आजकालच्या धकाधकीच्या जीवनात सुंदर दिसण्यासाठी सतत सौंदर्य उपचार करणं खूपच कठीण झालं आहे. त्यामुळे घरात जर एखाद्या खास लग्नसमारंभ असेल किंवा स्पेशल पार्टी असेल तेव्हाच काहीजणी पार्लरमध्ये जातात. एकतर पार्लर अथवा स्पामध्ये सौंदर्य उपचार करण्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो. त्यामुळे कधीकधी अचानक एखाद्या महत्वाच्या ठिकाणी जाण्याचा बेत ठरतो तेव्हा पार्लरमध्ये जाण्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळच मिळत नाही. अशा वेळी घरातील सौंदर्योपचारही काही उपयोगाचे नसतात. कारण त्यामुळे तुम्हाला इंंन्संट ग्लो (Instant Glow) मिळू शकत नाही. तुमच्यासोबतही असं होत असेल तर मुळीच चिंता करू नका. कारण आम्ही तुम्हाला आज अशी काही सौंदर्य उत्पादने सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा चेहरा अगदी त्वरीत फ्रेश दिसू लागेल.
सध्या बाजारात असे काही फेस शीट मास्क (Face Sheet Mask) उपलब्ध आहेत ज्यामुळे तुम्हाला इंंन्संट ग्लो (Instant Glow) मिळू शकतो. हे फेस मास्क चेहऱ्याच्या आकाराचे असल्याने त्याचा वापर करणं अगदी सोपं आहे. या फेस मास्कमध्ये पोषक सीरम वापरण्यात येतात ज्यामुळे तुमचा चेहऱ्यावर पटकन चमक येते. हे शीट मास्क कागद, फायबर आणि जेलपासून तयार करण्यात येतात.
फेस शीट मास्क म्हणजे नेमकं काय
फेस मास्क वापरण्याचे दुष्परिणाम
फेस शीट मास्क म्हणजे नेमकं काय? (What is Face Sheet Mask)
फेस शीट मास्क कॉटन आणि विविध प्रकारच्या शीटपासून तयार केले जातात. त्यावर सीरम लावलेलं असल्यामुळे ते ओलसर असून त्वचेवर परिणामकारक ठरतात. हे शीट मास्क तुमच्या चेहऱ्याच्या आकाराप्रमाणे असतात ज्यामुळे ते चेहऱ्यावर अगदी व्यवस्थित बसतात. शिवाय या शीट्सचा डोळे आणि नाकाकडील भाग कापलेला असतो. त्यामुळे नाक आणि डोळे सोडून संपूर्ण चेहरा फेस शीट मास्कने नीट झाकता येतो. शीट मास्क चेहर्यावरील लालसरपणा कमी करण्यास मदत करते.
फेस मास्क शीटचे विविध प्रकार (Types of Face Sheet Mask)
सध्या बाजारात आठ प्रकारातील फेस शीट मास्क उपलब्ध आहेत. हे फेस शीट मास्क विविध आकाराच्या डिझाईन्स उपलब्ध असून तुम्ही तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार त्यांची निवड करू शकता. यामध्ये कॉटन शीट मास्कपासून ते अगदी हायड्रोजेल शीट मास्क पर्यंत विविध प्रकार असतात.
Also Read : मुखवटे उत्तम कोळशाची साल
हायड्रोजेल शीट मास्क (Hydrogel Sheet Masks)
हायड्रोजेल शीट मास्क एका चिकट पदार्थापासून तयार केला जातो. त्यामुळे हे मास्क केवळ सीरममध्ये बुडवलेलं कापडी मास्क नसतं. हायड्रोजेल मास्क दोन भागांमध्ये उपलब्ध असतं ज्यामुळे ते अगदी सहज चेहऱ्यावर लावता येतं. पहिला भाग चेहऱ्याच्या वरील भागावर लावायचा असतो तर दुसरा भाग तुमच्या चेहऱ्याच्या हनुवटीकडील भागावर तुम्ही लावू शकता. हायड्रोजेल मास्कमुळे तुमच्या चेहऱ्यावर थंडावा येतो. शिवाय यामुळे तुमची त्वचा मऊ आणि चमकदार दिसू लागते.
बायो- सेल्युलोज मास्क (Bio- Cellulose Masks)
बायो-सेल्युलोज मास्क हे एक नैसर्गिक मास्क आहे. कारण या मास्कमध्ये नैसर्गिक फायबर आणि बॅक्टेरियाचा वापर करण्यात येतो. इतर फेस मास्कच्या तुलनेमध्ये हे फेस मास्क जास्त फायदेशीर आहे. कारण यामध्ये चांगल्या गुणवत्तेचे सीरम वापरण्यात येते. या मास्कमधील सीरम लवकर उडून जात नाही शिवाय ते लवकर खराबही होत नाही. सीरमचा वापर योग्य पद्धतीने झाल्यामुळे तुमचा चेहरा ओलसर राहतो.
तसेच मराठीत चमकणारा चेहरा टिप्स वाचा
मायक्रोफायबर शीट मास्क (Microfiber Sheet Masks)
मायक्रोफायबर शीट मास्क बाजारात सहज मिळणारं एक फेस मास्क आहे. या फेस शीट मास्कच्या सीरममध्ये व्हिटॅमिन आणि इसेंशिअल ऑईल असतात. इतर फेस शीट मास्कच्या तुलनेत हे शीट मास्क स्वस्त असल्याने त्याला जास्त मागणी असते. मात्र हे फेस शीट मास्क वापरताना एक काळजी घ्यावी लागते ती म्हणजे ते चेहऱ्यावर नीट बसत नाही त्यामुळे ते लावल्यावर तुम्ही तुमची इतर कामे करू शकत नाही. जर तुम्हाला हे शीट मास्क वापरायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला कमीतकमी 24 मिनीटे झोपून राहावे लागेल.
फॉईल शीट मास्क (Foil Sheet Masks)
फॉईल शीट हे एक नवीन प्रकारचे फेस शीट मास्क आहे. या मास्कमध्ये फॉईलचा वापर सीरम खराब होऊ नये म्हणून केला जातो. या मास्कला ओपन करून ते चेहऱ्यावर लावेपर्यंत त्यातील सीरम तसंच राहते. शिवाय नंतर जेव्हा तुम्ही हा मास्क काढून टाकता तोपर्यंत ते सीरम तसंच राहतं. ज्यामुळे तुमच्या त्वचेचं चांगलं पोषण होतं आणि त्वचा हायड्रेट राहते.
Also Read Benefits Of Rice Flour In Marathi
नीट शीट मास्क (Knit Sheet Mask)
नीट शीट मास्क कापडापासून तयार करण्यात आल्यामुळे त्यावरील सीरम व्यवस्थित त्वचेमध्ये मुरते. कापडाचा वापर केल्यामुळे सीरम भरपूर प्रमाणात असते. या मास्कमुळे तुमचा चेहरा आणि मान या दोन्हींवर चांगला परिणाम दिसून येतो.
चारकोल शीट मास्क (Charcoal Sheet Masks)
चारकोल मास्कचा वापर खूप कमी प्रमाणात केला जातो मात्र याचा तुमच्या चेहऱ्यावर फारच चांगला परिणाम होऊ शकतो. कोळश्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ होते आणि मुलायम दिसू लागते. शिवाय या शीट मास्कमुळे तुमची त्वचा मुळापासून स्वच्छ झाल्याने डिटॉक्सदेखील होते.
बबलिंग शीट मास्क (Bubbling Sheet Masks)
हे मास्कला तयार करण्यासाठी एक हटके प्रयोग करण्यात आला आहे. यामध्ये पॅराफ्लोरोकार्बनचा वापर करण्यात आलेला आहे. या फेसमास्कला पॅक करताना त्यामध्ये ऑक्सिजन पंप केलं जातं आणि ते पाकीट सावधपणे बंद करण्यात येतं.त्यामुळे ज्यावेळी ते उघडल्यावर हवेशी संपर्क आल्यामुळे त्याच्यावर बुडबुडे निर्माण होऊन एक प्रकारचा फेस तयार होतो.. मात्र हे मास्क वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही हा मास्क तुमच्या चेहऱ्यावरून काढून टाकाल तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर फेस उरता कमा नये. त्यामुळे शीट मास्क काढल्यावर कोमट पाण्याने चेहरा लगेच धुवून काढा आणि चेहरा स्वच्छ करून त्वचेवर चांगलं फेस लोशन लावा.
आमपॉल शीट मास्क (Ampoule Sheet Masks)
आमपॉल शीट मास्क हे इतर मास्कच्या तुलनेत एक वेगळं शीट मास्क आहे. कारण यामुळे तुमच्या त्वचेवर दुहेरी उपचार केले जातात. या शीट मास्कचा वापर करण्याआधी त्यातील Ampoule सीरमने चेहऱ्यावर मसाज करा आणि त्यानंतर त्यावर मास्क लावा. दहा ते पंधरा मिनीटे हा मास्क चेहऱ्यावर ठेवा. आधी सीरम लावल्यामुळे ते चेहऱ्यामध्ये व्यवस्थित मुरते.
फेस शीट मास्कचा वापर कसा कराल? (How to use Sheet Masks?)
कोणतेही फेस शीट मास्क वापरण्यापूर्वी चेहरा पाण्याने स्वच्छ करा. त्यानंतर फेस मास्कच्या पाकीटातून फेस मास्क बाहेर काढा आणि हाताच्या बोटांच्या मदतीने तो मास्क चेहऱ्यावर लावा. कधी कधी जर शीट मास्कच्या पाकीटामध्ये सीरम अधिक प्रमाणात असेल तर तो शीट मास्क काढताना ते पाकीटातच राहू शकतं. मात्र फार वेळ पाकीट उघडं राहील्यास त्या सीरमचा पुन्हा वापरू नका. शिवाय फेस शीट मास्क दिलेल्या सूचनेनुसार चेहऱ्यावर ठेवा. काढून टाकल्यावर चेहऱ्यावरील सीरम बोटांच्या मदतीने चेहऱ्यावर पुन्हा पसरून चेहऱ्यावर मसाज करा.
एखाद्या अचानक ठरलेल्या पार्टीला अथवा एखाद्या खास समारंभाला जाण्याआधी कमीत कमी दोन ते तीन तास आधी तुम्ही हे फेस शीट मास्क वापरू शकता. या फेस मास्कमुळे तुमची त्वचा फार तेलकट न वाटताही चेहऱ्यावर एक इंन्संट चमक येईल.
फेस मास्क शीटचे फायदे (What are the Benefits of Sheet Masks?)
फेस मास्कचा तुमच्या चेहऱ्याच्या त्चचेवर खूपच चांगला परिणाम होतो. कारण या शीट मास्कच्या सीरममध्ये व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. ज्याच्या वापरामुळे तुमची त्वचा हायड्रेट, मऊ आणि मुलायम होते. तुम्ही घरीच या शीट मास्कचा वापर करून चेहऱ्याचे सौदर्य खुलवू शकता.
इतर सौदर्योपचारांच्या तुलनेत फेस शीट मास्क वापरणे फार सोपे आहे. हे मास्क फार महाग नसल्यामुळे ते वापरणं जास्त खर्चिकही नाही. शिवाय तुम्हाला या फेस मास्क शीटमुळे इंन्स्टंट ग्लोही मिळू शकतो.
फेस मास्क वापरण्याचे दुष्परिणाम (What are the Side Effects of Sheet Masks?)
बऱ्याचदा वेळ वाचविण्यासाठी इंन्स्टंट परिणाम देणारी उत्पादने वापरणं नुकसानकारक असू शकतं. फेस शीट मास्क वापरल्यामुळे तुम्हालाही काही दुष्परिणामांना तोंड द्यावं लागू शकतं. तुम्ही जर वारंवार या फेस शीट मास्कचा वापर केला तर त्याचे तोटे नक्कीच आहेत. नुकसान टाळण्यासाठी या फेस शीट मास्कचा वापर आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून फक्त तीनदाच करा. कोणत्याही समारंभाला जाण्याआधी फक्त दोन तास आधी हे फेस शीट मास्क वापरा.
तुमच्या त्वचेसाठी कोणते फेस शीट मास्क चांगले आहे हे कसे ओळखाल? (How to Choose Best Sheet Masks for Your Skin?)
बाजारात विविध प्रकारचे फेस शीट मास्क उपलब्ध असतात यातून आपल्या त्वचेला योग्य असे फेस मास्क शीट निवडणे थोडे कठीणच आहे. प्रत्येक शीट मास्क त्वचेच्या निरनिराळ्या समस्या दूर करण्यासाठी आहे. शिवाय प्रत्येक मास्कची डिझाईन आणि पॅकेजिंग निराळी असते. अगदी ऑयली स्कीनपासून अॅंटी – एजिंग पर्यंत विविध प्रकाराचे फेस शीट मास्क असू शकतात. बाजारात फेस शीट मास्कचे विविध ब्रॅंडही उपलब्ध असतात. या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला नेमकं कोणतं फेस शीट मास्क वापरावं याबाबत संभ्रम निर्माण होऊ शकतो. यासाठीच आम्ही दिलेली ही माहिती नक्कीच तुमच्या फायद्याची ठरू शकते.
तेलकट त्वचा (Oily Skin)
तेलकट त्वचेच्या लोकांनी कोणतंही फेस शीट मास्क वापरू नये. कारण शीट मास्कमुळे तुमची त्वचा आणखी तेलकट होऊ शकते. असंं असलं तरी एस टू डिटॉक्सिफाइंग चारकोल पेपर मास्क (Yes To Detoxifying Charcoal Paper Mask) तुमच्या त्वचेसाठी उत्तम ठरू शकेल कारण यामुळे तुमच्या त्वचेतील तेलकटपणा कमी होतो आणि त्वचा तजेलदार दिसू लागते.
या फेस शीट मास्कची किंमत 221 असून तुम्ही तो या ठिकाणी खरेदी करू शकता.
कोरडी त्वचा (Dry Skin)
ज्यांची त्वचा कोरडी आणि रुक्ष आहे त्यांना त्वचेच्या पोषणाची अधिक गरज असते. तुमच्या कोरड्या त्वचेला मऊ आणि मुलायम करण्यासाठी तुम्ही इनिसफ्रीचं स्कीन क्लिनिक हाईफ्यूरॉनिक अॅसिड शीट मास्क वापरू शकता. यातील Hyaluronic अॅसिडमुळे त्वचेचे चांगले पोषण होते. खरंतर हे अॅसिड आपल्या त्वचेत निर्माण होतच असते. पण आजकालच्या वाढत्या प्रदूषण, अयोग्य आहार आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे त्वचेमध्ये हे अॅसिड कमी प्रमाणात निर्माण होत आहे. या फेस शीट मास्कची किंमत 150 रू असून तुम्ही ते या ठिकाणी खरेदी करू शकता.
संवेदनशील त्वचा (Sensitive Skin)
जर तुमची त्वचा अती संवेदनशील असेल तर त्वचेची अधिक काळजी तुम्ही घेणं गरजेचं आहे. तुमच्या त्वचेसाठी दी फेस शॉप चं रिअल नेचर लोटस फेस मास्क (The Face Shop’s Real Nature Lotus Face Mask) अगदी परफेक्ट आहे. यातील नैसर्गिक तेल आणि घटकांमुळे तुमची त्वचा हायड्रेट राहते. या उत्पादनाचे दुष्परिणाम फारच कमी असल्यामुळे तुम्हाला हे उत्पादन नक्कीच आवडू शकेल. या उत्पादनाची किंमत 100 रू असून तुम्ही ते या ठिकाणी खरेदी करू शकता.
अॅंटी एजिंग (Anti Ageing)
वाढत्या वयानुसार तुमच्या त्वचेवर त्याचे परिणाम दिसू लागतात. काहीही असलं तरी चेहऱ्यावर दिसू लागलेल्या एजिंगच्या खुणा तुम्ही कमी करू शकता. अॅंटी एजिंगवर केले जाणारे उपाय करायला तुम्हाला वेळ मिळत नसेल तर या फेस शीट मास्कचा तुम्हाला चांगला उपयोग होऊ शकतो. या फेस शीट मास्कमुळे तुमची त्वचा फ्रेश आणि चमकदार दिसू लागते. मात्र तुम्ही या फेस शीटचा वापर आठवड्यातून एकदा आणि महिन्यातून फक्त तीनदाच करू शकता. या समस्येसाठी तुम्ही वापरू शकता दी मॉन्डसब अॅंटी-रिंकल अॅंड मॉईश्चराईझर फेस शीट मास्क (The Mondsub Anti-Wrinkle & Moisturizing Face Mask Sheet). या फेस शीट मास्कमुळे तुमची निस्तेज त्वचा चमकदार तर होईलच शिवाय तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्याही कमी होतील. या फेस शीट मास्कची किंमत 499 रू असून तुम्ही या ठिकाणी ते खरेदी करू शकता.
नॉर्मल त्वचा (Norma Skin)
जर तुमची त्वचा नॉर्मल प्रकारची असेल तर तुम्हाला फार चिंता करण्याची मुळीच गरज नाही. मात्र दैनंदिन कामाच्या ताणामुळे तुम्ही थकला असाल आणि तुम्हाला फ्रेश दिसावं असं वाटत असेल तर हा फेश शीट मास्क नक्कीच चांगला परिणाम देऊ शकेल. दी फेस शॉप बायो-सेल ब्राइटनिंग फेस मास्क (The Face Shop Bio-Cell Brightening Face Mask) तुमच्यासाठी फारच फायदेशीर ठरू शकेल. शिवाय याचे कोणतेही दुषपरिणाम होत नाहीत. या फेस शीट मास्कची किंमत 300 रू असून तुम्ही हे या ठिकाणी खरेदी करू शकता.
जर तुम्हाला त्वरीत परिणाम हवा असेल तर कोणते फेस शीट मास्क वापराल? (Face Mask For Instant Result)
मास्कराइड प्री-पार्टी प्रेप फेशियल शीट मास्क (The MaskerAide Pre-Party Prep Facial Sheet Mask)
जर तुम्हाला एखाद्या समारंभासाठी त्वरीत तयार व्हायचं असेल तर हे शीट मास्क तुम्हाला फारच फायदेशीर ठरेल. यामध्ये ऑर्गन ऑईल, संत्र्याच्या सालांचं तेल, फळांचा अर्क, तांदळाचा अर्क आणि मध यांचा योग्य वापर यात करण्यात आला आहे. हे घटक मेकअप करण्याआधी तुमच्या त्वचेला मऊ आणि मुलायम करतात. या मास्कमुळे तुमची त्वचा त्वरीत तजेलदार दिसू लागते. या फेस शीट मास्कची किंमत 399 असून तुम्ही या ठिकाणी तो खरेदी करू शकता.
दी फेस शॉप रिएल नेचर राईस फेस मास्क (The Face Shop Real Nature Rice Face Mask)
वाचा – घरच्या घरी बनवा असे फेस सीरम जे देतील तुमच्या त्वचेला ग्लो
या फेस मास्कमध्ये तांदळाचा योग्य वापर करण्यात आला आहे. त्यामुळे अॅंटी एजिंग हे फेस शीट मास्क अगदी परफेस्ट आहे. याच्या वापरामुळे तुमची निस्तेज त्वचा त्वरीत फ्रेश दिसू लागेल. याची किंमत 100 रू असून तुम्ही या ठिकाणी ते खरेदी करू शकता.
नायका स्कीन सिक्रेट टर्मेरिक कोकोनट शीट मास्क (Nykaa Skin Secrets Turmeric + Coconut Sheet Mask)
नायकाची सर्वच सौदर्य उत्पादने उत्तम आहेत. नायकाचं हे शीट मास्क तुमच्या त्वचेवर चांगला परिणाम करतं. कारण यामध्ये हळद आणि नारळाच्या घटकांचा उत्तम वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे तुमची त्वचा सुंदर दिसू लागते. याची किंमत 100 रू असून तुम्ही या ठिकाणी ते खरेदी करू शकता.
इनिसफ्री माय रिअल स्वीझ मास्क हनी (Innisfree My Real Squeeze Mask Honey)
जर तुमची त्वचा फारच कोरडी आणि निस्तेज दिसत असेल तर हे फेस शीट मास्क तुमच्यासाठी उत्तम ठरेल. यातील मधामुळे तुमची त्वचा मऊ होईल आणि फ्रेश दिसू लागेल. याची किंमत 100 रू असून तुम्ही ते या ठिकाणी खरेदी करू शकता.
गार्निअर स्कीन नॅचरल लाईट कम्पीट सीरम मास्क (Garnier Skin Naturals Light Complete Serum Mask)
या मास्कमध्ये लिंबू आणि व्हिटॅमिनचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे तुमची त्वचा नितळ आणि चमकदार दिसू लागते. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग कमी होऊ शकतात. याची किंमत 999 असून तुम्ही ते या ठिकाणी खरेदी करू शकता.
इनिसफ्री माय रिअल स्वीझ मास्क टोमॅटो (Innisfree My Real Squeeze Mask – Tomato)
अती दगदग आणि कामाच्या ताणामुळे जेव्हा तुम्ही थकता तेव्हा त्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसू लागतो. मात्र दैनंदिन कामातून वेळ न काढू शकल्यामुळे तुम्हाला सौदर्योपचारांसाठी वेळ काढता येत नाही. अशा वेळी त्वरीत फ्रेश दिसण्यासाठी तुम्ही हे फेस शीट मास्क वापरू शकता. यातील टोमॅटोच्या गुणधर्मांमुळे तुमची त्वचा चमकदार तर होतेच शिवाय नितळही दिसू लागते. या फेस शीट मास्कची किंमत 100 रू असून तुम्ही ते या ठिकाणी ते खरेदी करू शकता.
नायका स्कीन सिक्रेट्स ब्लॅक मड अॅलोविरा शीट मास्क (Nykaa Skin Secrets Black Mud + Aloe Vera Sheet Mask)
ब्लॅक मडमुळे तुमची त्वचा सैल पडत नाही आणि तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. शिवाय कोरफडीच्या गुणधर्मांमुळे तुमच्या त्वचेला इंन्स्टंट ग्लोदेखील येतो. या उत्पादनाची किंमत 100 असून तुम्ही या ठिकाणी ते खरेदी करू शकता.
नायका स्कीन सिक्रेट पर्ल हॅल्युरोनिक अॅसिड शीट मास्क (Nykaa Skin Secrets Pearl + Hyaluronic Acid Sheet Mask)
जर तुमची त्वचा कोरडी असेल तर हे शीट मास्क तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. कारण यातील Hyaluronic Acid तुमच्या त्वचेला मऊ आणि मुलायम करतं. शिवाय यातील मोत्याच्या गुणधर्मांमुळे तुमची त्वचा मोत्याप्रमाणे चमकू लागते. याची किंमत 100 असून तुम्ही या ठिकाणी ते खरेदी करू शकता.
अधिक वाचाः
Concealers: तुमच्या त्वचेसाठी योग्य कन्सिलर कसं निवडाल
‘या’ लाईफ चेजिंग मेकअप टीप्स तुम्हाला माहित असायलाच हव्या
अनावश्यक केस काढून आणा चेहऱ्यावर Natural Glow!
Home Remedies & How To Use Makeup To Hide Pimples In Marathi
त्वचेसाठी बदामाच्या तेलाचे फायदे (Benefits of Almond Oil for Skin)
चेहऱ्याची निगा राखण्यासाठी काही महत्वाच्या स्टेप्स (Skin Care Tips In Marathi)
फोटोसौजन्य – शटरस्टॉक