एखादा मस्त मेकअप व्हिडिओ पाहिल्यानंतर असाच मेकअप करावा आपल्याला वाटते. पण कोणताही मेकअप करताना तुमच्या चेहऱ्याचा पोत, तुमचा रंग आणि मेकअपकडून तुमची असलेली अपेक्षा अगदी स्पष्ट असायला हवी. हे झाले सर्वसामान्य मेकअपबाबत. पण तुमच्या चेहऱ्यावर जर खूप पिंपल्स असती तर मेकअप करताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे असते. काही गोष्टींची काळजी तुम्ही घेतली तर तुमच्या त्वचेला कोणत्याही मेकअप प्रोडक्टमुळे त्रास होणार नाही. जाणून घेऊया तुम्ही करत असलेल्या चुका आणि मेकअप करण्याच्या सोप्या टिप्स
लॉकडाऊनमध्ये गळू लागलेत केस,त्वचाही झाली निस्तेज तर मग नक्की वाचा
तुमची त्वचा आहे का अॅक्ने प्रोन (Acne Prone Skin)
अॅक्ने प्रोन त्वचा ही तेलकट त्वचेमध्ये मोडणारी असते. अशी त्वचा असलेल्या लोकांचे पोअर्स हे मोठे असतात. त्यामुळेच त्यांच्या पोअर्समध्ये घाण साचून पिंपल्स येण्याची शक्यता असते. काही तेलकट त्वचेवर पिंपल्स येण्याचा त्रास फारसा नसतो. त्यामुळे सगळ्याच त्वचा या अॅक्नेप्रोन त्वचेमध्ये येत नाहीत. पण तुमच्या चेहऱ्यावर सतत पिंपल्स येत असतील आणि ते लवकर न जाता त्यामध्ये पू साचत असेल तर तुमची त्वचा अॅक्ने प्रोन त्वचेमध्ये मोडते असते समजावे. या त्वचेवर तेलाचा इतका जाड थर येतो की, त्वचेच्या अन्य समस्या ही या त्वचेच्या व्यक्तिंना सहन करावे लागतात.
विगन अथवा क्रुअल्टी फ्री मेकअपसाठी बेस्ट ब्रॅंड (Cruelty Free Makeup Brands In Marathi)
अॅक्ने प्रोन असलेल्या त्वचेसाठी असा असावा मेकअप
- मेकअपमधील पहिली महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे प्राईमर. तुमच्या त्वचेला काही होऊ नये म्हणून प्राईमर लावण्याचा सल्ला दिला जातो. अॅक्ने प्रोन त्वचेने चांगल्या प्रतीचे प्राईमर लावायला हवे. कारण कोणतेही प्रोडक्ट तुमच्या त्वचेला थेट लागू नये यासाठी प्राईमर लावले जाते. हल्ली बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे प्राईमर मिळतात. अॅक्ने प्रोन त्वचेने कायम ऑईल- फ्री प्राईमरचा उपयोग करणे गरजेचे असते. म्हणून तुम्ही तुमच्या मेकअपची सुरुवात ऑईल फ्री प्राईमरने करा.
- अॅक्ने प्रोन त्वचा ही तेलकट असते. तुमच्या त्वचेला तुम्ही कोणतेही फाऊंडेशन लावून चालत नाही. त्यामुळे तुम्ही ऑईल फ्री फाऊंडेशनची निवड करा. कारण तुम्ही ऑईल फ्री फाऊंडेशन निवडले तर तुमची त्वचा तेलकट दिसणार नाही. जर तुम्ही साधे फाऊंडेशन वापरत असाल तर हमखास तुमची त्वचा काळवंडल्यासारखी दिसणार शिवाय तुमचे पिंपल्सही त्यामध्ये उठून दिसू शकतात.
- अनेकदा काही व्हिडिओमध्ये आपण फाऊंडेशनचे थर लावताना पाहतो. पण जर तुमची त्वचा अॅक्ने प्रोन असेल तर तुम्ही असा थर लावणे फारच चुकीचे आहे. पिंपल्स कव्हर करण्यासाठी फाऊंडेशनचा थर अजिबात लावू नका. अगदी हलक्या हाताने तुमचा संपूर्ण चेहरा कसा कव्हर होईल याचा विचार करा.
- पिंपल्स असणाऱ्या त्वचेसाठी कन्सिलर लावणे फारच आवश्यक असते. पिंपल्स कव्हर करण्यासाठी लाल आणि हिरव्या रंगामध्ये कन्सिलर मिळतात जे कमालीचे काम करतात. पण सगळे पिंपल्स कमी करताना चेहऱ्यावर पिंपल्सचा खूप वापर करु नका.
- जर तुमच्या चेहऱ्यावर खूप पिंपल्स असतील तर तुम्ही शक्यतो फिकट रंगाची लिपस्टीक निवडू नका. तुम्ही डार्क रंगाची लिपस्टिक निवडली तर तुमच्या चेहऱ्याकडे लक्ष जात नाही. तर तुमच्या ओठांकडे लक्ष जाते. त्यामुळे पिंपल्स दिसतील ही भीतीही कमी होते.
- अनेकदा चेहऱ्याच्या काही ठराविक भागांवर आपल्याला जास्त पिंपल्स असतात. म्हणजे काहींना गालांवर, हनुवटीवर काहींना कपाळावर पिंपल्स असतात. अशावेळी तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे त्या भागावर कमीत कमी मेकअपचा उपयोग करायचा आहे. काही ठिकाणी तुम्हाला ब्लश, ब्रॉझरसारखा मेकअप टाळता आला तर फारच उत्तम
मेकअप केल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा तेलकट होऊ द्यायचा नसेल तर तुम्ही त्यावर सेटिंग स्प्रेचा उपयोग करायला विसरु नका. त्यामुळे तुमचा चेहरा तेलकट होणार नाही आणि तुम्हाला आणखी पिंपल्सचा त्रास होणार नाही.
आता तुमच्या त्वचेवर पिंपल्स असतील आणि तुम्ही काही चुका करत असाल तर तुम्ही या काही गोष्टींचा नक्की विचार करा.
उत्कृष्ट 10 वॉटरप्रूफ आयलायनर, जे वाढवतील तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य (Waterproof Eyeliner)