सुंदर आणि नितळ त्वचा प्रत्येकीला हवी असते. मात्र आजकालच्या धकाधकीच्या जीवनात कामाचा अती ताण, अपूरी झोप आणि धुळ-प्रदूषणाचा तुमच्या त्वचेवर दुष्परिणाम होत असतो. त्यामुळे नियमित स्कीन केअर करणं फारच गरजेचं झालं आहे. मात्र त्वचेची काळजी घेण्यासाठी सतत पार्लरचा खर्च प्रत्येकीला परवडेलच असे नाही. शिवाय पार्लरमधील सौंदर्योपचार हे फारच वेळकाढू असल्याने तुमच्याकडे त्याच्यासाठी तेवढा पुरेसा वेळ असेलच असे नाही. पार्लरमध्ये जाण्यासाठी पुरेसा वेळ नसेल तर कमीतकमी घरी तुम्ही तुमच्या त्वचेची निगा राखणं गरजेचं आहे. अगदी प्राचीन काळापासून सौंदर्य खुलविण्यासाठी आणि चेहरा सुंदर दिसण्यासाठी अनेक घरगुती गोष्टींचा वापर केला जातो. स्वयंपाक घरात अनेक गोष्टी असतात ज्यांचा वापर करून तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकता. यासाठीच आम्ही तुम्हाला gharguti face pack in marathi सांगत आहोत. ज्यांचा तु्म्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकेल. घरगुती फेसपॅक करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही शिवाय यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला घरात सहज मिळू शकतं. घरी केलेल्या फेसपॅकमध्ये कोणतेही हानिकारक पदार्थ नसल्यामुळे तुम्ही ते निशंकपणे वापरू शकता. कारण त्यामुळे तुमच्या त्वचेचं कोणतंही नुकसान होत नाही.
चेहरा आणि त्वचेची काळजी घेताना या टीप्स जरूर लक्षात ठेवा (Home Made Beauty Tips In Marathi)
चेहऱ्याची निगा राखण्यासाठी काही महत्वाच्या स्टेप्स (Skin Care Tips In Marathi)
यासाठी घरीच तयार करा हे फेस पॅक (Homemade Face Pack In Marathi)
चेहरा आणि त्वचेची काळजी घेताना या टीप्स जरूर लक्षात ठेवा (Home Made Beauty Tips In Marathi)
वाढते प्रदूषण आणि धुळ-माती यामुळे तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेवर एक थर निर्माण होतो ज्यामुळे त्वचेची छिद्रे झाकली जातात. त्वचेवरील नाजूक छिद्रे बंद झाल्यामुळे त्वचेला पूरेसा ऑक्सिजन मिळत नाही. ज्यामुळे तुमची त्वचा निस्तेज दिसू लागते. शिवाय त्वचेवर डेड स्किनचादेखील एक थर दररोज जमा होत असतो तो नियमित स्वच्छ करणंही तितकंच गरजेचं असतं. यासाठीच दररोज नित्यनेमाने त्वचाआणि चेहऱ्याची काळजी घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर स्किन केयर रूटीन फॉलो केलं तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. चेहऱ्याची आणि त्वचेची नियमित काळजी घेतल्यामुळे सतत फ्रेश दिसाल.
चेहऱ्याची निगा राखण्यासाठी काही महत्वाच्या स्टेप्स (Skin Care Tips In Marathi)
सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी चेहऱ्याची आणि त्वचेची निगा कशी राखायची हे समजून घ्यायला हवं. यासाठी तुमच्या डेली स्किन केयर रूटीनमध्ये या काही गोष्टींचा समावेश जरूर करा.
क्लिझिंग
सकाळी उठल्यावर केवळ पाण्याने तोंड धुतल्याने चेहरा स्वच्छ होतोच असं नाही. कारण त्यामुळे तुमची त्वचा वरवर स्वच्छ दिसते. मात्र त्वचेच्या आतमधील धुळ आणि प्रदूषण तसेच राहिल्यामुळे ती पुन्हा निस्तेज दिसू लागते.शिवाय त्वचा मुळापासून स्वच्छ करण्यासाठी केवळ फेसवॉशने चेहरा धुणे पुरेसे नाही. यासाठी एखाद्या चांगल्या क्लिंजरने चेहरा स्वच्छ करा. ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील डेड स्किन, धुळ आणि प्रदूषण स्वच्छ होईल. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्ही घरीच क्लिंजर तयार करू शकता. यासाठी कच्चा दूधामध्ये लिंबूरस टाका आणि त्या मिश्रणाने तुमचा चेहरा स्वच्छ करा. सकाळीच चेहरा क्लिंजरने स्वच्छ करण्याची सवय लावल्यास तुमचा चेहरा दिवसभर फ्रेश राहील.
मॉश्चराईझिंग
त्वचेची काळजी घेण्यामध्ये सर्वात महत्वाची स्टेप आहे ती म्हणजे त्वचा मॉश्चराईझ करणे. त्वचा मऊ राहण्यासाठी एखादं चांगलं मॉश्चराईझर क्रीम त्वचेवर अप्लाय करा. ज्यामुळे तुमची त्वचा दिवसभर मऊ राहील आणि तुम्ही फ्रेश दिसू शकाल. लक्षात ठेवा चेहऱ्याप्रमाणेच संपूर्ण शरीराच्या त्वचेला मॉश्चराईज करण्यासाठी गरज आहे. त्यामुळे सकाळी त्वचेवर मॉश्चराईझ क्रीम लावण्यास मुळीच विसरू नका. नियमित त्वचा मॉश्चराईझ केल्यामुळे तुमच्या त्वचेवरील डाग, पिंपल्स आणि ब्लॅकहेड्स कमी होऊ लागतात. त्वचा मॉश्चराईझ केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर लवकर सुरुकुत्या पडत नाहीत. यासोबच
वाचा – Benefits Of Using Charcoal Products In Marathi
टोनिंग
त्वचेला टोनिंग करणे फार गरेजेचे आहे. कारण यामुळे तुमच्या त्वचेवर जमा झालेले अतिरिक्त तेल कमी होते. शिवाय टोनिंग केल्यामुळे तुमची त्वचा चमकदार दिसू लागते. त्वचा टोन करण्यासाठी क्लिंजींग केल्यावर लगेच त्यावर गुलाबपाणी, काकडीचा रस अथवा बटाट्याचा रस लावू शकता.
सनस्क्रिन
सनस्क्रीन लावल्यामुळे तुमची त्वचा टॅन होत नाही. मॉश्चराईझ केल्यावर त्वचेवर दहा मिनीटांनी एखादं चांगलं सनस्क्रीन लावा. उन्हाळ्या व्यतिरिक्त पावसाळा आणि हिवाळ्यातही त्वचेला सनस्क्रीन लावण्याची तितकीच गरज असते. उन्हाळ्यात मात्र चेहऱ्यासोबत, मान आणि हात अशा इतर भागांवरील त्वचेलाही सनस्क्रीन लावा.
नियमित क्लिझिंग, टोनिंग आणि मॉश्चराईझ करण्यासोबतच त्वचेला इंन्संट ग्लो देण्यासाठी हे फेसपॅक जरूर लावा.
फेस पॅक
चेहऱ्याला थंडावा मिळण्यासाठी आणि चेहऱ्याचे योग्य पोषण होण्यासाठी चेहऱ्यावर नियमित फेसपॅक लावणं तितकच गरजेचं आहे.
वाचा – तसेच मराठीत चमकणारा चेहरा टिप्स
यासाठी घरीच तयार करा हे फेस पॅक (Homemade Face Pack In Marathi)
त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही gharguti face pack in marathi करू शकता. या काही होममेड फेसपॅकमुळे तुमच्या सौंदर्यांत अधिकच भर पडेल.
बेसन आणि दूध
बेसन आणि दुधाचा फेसपॅक तयार करण्यासाठी चार ते पाच चमचे बेसणामध्ये तीन-चार चमचे दूध आणि एक चमचा मध घालून एक चांगली पेस्ट तयार करा. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनीटांनी थंड पाण्याने चेहरा धुवून टाका. बेसन आणि दुधामुळे तुमची त्वचा नितळ दिसेल आणि मधामुळे तुमची त्वचा मऊ होईल. तुम्हील आठवड्यातून एकदा हा फेसपॅक लावू शकता. यासाठी लागणारे साहित्य घरात सहज उपलब्ध असल्यामुळे तुम्हाला नियमित हा फेसपॅक लावता येऊ शकेल.
मध
घाईगडबडीमध्ये जर तुमच्याकडे घरगुती फेसपॅक तयार करण्यासाठी मुळीच वेळ नसेल तर मध त्यावर उत्तम उपाय ठरू शकेल. यासाठी संपूर्ण चेहऱ्यावर मधाचा एकसमान थर लावा. वीस मिनीटांनी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करा. मध चांगल्या कंपनीचे असेल याची काळजी घ्या कारण आजकाल भेसळयुक्त मधदेखील विकले जाते. मधामध्ये अॅन्टी बॅक्टेरिअल गुणधर्म असल्यामुळे त्वचेवर पुरळ आणि पिंपल्स येत नाहीत. शिवाय मधाने त्वचेतील ओलावा कायम राहील्यामुळे त्वचेचे चांगले पोषण होते. थोडक्यात मध चेहऱ्यासाठी उत्तम होममेड फेस मास्क अथवा फेस पॅक ठरू शकते.
घरगुती फ्रूट फेसपॅक वापरून आणा त्वचेवर ग्लो
मुलतानी माती आणि गुलाबपाणी
मुलतानी माती आणि गुलाबपाण्याची एक चांगली पेस्ट तयार करा. या पेस्टचा फेस पॅक चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनीटांनी चेहरा स्वच्छ करा. तेलकट त्वचेसाठी हा मुलतानी माती फेसपॅक उत्तम असतो. कारण यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होते.
काकडीचा रस आणि मध
काकडीची रस एक नैसर्गिक टोनरदेखील आहे. काकडीच्या रसामुळे तुमच्या चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होते. चेहऱ्यावरील डागांसाठी घरगुती फेसपॅक तयार करण्यासाठी एका वाटीत काकडीचा रस घ्या आणि त्यात काही थेंब मध टाका. या मिश्रणाला व्यवस्थित मिसळा. हा घरगुती फेसपॅक चेहऱ्यावर लावून वीस मिनीटांनी थंड पाण्याने चेहरा धुवा. काकडीच्या रसामुळे तुमचे डार्क सर्कल्स कमी होतात. दुपारी विश्रांती घेताना काकडीचे काप डोळ्यावर ठेवल्यामुळेदेखील तुमच्या डोळ्याखालची काळी वर्तुळे कमी होतील.
कोरफडाचा रस
एएका वाटीमध्ये कोरफडाचा रस घ्या आणि त्याची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. वीस मिनीटांनी चेहरा थंड पाण्याने धुवून टाका. कोरफडमधील अॅन्टी बॅक्टेरिअल गुणधर्मामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येत नाहीत. शिवाय चेहऱ्यावरील काळे डाग, सुरूकुत्या कमी करण्यासाठी कोरफडाचा रस एक उत्तम नैसर्गिक फेसपॅक (gharguti face pack in marathi) ठरू शकतो.
ओट्स
Face Sheet Mask : चेहऱ्यावर इंन्स्टंट ग्लो येण्यासाठी वापरा ‘हे’ फेस शीट मास्क
ओट्समधील नैसर्गिक घटकांमुळे चेहऱ्याचा दाह कमी होतो. हा फेसपॅक तयार करण्यासाठी एक वाटी ओट्स,एक चमचा मध आणि चार चमचे दूध मिस्करमध्ये लावा. दूधाचे प्रमाण तुम्ही फेसपॅक पातळ करण्यासाठी आणखी वाढवू शकता. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनीटांनी चेहरा स्वच्छ करा. ओट्स चांगले स्क्रब असल्यामुळे यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्किन कमी होते.
बटाटा आणि लिंबाचा रस
जर तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग दिसत असतील तर ते घालविण्यासाठी हा फेसपॅक योग्य ठरेल. एका वाटीमध्ये बटाट्याचा रस आणि लिंबूरस घ्या. हे मिश्रण एकत्र करून चेहऱ्यावर लावा. बटाट्याचा घरगुती फेसमास्क एक नैसर्गिक क्लिंझर आहे. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग हळूहळू कमी दिसू लागतील.
एग व्हाईट
एका वाटीमध्ये एका अंड्याचा पांढरा भाग घ्या. तो व्यवस्थित फेटून घेऊन एक फेस पॅक तयार करा. चेहऱ्यावर हा फेसपॅक लावून वीस मिनीटांनी चेहरा थंड पाण्याने धुवून टाका. अंड्यामुळे तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेला पोषण मिळते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक दिसू लागते.
पपईचा गर
पईचा गर एक उत्तम फेसपॅक ठरू शकेल. कारण पपईमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यासाठी पपईचा गर आणि दूध मिक्सरमध्ये लावून त्याची एक जाडसर पेस्ट तयार करा. हा फेस पॅक चेहऱ्यावर लावून वीस मिनीटांनी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करा. तेलकट त्वचेसाठी हा फेसपॅक उत्तम असतो. कारण या फेसपॅकमुळे तुमची त्वचा स्वच्छ होते शिवाय पपईमुळे चेहऱ्यावर एक प्रकारची नैसर्गिक चकाकी येते. त्यामुळे पपई चेहऱ्यासाठी खूपच फायदेशीर आहे.
गाजराचा रस
गाजराच्या रसामध्ये अॅंटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन ए हे घटक असल्यामुळे त्वचेला एक प्रकारचा तजेलदारपणा येतो. घरीच हा फेसपॅक तयार करण्यासाठी गाजराच्या रसात एक चमचा मध मिसळा आणि हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून तुमच्या चेहऱ्यावर लावा. वीस मिनीटांनी चेहरा थंड पाण्याने धुवून काढा. यामुळे तुमच्या त्वचेला एक प्रकारचा इंस्टंट ग्लो येतो. त्वचेवरील काळे डाग घालविण्यासाठी आणि चेहरा नितळ करण्यासाठी दररोज एक ग्लास गाजराचा रस प्या अथवा जेवताना गारजाची कोशिंबीर खा. कारण यामुळेही तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.
चंदन पावडर
सौंदर्य वाढविण्यासाठी फार पूर्वीपासून चंदनाच्या लेपाचा वापर केला जातो. पूर्वी चंदनाचे खोड उगाळून त्याचा लेप त्वचेवर लावला जायचा पण आता चंदनाच्या खोडाऐवजी चंदनाची तयार पावडर अनेक आर्युवेदिक औषधांच्या दुकानात उपलब्ध असते. तुम्ही हा फेस पॅक तयार करण्यासाठी या पावडरचा वापर नक्कीच करू शकता. यासाठी दोन चमचे चंदन पावडर, चिमुटभर हळद आणि दूध एकत्र करून एक फेस फॅक तयार करा. दूधाऐवजी गुलाबपाणी अथवा अगदी साधे पाणीदेखील वापरू शकता. चंदन पावडर थंड असल्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो. हळदीच्या अॅंटीबॅक्टेरिअल घटकांमुळे तुमच्या त्वचेवरील पुरळ, पिंपल्स कमी होतात. या चंदन पावडर फेसपॅकमुळे तुमची त्वचा उजळ आणि नितळ दिसू लागते.
केळं
केळ्यामुळेदेखील तुमची त्वचा सुंदर दिसू शकते. यासाठी एक पिकलेलं केळं घ्या त्यात एक चमचा मध टाकून ते मिक्सरमध्ये वाटून घ्या. केळ्याच्या फेस पॅकची पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनीटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ करा.
संत्री
संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे संत्र्याची सालं अथवा रस चेहऱ्यावर लावल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील धुळ-प्रदूषण निघून जाते. शिवाय यामुळे तुमच्या चेहऱ्याचे उत्तम पोषण झाल्यामुळे चेहरा तजेलदार दिसू लागतो. संत्र्याच्या सालीचा फायदा त्वचेसाठी करून घ्या. यासाठी संत्र्याची साले सुकवून त्याची पावडर तयार करा. संत्राच्या पावडर मध्ये ताज्या संत्र्यांचा रस घालून एक जाडसर फेसपॅक तयार करा. चेहऱ्यावर हा फेसपॅक लावून वीस मिनीटांनी तो पॅक हाताने काढून टाका. लगेच थंड पाण्याने तुमचा चेहरा स्वच्छ करा. या फेसपॅकमुळे तुमच्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक चमक येईल आणि त्वचा मऊदेखील होईल.
त्वचा नितळ आणि सुंदर काळजी घेण्यासाठी जीवनशैलीमध्ये बदल करण्याची देखील तितकीच गरज आहे. कारण काम आणि धावती जीवनशैली यामुळे बऱ्याचदा आपण अनेक महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. नितळ त्वचा हवी असेल तर दिवसभर पुरेसे पाणी प्या ज्यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहील. दिवसभरात एकदा नारळपाणी, लिंबूपाणी अथवा कोणत्याही फळाचा रस प्या. वेळेवर झोपा आणि लवकर उठा. योग्य आणि संतुलित आहार घ्या. नियमित व्यायाम करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यसनांपासून दूर रहा. या अगदी छोट्या छोट्या गोष्टी कटाक्षाने केल्यास तुमची त्वचा सहज सुंदर आणि फ्रेश दिसू लागेल. त्वचेची निगा राखण्यासाठी आम्ही सांगितलेल्या स्किन रूटीन्स आणि घरगुती फेसपॅकचा वापर जरूर करा. आम्ही दिलेल्या टीप्स तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कंमेट्सच्या माध्यमातून अवश्य कळवा.
फोटोसौजन्य- इन्टाग्राम आणि शटरस्टॉक
तुम्हाला कदाचित ही गोष्ट आवडेल: