ करण्यासाठी फक्त एक साधा सॉफ्ट स्पंज आणि लिक्विड सोप वापरा. ज्यामुळे ती भांडी लवकर स्वच्छ होतील आणि त्यावर ओरखडे येणार नाहीत. यासोबत वाचा स्वयंपाकघरात सापडतील तुम्हाला नैसर्गिक पेनकिलर्स, आता गोळ्या घेण्याची गरज नाही
  • नॉन स्टिक भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ब्लिचिंग पावडरही वापरू शकता. यासाठी कोमट पाण्यात ब्लिचिंग पावडर मिसळा आणि त्याने तुमच्या भांड्याचा चिकटपणा सॉफ्ट ब्रशने काढून टाका.
  • नॉन स्टिक भांड्याचा चिकटपणा कमी करण्यासाठी तुम्ही ती बेकिंग सोडा वापरून स्वच्छ करू शकता. यासाठी बेकिंग सोडा, मीठ आणि व्हिनेगर एकत्र करा आणि भांड्याला लावा. मात्र लक्षात ठेवा खरखरीत ब्रश त्यावर कधीच वापरू नका. बेकिंग सोड्याचे हे ‘25’ फायदे तुम्हाला माहीत आहेत का (Benefits Of Baking Soda In Marathi)
  • व्हिनेगरने भांडी स्वच्छ करणं हा भांड्याचा चिकटपणा कमी करण्याचा एक चांगला पर्याय आहे.यासाठी पाण्यात आधी लिक्विड सोप आणि व्हिनेगर मिसळा आणि त्याने तुमची नॉन स्टिक भांडी हलक्या हाताना स्वच्छ करा. 
  • एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नॉन स्टिक भांडी घासताना, धुताना अथवा धुतल्यावर ती एकत्र सर्व भांड्यासोबत ठेवू नका. नाहीतर इतर भांड्यांमुळे नॉन स्टिक भांड्यावर ओरखडे येतात.
  • नॉन स्टिकची भांडी पुसून त्यांच्यासाठी एक खास जागा करून त्यात ठेवा. शक्य असल्यास एखाद्या सुती कापडात गुंडाळून नॉन स्टिकचे तवे अथवा कढई ठेवा. भांडी व्यवस्थित स्वच्छ केल्यामुळे आणि वेगळी ठेवल्यामुळे  ती वर्षानूवर्षे तशीच राहतील आणि जास्त टिकतील. 

स्वयंपाक घरातील काकडीचे फायदे (Benefits Of Cucumber In Marathi)

07 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT