जेव्हा आपण एखाद्या कार्टून मूव्हीमधील रप्न्झल किंवा सिंड्रेलासारख कॅरेक्टर पाहतो. तेव्हा त्यांचे केस बघूनही आपल्याही त्यांच्यासारखेच आपलेही केस असावे असं वाटतं. एवढंच काय रस्त्यात कोणाचेही चांगले केस दिसले की, आपली नजर तिकडे वळतेच. कारण आपल्यापैकी प्रत्येकीचंच केसांवर जीवापड प्रेम असतं. जेव्हा आपण केस विंचरताना तुटलेले केस पाहतो किंवा केस धुताना गळलेले केस पाहतो तेव्हा नक्कीच हळहळतो. चांगल्या केसांसाठी लोक काय-काय करतात. पार्लरला जातो अनेक महागड्या ट्रीटमेंट्स करतो. पण तुम्ही घरच्याघरीही आयुर्वेदिक औषध वापरून केसांची काळजी आणि योग्य आहार घेऊन केस सुंदर आणि मजबूत बनवू शकता. म्हणूनच आम्ही या लेखात तुम्हाला सांगणार आहोत केसांच्या मजबूतीसाठी काही खास टीप्स. या टीप्स मजबूत केसांसाठी फॉलो करा आणि फरक बघा.
Table of Contents
सुंदर आणि मजबूत केसांसाठी टीप्स (Effective Tips For Healthy Hair In Marathi)
केसांचं करा रक्षण (Protect Your Hair)
वाऱ्यावर उडणारे केस वाटतात छान पण ते नंतर किती गुंततात हे तुम्हाला माहीत असेलच. तसंच काहीसं आहे सूर्य, प्रदूषण आणि पाण्याबाबत. कधीही घराबाहेर पडताना तुमच्या केसांचं प्रखर ऊनापासून, धुळीपासून आणि पावसाळ्यात पाण्यापासून रक्षण करा. कारण का यामुळे तुमच्या केसांसंबंधीच्या समस्यांमध्ये अजूनच वाढ होते. त्यामुळे घराबाहेर पडताना केसांवर ओढणी घ्या. स्कार्फने केस कव्हर करा, छत्री किंवा टोपी कॅरी करा.
Also Read कुरळे केस काळजी कशी घ्यावी
ओल्या केसांची अशी काळजी (Be Careful When Handling Wet Hair)
ओले केस हे दिसायला छान दिसतात पण ते लगेच तुटण्याची शक्यता असते. जेव्हा आपण केस धुतो तेव्हा तुमच्या केसांच्या मूळांना धक्का पोचण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे केस धुतल्यावर ते लगेच विंचरणं टाळा.
नियमित कंडीशनिंग (Condition Your Hair Regularly)
प्रत्येकवेळी केस धुतल्यानंतर ते नक्की मॉईश्चराईज करा. कधीही केसांना मॉईश्चरायजिंग करायचा कंटाळा करू नका. जर तुम्ही मॉईश्चरायजिंग केलं नाही तर तुमचे केस फ्रिजी होतात.
योग्य प्रकारे कंडीशन करा (Condition The Right Way)
कंडीशनिंग योग्य प्रकारे करणंही आवश्यक आहे. कंडीशनर हे नेहमी कानापासूनच्या खालच्या केसांना लावावं. कंडीशनर हे कधीच स्कॅल्पला लावू नये. जर तुम्ही स्कॅल्पला कंडीशनर लावलंत तर तुमचे स्कॅल्प अजूनच तेलकट होईल.
शँपू आणि कंडीशनर नेहमी एकच असावं (Use Shampoo & Conditioner Of Same Brand)
कधीही शँपू आणि कंडीशनर हे एकाच ब्रँडचं असावं. कारण त्यातील घटक हे सारखेच असतात. जे विशिष्ट प्रकारच्या केसांसाठी आणि कारणासाठी असतं. जेव्हा तुम्ही एकाच प्रकारचं आणि एकाच ब्रँडचे प्रोडक्ट्स वापरता तेव्हाच चांगला परिणाम केसांवर दिसून येतो.
केसांना जास्त उष्णता लागता कामा नये (Don’t Apply Excessive Heat On Hair)
तुमच्या केसांना जास्त उष्णता लागू नये याची काळजी घ्या. कारण उष्णतेमुळे केस जास्त कोरडे आणि फ्रिजी होतात. तसंच अति उष्णतेने केस भाजू शकतात. त्यामुळे अगदीच गरज असेल तेव्हाच केसांवर आर्यन/कर्लर किंवा स्ट्रेटनरचा वापर करा. या गोष्टींचा वापर करताना केसांना प्रोटेक्टंट नक्की लावा.
वाचा – केस गळतीवर घरगुती उपाय
केस घट्ट बांधणं टाळा (Don’t Tie Your Hair Too Tightly)
कितीही गरम होत असलं किंवा केसांचा कंटाळा आला म्हणून केस घट्ट बांधू नका. अगदीच केस बांधायचे असल्यास ते एखाद्या मऊ कापडाने बांधा किंवा कव्हर करा. केस घट्ट बांधल्याने मूळांपासून ओढले जातात आणि लगेच तुटतात.
झोपताना घ्या केसांची अशी काळजी (Tie Your Hair Loosely While Sleeping)
रात्री झोपताना केस शक्यतो मोकळे सोडून झोपू नका. पण जास्तही घट्ट बांधून झोपू नका. कारण झोपल्यावर मोकळे केस गुंततात. ज्यामुळे सकाळी उठल्यावर केस सोडवताना ते तुटतात. त्यामुळे शक्यतो झोपताना केस सैलसर बांधून झोपा.
केस सुकवणे आणि विंचरणे (Try Not To Rough-Dry Hair With A Towel)
केस सुकवाताना किंवा पुसताना ते टॉवेलने खसाखसा पुसू नका. तर नीट आणि हळूवारपणे पुसा. कारण असं न केल्यास ओले केस लवकर तुटतील असंच काहीसं आहे केस विंचरण्याबाबत. केसाचा गुंता सोडवताना आधी केसांचा खालील भागाच गुंता आधी सोडवा. मग केस स्कॅल्पपासून विंचरावेत. ज्यामुळे केस कमी तुटतात.
केसांना नियमितपणे तेल लावा (Apply Oil Regularly To The Hair)
तुमच्या केसांना आठवड्यातून किमान दोनदा तरी तेल लावा. कारण तेल लावणं हे तुमच्या स्कॅल्पसाठी चांगलं असतं. पण जेवढी गरज असेल तेवढंच तेल लावा. अति प्रमाणात तेल लावणंही चांगलं नाही. कारण जास्त तेल लावल्याने केस धुण्यासाठीही तुम्हाला जास्त शँपू वापरावा लागेल ज्यामुळे केसांचं नुकसान होईल आणि केसांचं नैसर्गिक तेलही कमी होईल.
वाचा – पुण्यातील बेस्ट हेअर सलून
योग्य हेअर मास्क (Frequent Oil Massage)
तुमच्या केसांना सूट होणारा हेअर मास्क लावा. प्रत्येक केसाच्या गरजा या त्याच्या प्रकाराप्रमाणे असतात. त्यामुळे योग्य प्रकारचा हेअर मास्क वापरणं आवश्यक आहे.
केस धुण्यासाठी वापरा थंड पाणी (Use Cold Water To Wash The Hair)
केस धुण्यासाठी गरम पाण्याऐवजी थंड किंवा कोमट पाणी वापरा. कारण उष्णतेप्रमाणेच गरम पाण्यातील उष्मा हासुद्धा आपल्या केसांसाठी वाईटच असतो.
जास्त हेअर प्रोडक्ट्सचा वापर टाळा (Avoid Using Hair Product Frequently)
कोणत्याही गोष्टीचा अतिवापर हा वाईटच असतो. त्यामुळे केसांवरही जास्त प्रमाणात प्रोडक्ट्सचा वापर करू नका. आता केसांची निगा राखण्यासाठी शँपू, कंडीशनर आणि सेरम हे आवश्यकच आहे. पण तरीही शक्य तितकं केमिकल प्रोडक्ट्सचा वापर टाळून घरगुती घटकांचा वापर केसांसाठी करा.
केसांची काळजीसाठी काही घरगुती उपाय (Home Remedies For Healthy Hair In Marathi)
चांगले आणि चमकदार केस म्हणजे चांगले हाय ब्रँडचे हेअर केअर प्रोडक्ट्स वापरणे असं नाही किंवा महागाची हेअर केअर ट्रीटमेंट घेणंही नाही. घरगुती उपायसुद्धा बळकट केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहेत आणि त्याचे काही साईड ईफेक्ट्सही नाहीत.
तेलाचा मसाज (Oil Massage)
वर मांडलेल्या मुद्द्यानुसार तेलाचा मसाज किंवा ऑईल मसाजिंग हे केसांसाठी वापरण्यात येणारा सर्वात जुना आणि पारंपारिक उपाय आहे. जो तुमच्या केसांना जास्त चमकदार आणि मऊ बनवतो. तुम्ही केसांना ऑईल मसाज करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल, कोकोनट ऑईल किंवा बदामाच्या तेलाचा वापर करू शकता. केसांना ऑईल मसाज करण्यासाठी थोडंसं कोमट तेल घ्या आणि स्कॅल्पला चांगला मसाज करा. तासभर केस तसेच ठेवा आणि नंतर धुवून टाका. जर तुम्ही ऑलिव्ह ऑईलचा वापर करणार असाल तर ते तुम्ही रात्री झोपताना लावून सकाळी धुवू शकता. हे एक बेस्ट कंडीशनर असून तुमच्या केसांची गळती रोखतं आणि केसांच्या मुळांना बळकट करतं. निरोगी केसांसाठी हा उत्तम उपाय आहे.
वाचा – हृदयाच्या आकाराच्या चेहर्याबद्दल देखील
हेअर कंडीशनिंग करा मॅयोनीजने (Hair Conditioning with Mayonnaise)
मॅयोनीज हे फक्त चवीलाच नाहीतर केसांसाठीही फारच उत्तम आहे. मॅयोनीज तुमच्या केसांच्या मुळांशी खोलवर जाऊन कंडीशनिंग करते. केस ओले करा आणि त्यावर मॅयोनीज लावा. फक्त काही मिनिटांसाठी ठेवा आणि धुवून शँपू करा.
मध (Honey)
मधाचा वापर हा फक्त चांगल्या त्वचेसाठीच नाहीतर तुमच्या केसांसाठी फारच उत्तम आहे. खराब झालेल्या आणि गळती होणाऱ्या केसांवर मध हा उत्तम घरगुती उपाय आहे. मधाचे काही थेंब तुमच्या शँपू किंवा कंडीशनरमध्ये अॅड करा आणि मग केस धुवा.
मेथीच्या बिया (Fenugreek Seeds)
मेथीच्या बिया हा केसांच्या समस्येवरील अजून एक खूपच सोपा उपाय आहे. आपल्या प्रत्येकाच्या किचनमध्ये मेथीही सहज उपलब्ध असते. दोन चमचे मेथीच्या बिया घ्या आणि रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या मिक्सरमध्ये वाटून पेस्ट बनवून घ्या आणि तुमच्या स्कॅल्पवर लावा. अर्ध्या तासाने धुवून टाका. या उपायाने तुमची केसाची गळती नक्कीच कमी होईल आणि कोंड्याची समस्याही दूर होईल.
वाचा – केसांच्या वाढीसाठी अंड्याचा हेअर मास्क
बिअर ट्रीटमेंट (Beer Treatment)
बिअरचा बऱ्याच वर्षांपासून केस चमकदार होण्यासाठी वापर केला जातो. थोड्याश्या बिअरने तुमचे केस धुतल्यास ते सुंदर आणि चमकदार दिसतात. तुम्ही बिअर केसांवर स्प्रे ही करू शकता. आजकाल तर बाजारात बिअर शँपूही सहज उपलब्ध आहे. इस्टंट चमकदार केसांसाठी तुमच्या धुतलेल्या केसांवर अगदी हलकी बिअर स्प्रे करा आणि टॉवेलने पुसा. केस लगेच चमकदार दिसतील.
आवळा (Amla)
आवळ्याचा उपयोग हा मजबूत आणि निरोगी केसांसाठी अनेक वर्षांपासून केला जात आहे. आर्युवेदातील आवळा हा प्रमुख घटकांपैकी एक आहे. लिंबाचा रस आणि आवळा पावडर मिक्स करा आणि केसांच्या मुळांना या मिश्रणाने हळूवार मसाज करा. किमान 20 मिनिटं ठेवा आणि मग धुवून शँपू करा.
अॅपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar)
घरगुती उपायांमधील हा अजून एक प्रभावी उपाय आहे. या उपायाने तुमच्या केसांचा व्हॉल्यूम नक्कीच सुधारतो. थोडंसं अॅपल सायडर व्हिनेगर घेऊन ते केसांच्या टोकांना लावल्यास केस उत्तमरित्या बाऊन्स होतात.
स्ट्रॉबेरी (Strawberries)
हे रसरशीत फळ तुमच्या केसांवर नैसर्गिक कंडीशनर म्हणून काम करते. तसंच तुमचे केस एकदम मऊ बनवते. 8 स्ट्रॉबेरीज कुस्करून घ्या आणि त्यात 1 चमचा मॅयोनीज घाला. या मिश्रणाने मसाज करा आणि काही वेळ ठेवून केस धुवून टाका. मग शँपू आणि कंडीशनर करा. लगेचच परिणाम जाणवेल.
#DIY: झटपट केस वाढवायचेत तर जाणून घ्या घरगुती उपाय
सुंदर केसांसाठी करा हेल्दी डाएट (Healthy Diet For Healthy Hair In Marathi)
चमकदार आणि सुंदर केसांसाठी तुमच्या रोजच्या आहाराचंही तेवढंच योगदान असतं. त्यामुळे तुमच्या रोजच्या डाएटमध्ये तुम्ही पोषणयुक्त आहार सामील केला पाहिजे. या आहारासाठी तुम्हाला जास्त खर्चही करावा लागणार नाही. कारण या गोष्टी तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये सहज उपलब्ध आहेत. हे तुमच्या केसांना मजबूती देऊन त्यांना सुंदर आणि चमकदार बनवू शकतात.
ब्युटी एक्सपर्टनुसार, आपण जे काही खातो त्याचा प्रभाव आपल्या केसांवर होतो. निरोगी केसांसाठी तुम्ही व्हिटॅमीन ए, सी,बी, डी, ई, आर्यन, बायोटीन, प्रोटीन आणि फॅटी एसिडसहीत अनेक पोषक तत्व केसांना न मिळाल्यास कोंडा होणं, केस गळणं, स्प्लीट एंड्स यासारख्या केसांच्या समस्या जाणवतात. त्यामुळे पुढील पदार्थांचा तुमच्या आहारात नक्की समावेश करा.
अंडी (Egg)
अंडी आपल्या केसांच्या निगेसाठी आणि वाढीसाठी फारच फायदेशीर आहेत. अंड्याच्या सेवनाने तुमच्या केसांना मजबूती मिळते. आपल्या केसांच्या आरोग्यासाठी प्रोटीनची जास्त आवश्यकता असते. जे आपल्याला अंड्यातून मिळतं. त्यामुळे अंड्याचं सेवन केसांच्या सुंदरतेसाठी आवश्यक आहे.
बेरीज (Berries)
बेरीमध्ये तुमच्या केसांना निरोगी राखण्यासाठी अनेक आवश्यक गुण आहेत. खरंतर बेरीजमध्ये अँटीऑक्सीडंट आणि व्हिटॅमीनची मात्रा जास्त असते. हे अँटीऑक्सीडंट तुमच्या केसांच्या मुळांना नुकसान पोचवणाऱ्या घटकांपासून त्यांचं रक्षण करतात. ज्यामुळे तुमचे केस सदैव निरोगी राहतात.
हिरव्या पालेभाज्या (Green Leafy Vegetables)
हिरव्या पालेभाज्यांपैकी पालकमध्ये भरपूर प्रमाणात आर्यन आणि व्हिटॅमीन असतात. जे त्वचा ग्रंथींमध्ये सीबम बनवण्यात मदत करतात. सीबम हा एक तेलकट पदार्थ आहे जो केसांना निरोगी ठेवण्यासाठी स्कॅल्पला मॉईश्चराईज करण्यात मदत करतं. त्यामुळे दिवसभरात 30 ग्रॅम पालकाचं सेवन अवश्य करावं.
नट्स (Nuts)
नट्स म्हणजेच सुकामेवा आपल्या केसांना सुंदर ठेवण्यासाठी चांगला उपाय आहे. नट्स फक्त चविष्टच नाहीतर व्हिटॅमीन्सयुक्तही आहेत. खासकरून बदाम रोज खाल्ल्यास तुमच्या केसांसाठी आवश्यक असणाऱ्या व्हिटॅमीन ई ची कमतरता पूर्ण होते. नट्स तुमच्या केसांना निरोगी ठेवण्याशिवाय शरीरावरील सूज आणि हृदयरोगाचा धोकाही कमी करण्यात सहायक ठरतं.
सिट्रस फळ (Citrus Fruits)
वाचा – केसांच्या वाढीसाठी अजून कोणते पदार्थ मदत करतात
केसांच्या आरोग्यासाठी तुमच्या आहारात समावेश करा या सिट्रस म्हणजेच आंबट फळांचा. खासकरून ज्यांना स्प्लीट एंडची समस्या असेल त्यांना आपल्या आहारात संत्र आणि पेरू यासारख्या फळांचा समावेश करावा. या फळांमधील व्हिटॅमीन सी मुळे तुमचे केस तुटत नाहीत आणि स्प्लीट एंड्सच्या समस्येपासूनही सुटका होते.
सोयाबीन (Soyabean)
केसांना आरोग्यदायी आणि लांब केस हवे असल्यास सोयाबीन खाण्याचे फायदे भरपूर आहेत. भारतीय किचनमध्ये सोयाबीनचा वापर बऱ्याच प्रकारे होतो. पण खूप कमी लोकांना माहीत असेल की, सोयाबीन केसांसाठीही किती उपयुक्त आहे. केसांसाठी सोयाबीन अगदी संजीवनी वनस्पतीप्रमाणे आहे. जर तुमचे केस तुटत, गळ आणि कोरडे दिसत असतील तर रोज सोयाबीनच्या बियांचे सेवन करा. एवढंच नाहीतर सोयाबीनमुळे तुमचे केसंही चमकदार होतात.
मग तुमच्या केसांची नीट काळजी घ्या. केस विंचरताना आम्ही सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा. आहारात वरील गोष्टींचा समावेश करा आणि घराबाहेर पडतानाही केसांची नीट निगा राखा. कारण तुमच्या केसांचं आरोग्य तुमच्याच हातात आहे.
तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:
Effective Home Remedies For Long Hair In Marathi
Home Remedies For Black Hair In Marathi
Home Remedies For Hair Growth In Marathi