साडीची फॅशन कधीच आऊटडेटेड होत नाही. शिवाय साडी म्हणजे प्रत्येक स्त्रीचा जिव्हाळ्याचा विषय असतो. सहाजिकच भारतात फॅशन इंडस्ट्रीमध्ये सर्वांना आवडणाऱ्या नवं नवीन साड्यांचे प्रकार किंवा ट्रेंड सतत येतंच असतात. तुमची साडी जास्त महाग असो वा स्वस्त तुम्ही साडीची कशी काळजी घेता यावर तुमची साडी जास्त काळ टिकणार का हे अवलंबून असते.अनेकींच्या घरी आजही त्यांच्या आजी, आईची साडी जपून ठेवलेली असते. कारण प्रत्येक साडीत स्त्रीच्या भावना गुंतलेल्या असताता. यात जर तुमच्या साडी कलेक्शनमध्ये एखादी नाजूक नेटची साडी असेल तर तुम्हाला तिची जरा विशेष निगा राखावी लागते. शिफॉन,जॉर्जेट,ऑर्गेंजा अशा डेलिकेट साड्यांप्रमाणेच नेटची साडी खूपच नाजूक असते. यासाठीच जाणून घ्या अशा डेलिकेट नेटच्या साडीची कशी घ्यावी काळजी
नेटची साडी धुताना काय काळजी घ्यावी –
नेटची साडी जास्त दिवस टिकवायची असेल तर ती वारंवार धुवू नका. ड्राय क्लिन केल्यास अथवा या टिप्स फॉलो केल्यास ती लवकर खराब होणार नाही.
- नेटची साडी कधीच वॉशिंग मशीनमध्ये धुवू नका. कारण असं केल्यास तुमची साडी नक्कीच खराब होऊ शकते.
- हार्श डिर्टजंट पेक्षा सॉफ्ट शॅम्पू अथवा लिक्विड सोपने नेटची साडी हाताने धुवा.
- त्याचप्रमाणे साडी धुतल्यावर ती कडक उन्हात वाळत घालू नका. सावलीत आणि हवेशीर ठिकाणी तुम्ही नेटची साडी सुकवू शकता.
- सर्वात उत्तम म्हणजे नेटची रात्री धुवून सुकवावी. ज्यामुळे ती मुळीच खराब होणार नाही.
- नेटची साडी इस्त्री करताना इस्त्री अती गरम करू नये. असं केल्यास साडीचे डेलिकेट नेट जळून जाईल.
- नेटच्या साडीवर एखादे पातळ सुती कापड टाकून मगच साडी तुम्ही प्रेस करू शकता.
नेटच्या साडीची कशी राखावी निगा
नेटची साडी धुण्याप्रमाणेच वॉर्डरोबमध्ये ठेवतानाही विशेष काळजी घ्यायला हवी.
- नेटची साडी नेहमी घडी घालून वॉर्डरोबमध्ये ठेवा. कारण साडीवर चुरघळ्या पडल्या तर ती प्रेस करणं अतिशय कठीण काम होईल.
- सुरघळलेली नेटची साडी इस्त्री करण्यासाठी त्यावर थोडं पाणी शिंपडा आणि मग इस्त्री करा
- नेटची साडी घडी घालून ठेवण्यासाठी तुम्ही या साडीमध्ये बटर पेपर फोल्ड करून ठेवू शकता.
- नेटची साडी हॅंगरवर अडकवून ठेवण्यापेक्षा ती कॉटनच्या साडी कव्हर अथवा सुती कापडामध्ये गुंडाळून ठेवा.
नेटची साडी नेसताना काय काळजी घ्यावी
नेटची साडी नेसताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, नाहीतर ती फाटून खराब होऊ शकते.
- साडी नेसताना जास्त पिन अप करू नका. तुम्ही जितके पिन साडीला लावणार तितकी साडी फाटण्याची शक्यता वाढेल.
- नेटच्या साडीचा पदर नेहमी पिनअप करा जर पदर मोकळा सोडला तर तो अडकून साडी खराब होऊ शकते.
- नेटच्या साडीसोबत जास्त जड दागिने घालू नका. कारण जर दागिन्यांमध्ये तुमची नेटची साडी अडकली तर ती खराब होण्याची शक्यता वाढेल.
- नेटच्या साडीवर उग्र परफ्यूम वापरू नका कारण असं केलं तर साडीचे फॅब्रिक लवकर खराब होईल.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
काळा रंग नेहमीच का असतो ट्रेंडमध्ये, स्टायलिश दिसण्यासाठी जाणून घ्या कारण
ऑनलाईन फूटवेअर खरेदी करताय मग हे वाचाच
चोकर सेट जे वाढवतील तुमच्या गळ्याची शोभा