Advertisement

DIY फॅशन

सणाला साडी नेसून दिसायचं असेल स्टायलिश तर फॉलो करा Draped Saree

Dipali NaphadeDipali Naphade  |  Aug 16, 2019
सणाला साडी नेसून दिसायचं असेल स्टायलिश तर फॉलो करा Draped Saree

कोणत्याही महिलेला साडी हे वस्त्र सुंदरच दिसतं. मग ती महिला जाड असो वा बारीक, उंच असो ठेंगणी. साडी सर्वांनाच सुंदर लुक मिळवून देते. प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळा लुक साडी देते. पण ही गोष्टही तितकीच खरी आहे की आजकाल मुलींना साडी सांभाळता येत नाही म्हणून नेसायची नसते. तर काही जणींना साडी नेसायला आवडत असूनही ती नेसण्याइतका वेळ मिळत नाही. पण तुम्हाला स्टायलिश राहायचं असेल आणि सणासुदीला साडी नेसून मस्त स्टायलिश दिसायचं असेल तर एक चांगला पर्याय आहे तो म्हणजे ड्रेप्ड साडी (Draped Saree). 

ड्रेप्ड साडी म्हणजे तयार अगदी व्यवस्थित बांधलेली साडी. बस तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमधून ही साडी काढा आणि आहे तशी ड्रेससारखी घाला. ही साडी घालणं अतिशय सोपं आहे. आम्ही तुम्हाला या लेखामधून अशाच काही स्टायलिश ड्रेप्ड साडीबद्दल सांगणार आहोत. जी घालून तुम्ही ग्रेसफुल इंडियन स्टायलिश लुक मिळवू शकता आणि घरात सणासुदीलाही मजा करू शकता. 

1. शिल्पा शेट्टीची अँटिक मेटालिक ड्रेप्ड साडी

शिल्पा शेट्टीची फिगर अतिशय सुंदर आहे. अशा फिगरवर ही साडी खूपच शोभून दिसते. शिल्पाने नेसलेली साडी ही अँटिक मेटालिक ड्रेप्ड फ्लूटेड साडी आहे. तुम्हीदेखील अशी साडी ड्रेप करू शकता आणि खरेदी करू शकता. तुम्हाला बाजारामध्ये अशा तऱ्हेच्या साड्या सर्रास दुकानांमध्ये उपलब्ध होतात. फक्त अशी साडी घेताना आपल्याला ती सूट होते की नाही आणि त्याचं फिटिंग योग्य आहे की नाही हे पाहणं गरजेचं आहे. 

नऊवारी साडी बद्दल देखील वाचा

2. ड्रेप्ड साडीचा अप्रतिम अंदाज

फॅशन डिजाईनर किरण उत्तम घोषने डिझाईन केलेल्या ड्रेप्ड साडीचं खूप मोठं कलेक्शन आहे. ती या साड्यांसाठीच ओळखली जाते. तुम्हीदेखील सोशल मीडियावरून हे कलेक्शन पाहू शकता. या कलेक्शनचं वैशिष्ट्य म्हणजे याचा मेटालिक रंग आणि स्टायलिश अंदाज. तुम्हीदेखील फॉलो करून अशा ड्रेप्ड साडी तुमच्या वॉर्डरोबचा भाग बनवू शकता. अशा साड्या सणासुदीला खूपच आकर्षक आणि शोभून दिसतात. तसंच तुम्ही इतर लोकांमध्ये नक्कीच उठून दिसाल. 

अनारकली कुर्ता बद्दलही वाचा

3. करिष्माचा राजसी अंदाज

करिष्माचा हा अंदाज खूपच राजसी असून यामध्ये करिष्मा खूपच आकर्षक दिसत आहे. करिष्माने नेसलेली ही ड्रेप्ड साडी म्हणजे मेटालिकचा एक अद्भूत नमुना आहे जो खूपच स्टायलिश लुक देत आहे. तसंच यासाठी वापरण्यात आलेला ब्लाऊजचा गळा हा एखाद्या नेकलेसचा लुक देत आहे. त्यामुळे अशा प्रकारची साडी तुम्हाला जास्त सांभाळावी लागत नाही आणि तुम्हाला वेगळा आणि rich लुक ही साडी मिळवून देते. 

साडीबरोबर घाला हे 7 Sexy ब्लाऊज

4. मॉडर्न मुलींसाठी दोन स्टायलिश लुक

रनवे फॅशन वीकमधून घेण्यात आलेले हे दोन स्टायलिश लुक अप्रतिम आहेत. या दोन्ही ड्रेप्ड साडीबरोबर कलरफुल मेटालिक बीड्सवर्कवाले ब्लाऊज तुमचा लुक अधिक स्टायलिक आणि आकर्षक बनवतात. तुम्ही अशा तऱ्हेची साडी नेसल्यास, तुमच्यावरून कोणाचीही नजर हटणार नाही. शिवाय हा एक वेगळा लुक दिसेल. 

5. पारंपरिक मेटालिक ड्रेप्ड साडी

फॅशन डिजाईनर किरण उत्तम घोषच्या स्टायलिश ड्रेप्ड साडीचा अजून एक नमूना तुम्ही बघू शकता. मिनी माथूरने नेसलेली ही साडी तिला खूपच खुलून दिसत आहे. तुम्हालादेखील अशी साडी नक्कीच सुंदर दिसेल. मेटालिक कलरच्या या ड्रेप्ड साडीचा हा एक नवीन अंदाज आहे जो एकदम पारंपरिक साडी स्टाईलप्रमाणे आहे. तुम्हाला जास्त फॅशनेबल साडी न नेसता अशी पारंपरिक अर्थात ट्रेडिशनल साडी नेसायची असेल तर तुम्ही हा पर्याय वापरू शकता. तुम्हाला कोणत्याही साडीच्या दुकानामध्ये अशी साडी मिळू शकते. 

या लग्नाच्या सीझनमध्ये साडी नेसा वेगळ्या पद्धतीने

6. अप्रतिम एम्ब्रॉयडर्ड ड्रेप्ड साडी

तुम्हाला एखाद्या मोठ्या कार्यक्रमासाठी साडी खरेदी करायची असेल तर तुम्ही अशा तऱ्हेची एम्ब्रॉयडर्ड साडीचा पर्याय निवडू शकता. तुमची सुंदरता या साडीमध्ये अधिक शोभून दिसेल. प्रसिद्ध डिझाईनर तरुण तहिलियानीद्वारे डिजाईन करण्यात आलेली ही अप्रतिम एम्ब्रॉयडर्ड साडी अशा कार्यक्रमांसाठी एकदम परफेक्ट आहे. तुम्ही तुमच्या ड्रेप्ड साडीवरदेखील अशा तऱ्हेचं डिझाईन करून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला डिझाईनर कपडेच खरेदी करायला हवेत असं नाही. 

तसेच साडी परिधान करणारे टिप्स वाचा 

7. विविध रंगात उपलब्ध असणारी प्लेन ड्रेप्ड साडी

तुम्हाला नेहमीच्या वापरासाठी जर अशी ड्रेप्ड साडी खरेदी करायची असेल तर तुम्ही प्लेन साडी खरेदी करा आणि तुमच्या नेहमीच्या वापरात अशी साडी जास्त चांगली दिसेल. तुम्ही यामध्ये कोणताही रंग निवडू शकता. विविध रंगांची उपलब्धता या साडीमध्ये बाजारात तुम्हाला मिळेल. तसंच या साडीबरोबर तुम्ही नेट ब्लाऊज वापरल्यास, तुमच्या सौंदर्यात अधिक भर पडेल. 

8. मेटालिक ड्रेप्ड साडीचा नवा स्टायलिश लुक

ड्रेप्ट साडीमध्ये मेटालिक रंगाची जास्त चलती आहे असं म्हणावं लागेल. या साडीच्या ब्लाऊजची स्टाईल थोडी वेगळी असली तरीही मॉडर्न आहे. ड्रेप्ड साडीबरोबर ट्रेडिशनल ब्लाऊजच हवा असं अजिबातच नाही. याबरोबर तुम्ही टीशर्ट, टँक टॉप अथवा कुरतीदेखील घालू शकता. जे अधिक ट्रेंडी दिसतं.

साडीचे नव्या ट्रेंडमधील 5 प्रकार – कशी नेसावी साडी