ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
लग्नातील साड्यांचा पुनर्वापर करून बनवा नवे डिझाईन्स

लग्नातील साड्यांचा पुनर्वापर करून बनवा नवे डिझाईन्स

लग्न झालं. घरातील अगदी महिनाभर आधीपासून चालू असलेली लग्नसराईदेखील संपते. सर्व आपापल्या कामालादेखील लागतात. आता सर्वात महत्त्वाचं काम नवरीचं म्हणजे लग्नासाठी खरेदी केलेले सर्व कपडे आणि साड्या नव्या घरामध्ये योग्य तऱ्हेने लावणं. लग्नासाठी खूप महाग आणि भरजरी साड्या आणि लेहंगा हल्ली घेतले जातात. पण हा पसारा लग्नानंतर बघून मनात एकच प्रश्न येतो, तो म्हणजे हे सर्व ठेवायचं कुठे आणि पुन्हा हे कपडे नक्की कुठे आणि कोणत्या कार्यक्रमाला घालायचे? कारण अगदी कितीही जवळचं लग्न म्हटलं तरी आपल्या लग्नातल्या साड्या किती वेळा नेसणार. आपल्याला प्रत्येक वेळी नव्या साड्या आणि लेहंगा हवाच असतो. मग अशा वेळी प्रश्न पडतो तो, नक्की या साड्यांचं काय करायचं? काही वेळा नेसून झाल्यानंतर या साड्यांची नवी डिझाईन्स बनवून वापरण्याची कल्पना तुम्हाला कशी वाटते? आम्ही तुम्हाला आता या लेखातून तीच कल्पना प्रत्यक्षात कशी आणायची आहे ते सांगणार आहोत.

लग्नाची साडी वा लेहंग्याचा पुनर्वापर कसा करावा – How To Reuse Your Bridal Lehenga/Saree

Bridal lehnga Reuse 1

हे वाचल्यानंतर खरं तुम्हाला थोडा विश्वास बसणार नाही की, आपल्या लग्नातील साडी अथवा लेहंग्याचा पुनर्वापर होऊ शकतो. पण हो हे खरं आहे. याचा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वापर करू शकता. शिवाय काही लोकांना कपडे लक्षात ठेवायची सवय असते. त्यांनादेखील हे तुमच्या लग्नातील कपडे आहेत हे कळणार नाही. तुम्ही तुमच्या साडीला अथवा लेहंग्याला एक वेगळा लुक देऊन पुन्हा नेसू शकता अथवा घालू शकता. तुमचा खर्चही वाचेल आणि शिवाय तुम्हाला काहीतरी क्रिएटिव्ह केल्याचं समाधानही मिळेल.

ब्लॉज फॅशन डिझाइन बद्दल देखील वाचा

ADVERTISEMENT

शर्टासह लेंहगा (With Shirt)

तुमच्या लग्नातील लेहंगा हा बटन डाऊन शर्टासह घालून तर बघा. याचा लुक अतिशय कमाल दिसतो आणि शिवाय तुम्ही दुसऱ्यांच्या लग्नातही अगदी शोभून दिसाल. तुमची साडी असेल तर त्या साडीचा तुम्ही लेहंगा बनवून घेऊ शकता आणि त्यावर तुम्ही अशा तऱ्हेच्या शर्टाचा लुक देऊ शकता. हा अतिशय मॉडर्न अर्थात आधुनिक लुक असून सध्या आलिया भट्ट, जॅकलिन फर्नांडिस, दीपिका पदुकोण, करिना कपूर यासारख्या बॉलीवूड अभिनेत्रीदेखील असा लुक करत आहेत.

अशा प्रकारच्या लेहंग्यावर तुम्ही नेकपीस अजिबात घालू नका. शिवाय या लेहंग्यावर तुम्हाला स्टड्स अथवा लहान लटकनदेखील छान दिसतील. चेहऱ्यावर हलकासा मेकअप आणि तुम्ही परिधान केलेल्या साडीच्या लेहंग्यावर मॅचिंग लिपस्टिक लावली की तुमचा लुक पूर्ण होतो. तसंच यावर तुम्ही पीप टोज अथवा फ्लॅट स्ट्रॅपी सँडल्सदेखील घालू शकता. तुम्हाला तुमच्या साडीचा अथवा लेहंग्याचा लुक तसाच ठेवायचा असल्यास, तुम्ही ओढणी वेगळ्या पद्धतीने घेऊ शकता अथवा साडीदेखील वेगळ्या पद्धतीने नेसू शकता.

स्टाईलिश ब्लॉज बद्दल देखील वाचा 

बॉडीससह (With Bodice)

तुम्ही तुमच्या लग्नातील साडी अथवा लेहंगा हा बॉडीससह एक्सपरिमेंट करूनही घालू शकता. अर्थात साडीचा लेहंगा बनवून त्यावर क्रॉप टॉप अथवा शोल्डर ब्लाऊज अथवा प्लंजिंग जॅकेट असं मॅच करून तुम्ही हे वापरू शकता. तुमच्या ब्लाऊजला कोणत्याही लेहंग्यावरील ब्लाऊजप्रमाणे लुक द्या. हा ब्लाऊज अतिशय आकर्षक दिसतो. तुम्हाला हवं तर तुम्ही या साडीपासून बनवलेल्या लेहंग्यावर डिझाईनर ब्लाऊज शिऊन घ्या. अथवा यावर पेपमल ब्लाऊज, स्ट्राईप्ड क्रॉप ब्लाऊज, बॉक्सी एम्ब्रॉईड ब्लाऊजपासून ते अगदी होल्ड बॅक ब्लाऊजपर्यंत कोणत्याही स्टाईलचा ब्लाऊज घेऊन घालू शकता. या लुकबरोबर तुम्ही लहानसा छोटा क्लच घेतलात तर तुमचा लुक एकदम मस्त दिसेल. तर यावर तुमच्या केसांची स्टाईलदेखील थोडी हटके करा म्हणजे तुम्ही सर्वांमध्ये वेगळे आणि अगदी शोभून दिसाल.

ADVERTISEMENT

जॅकेटसह (With Jacket)

तुमच्या लग्नातील साडी अथवा लेहंग्याचा लुक तुम्ही फ्यूजन स्वरूपात करू शकता. याबाबत तुम्ही कधी विचार केला आहे का? तुम्ही तुमच्या लेहंग्याबरोबर हेवी ब्रोकेडवाल्या इंडो – वेस्टर्न जॅकेटसह परिधान केल्यास आणि त्यावर दुपट्टा घेतल्यास एक अप्रतिम लुक दिसेल. तर साडी तुम्ही एखाद्या इंडो वेस्टर्न ब्लाऊज वर वेगळ्या तऱ्हेने नेसल्यास आणि त्यावर जॅकेट चढवल्यासदेखील हा लुक तुम्हाला एक वेगळा अनुभव देईल. सध्या अशा फॅशनची चलती आहे. साडीवर जॅकेट खूपच सुंदर दिसतं. त्यामुळे तुमच्या लग्नातील भरजरी साडीवर तुम्ही भरजरी जॅकेट चढवलतं तर त्याची रंगत वेगळीच दिसेल. लेहंग्यावर जॅकेट घातल्यास, त्याची बटणं लाऊ नका. हे असंच ओपन राहू द्या. तुम्हाला जर यासाठी पारंपरिक जॅकेटचा वापर करायचा असेल तर तुम्ही सिल्क, बनारसी, खादी अशी जॅकेट्स घेऊ शकता. लक्षात ठेवा की, तुमचा लेहंगा आणि जॅकेट दोन्ही विरोधाभासी असावेत. साडीच्या बाबतही हीच गोष्ट लक्षात ठेवा. असं कॉम्बिनेशन केल्यास, तुम्ही लग्नात हीच साडी नेसली होती वा हाच लेहंगा घातला होता हे कोणाच्या लक्षातही येणार नाही.

with jacket

हा लुक पूर्ण करण्यासाठी तुमच्यावर शँडेलिअर इअररिंग खूपच चांगले दिसतील. तर केसांची हायबन करून घ्या अथवा या लुकवर मोकळे केसदेखील सुंदर दिसतात. याबरोबर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर पार्टी मेकअप करा. चीकबोन्स आणि ओठांवर जॅकेटशी मिळताजुळता रंग असलेली लिपस्टिक लावा.

वाचा-ओव्हरसाईज्ड टी-शर्ट इन मराठी देखील 

ADVERTISEMENT

वेगळ्या तऱ्हेने करा ड्रेप (Drape It Differently)

तुम्ही नेहमी नक्कीच अशा तऱ्हेने फॅशनेबल राहात नाही. तुम्ही तुमच्या लग्नातील साडी वेगळ्या पद्धतीने नेसूनही स्वतःला एक वेगळा लुक देऊ शकता. तुम्ही अर्धी साडी नेसून ओढणीप्रमाणे पदर काढल्यास एक वेगळाच लुक येतो. तर तुम्हाला आवडत असल्यास, गुजराती, बंगाली पद्धतीनेही तुम्ही साडी नेसून तुमचा लुक बदलू शकता. तसंच तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही आपल्या ओढणीवर एक बेल्ट अथवा ब्रोच लाऊन आपल्या साडीला अथवा लेहंग्याला वेगळा लुक देऊ शकता. तसंच यावर तुम्ही घालणार असलेले दागिने हे कॉन्ट्रास्ट घाला जेणेकरून तुम्हाला एक वेगळा लुक मिळेल.

different style

आपल्या लुकला स्पाईस अप करण्यासाठी तुम्ही डबल ओढणीचाही वापर करू शकता. केसांचा एक मोठा अंबाडा घालून त्यावर तुमच्या साडीशी मॅचिंग असणारं फूल घाला आणि तुम्हीच पाहा तुमचा लुक कसा वेगळा दिसतोय. यावर तुम्ही हलका मेकअप करा. अति मेकअप नेहमीच चेहऱ्याची शोभा घालवतो.

मिक्स अँड मॅच (Mix And Match)

तुम्ही तुमची साडी अथवा लेंहगा प्लेन ब्लाऊज अथवा ब्रायडल ब्लाऊजसह प्लेन स्कर्ट अथवा आपल्या क्रिएटिव्हिटीनुसार डिझाईन करून घालू शकता. अथवा तुम्ही ब्लाऊज, त्याखाली पँट आणि त्यावर तुमची लग्नातील साडी वेगळ्या पद्धतीने डिझाईन करूनही नेसू शकता. फक्त लक्षात ठेवा की, हे काँम्बिनेशन मिक्स अँड मॅच असायला हवे. याचा लुक पूर्ण ब्रायडल करू नका. स्कर्ट, पँट, दुपट्टा, ब्लाऊज या सगळ्याशी मॅच करून फ्लॅशी लुक येणं खूपच गरजेचं आहे. अन्यथा हा लुक थोडा विचित्र वाटण्याची शक्यता असते. हवं तर तुम्ही यावर ओढणीचा वापर नाही केला तरीही चालेल.

ADVERTISEMENT

Bridal saree Reuse FI

या प्रकारातील मिक्स अँड मॅच आऊटफिटबरोबर तुम्हाला न्यूड मेकअप खूपच चांगला दिसेल. तसंच या लुकवर तुम्हाला गडद रंगाचा ब्लाऊज शोभून दिसेल. तसंच अँटिक सिंपल ज्वेलरी खूपच शोभून दिसेल. तुम्ही याचबरोबर त्याच्याशी मिळताजुळता क्लच घेतलात तर तुमचा लुक पूर्ण होईल.

ओढणीसह इतर प्रयोग Other Uses Of Dupatta

असं अजिबात नाही की, फक्त साडी आणि लेहंग्यासह तुम्ही ओढणीवरदेखील विविध प्रयोग करू शकता. तुम्ही तुमच्या लेहंग्याच्या ओढणीने वेगवेगळे लुक करू शकता. तुम्हाला हवं तर तुमच्या सलवार सूटवरदेखील ही ओढणी वापरू शकता. तुमचा वेगळ्या रंगाचा सलवार सूट आणि वेगळ्या रंगाची ओढणी असा हल्ली नवा फॅशन लुक तुम्हाला दिसेल. तुम्हाला काहीतरी क्रिएटिव्ह करायचं असेल तर तुम्ही तुमच्या ओढणीचा श्रग, पारदर्शी जॅकेट, कुरती अथवा फ्लेअर्ड टॉपचाही लुक देऊ शकता. तुमची ओढणी शीअर असेल तर ती केपप्रमाणेदेखील तुम्ही घेऊ शकता.

Bridal lehnga Reuse 4

ADVERTISEMENT

तुम्हाला तुमची ओढणी कुरतीसह घ्यायची असेल तर त्याबरोबर तुम्ही ब्रोकेड फुटवेअर घाला. तसंच तुमच्या गालावर आणि डोळ्यांना कॉर्नरला हायलाईट मेकअप करा. हवं तर तुम्हाला तुम्ही तुमचे केस मोकळे सोडू शकता अथवा या लुकवर तुम्ही हाय पोनीटेल बांधल्यासदेखील सुंदर दिसेल.

हलक्याशा ओढणीसह लेहंगा (Lehenga With Light Dupatta)

लग्नातील ओढणी ही अतिशय भारी असते. पण तुम्हाला तुमच्या लेहंग्यासह हलकी ओढणी हवी असल्यास, तुम्ही त्याप्रमाणे त्याचा वापर करू शकता. शिवाय तुम्हाला तुमच्या भारीभरकम लग्नातली लेहंग्याचा भरजरीपणा कमी दाखवायला ही ओढणी मदत करते. तसंच तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही वेगळ्या तऱ्हेने नेटचा दुपट्टादेखील वापरू शकता. तसंच यावेळी तुम्हाला लेसची ओढणीही वापरता येईल. त्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या लग्नातील लेहंगा घातला आहे याची कोणालाही कल्पना येणार नाही.

या लुकसह तुम्ही अगदी हलका मेकअप करा आणि तुमच्या केसांचा अंबाडा घाला. तसंच अगदी कमी दागिने घाला आणि हातात एक क्लच घेतलात की, तुमचा लुक पूर्ण होईल.

ब्लाऊज प्लेन लेहंग्यासह (Blouse With Plain Lehenga)

with plain lehnga

ADVERTISEMENT

लग्नात अंगावर सर्वात जड काही असेल तर तो म्हणजे लेहंगा. हल्ली सर्व लग्नात साड्यांपेक्षाही लेहंगा घालण्याकडे कल दिसतो. पण साडी निदान पुन्हा नेसता तरी येते. लेहंगा पुढे कधी घालायचा असा प्रश्नही पडतो. अशावेळी तुम्ही तुमचा ब्रायडल लेहंगा वेगळ्या तऱ्हेने घालू शकता. तुमच्या् वॉर्डरोबमध्ये असलेला प्लेन लेहंगा घ्या आणि त्याबरोबर तुमचा ब्रायडल ब्लाऊज आणि दुपट्टा मॅच करा आणि कोणत्याही कार्यक्रमात घाला. तसंच तुम्ही केवळ प्लेन लेहंग्याबरोबर तुमच्या लग्नातील साडी नेसूनही वेगळा लुक आणू शकता.

अशा लुकबरोबर तुम्ही तुमचे केस मोकळे सोडा आणि केसांमध्ये काही वेगळे फूल माळल्यास सुंदर दिसेल. हातामध्ये काही बांगड्या अथवा कडं घाला. तसंच मेकअपदेखील हलका करा.

मल्टी पर्पज ब्लाऊज (Multi Purpose Blouse)

लग्नामध्ये नेहमीच मुली ब्रायडल साडीवर डिझाईनर ब्लाऊज घालणं पसंत करतात. तसंच त्यांच्या लेहंग्यावरदेखील भरजरी ब्लाऊज घालणं मुलींना आवडतं. अशा वेळी इतर कार्यक्रमात जाताना त्याची मदत होते. तुम्ही कोणत्याही दुसऱ्या प्लेन साडीवर असा ब्लाऊज पटकन वापरू शकता अथवा कोणत्याही प्लेन लेहंगा आणि ओढणीवरदेखील तुम्हाला असा भरजरी ब्लाऊज वापरता येतो. त्यामुळे एकाच ब्लाऊजचा वेगवेगळा उपयोग करता येतो. शिवाय ब्रायडल ब्लाऊज तुम्ही प्लाजो अथवा स्कर्टबरोबर मॅच करूनदेखील नवी स्टाईल करू शकता. हा लुक खूपच स्टायलिश दिसतो.

या लुकसह तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता. हवं तर तुम्ही यासह चोकर घाला अथवा नथदेखील घालू शकता. मेकअप करताना हलका मेकअप करा. पण काजळ जाडसर लावा आणि कोणताही तुम्हाला साजेशी मॅट लिपस्टिक लावल्यास, तुमचा लुक पूर्ण होईल.

ADVERTISEMENT

साड्यांचा पुनर्वापर कसा करू शकतो?

अनारकली (Anarkali)

anarkali

तुम्ही तुमची लग्नातील साडी बऱ्याच वर्षात नेसली नसेल अथवा तुमच्या आईचीही लग्नातील साडी असेल तर तुम्ही तुमच्या क्रिएटिव्ह कल्पनांनी त्या साडीचा अनारकली ड्रेस शिऊ शकता. आपल्या बुटिकवाल्याला सांगून एक स्टायलिश अनारकली शिऊन घ्या. तुम्ही हा अनारकली ड्रेस कोणत्याही कार्यक्रमात घालू शकता आणि भरजरी साडीपेक्षा जास्त वेळा हा ड्रेस घालू शकता. याबरोबर तुम्ही एक क्लच हातात घ्या आणि हा क्लच तुम्हाला स्टायलिश लुक देऊ शकता.

कुरती (Kurti)

kurti

तुमच्या लग्नातील साडीची तुम्ही एका सुंदर आणि वेगळ्या पॅटर्नची कुरती शिऊन घेऊ शकता. तुम्हाला जर तुमच्या लेहंग्याचादेखील दुसऱ्या तऱ्हेने वापर करायचा असेल तर तुम्ही शॉर्ट कुरती बनवून घालू शकता. ही दिसायला भरजरी आणि तितकीच सुंदर दिसते. लग्नानंतर काही वर्षांनी अर्थातच शरीरामध्ये बदल होत असतो. त्यामुळे इतकी महाग साडी टाकून देणं अथवा दुसऱ्याला देणंही थोडं मनाला पटत नाही. असं असेल तेव्हा तुम्ही तुमच्या साडीचीच कुरती बनवून स्वतःसाठी अथवा तुम्हाला मुलगी असल्यास, तिच्यासाठी फ्रॉकही शिऊन घेऊ शकता. फक्त कुरती बनवत असताना त्याच्या नेकलाईनकडे विशेष लक्ष द्या. कारण तुम्ही जर नेकलाईन तोडा डीप ठेवलात तर कुरती दिसायला खूपच सुंदर दिसते. तुम्हाला हवं तर तुम्ही या कुर्तीसह विरोधाभास रंगाची धोती पँटही घालू शकता. या कुर्तीवर स्मोकी आईज मेकअप आणि गडद रंगाची लिपस्टिक खूपच चांगली दिसेल. तसंच या लुकमुळे तुमच्या सौंदर्यातही अधिक भर पडेल.

ADVERTISEMENT

कोणतंही इतर आऊटफिट (Any Other Outfit)

croptop

केवळ कुरता आणि अनारकलीच नाही तर तुम्ही इतरही स्टायलिश लुक या साडी अथवा लेहंग्यापासून करू शकता. तुम्ही यातून क्रॉप टॉप अथवा स्कर्टदेखील बनवून घेऊ शकता. प्लाजो अथवा धोती पँट्सदेखील यामध्ये तयार करता येतील. त्यासाठी फक्त तुम्हाला काही क्रिएटिव्ह कल्पना देण्याची गरज आहे. स्ट्रेट पँट्स आणि क्रॉप टॉपचं काँम्बिनेशनदेखील खूपच चांगलं दिसेल आणि आजकाल असा ट्रेंडही आहे.

तुम्ही जो नवा लुक आपल्या साडीला दिला आहे त्याचप्रमाणे तुम्ही मेकअपही करा. पँट्ससह मोकळे केस आणि कानामध्ये इअररिंग चांगले दिसतील. तसंच यावर लाईट मेकअप खूपच चांगला दिसेल.

दुसऱ्या संकेतस्थळावर विका (Sell On Other Websites)

तुमच्या लग्नाची साडी जर तशीच धूळ खात कपाटात पडून असेल तर आणि तुम्हाला त्याचं काहीच वेगळं करायचं नसेल अशावेळी एखाद्या संकेतस्थळावर तुमची साडी अथवा लेहंगा विकणं हा उत्कृष्ट पर्याय आहे. अशा बऱ्याचशा ऑनलाईन वेबसाईट्स आहेत, ज्यावर तुम्ही तुमचे कपडे रिसेल करू शकता. अशा वेबसाईट्सची मदत घ्यावी आणि तुम्ही तुमची साडी विकावी. यातून तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे पैसेही मिळू शकतात.

ADVERTISEMENT

प्रश्न-उत्तर / FAQS

लग्नासाठी कोणत्या प्रकारची साडी अथवा लेहंग्याचं फॅब्रिक योग्य आहे?

लग्नासाठी तुम्ही पैठणी, कांजिवरम, बनारसी अथवा शालू यापैकी साड्या घेऊ शकता. तर लग्नात लेहंगा घालायचा असल्यास, तुम्हाला अमूमन नेट, रॉ सिल्क, वेलवेट फॅब्रिक हे चांगलं दिसू शकतं. तसंच तुम्ही यामध्ये जॉर्जेट अथवा टाफटा सिल्कदेखील निवडू शकता.

साधारण किती मीटर कापड वापरावं?

तुम्हाला लग्नात नऊवार साडी हवी की, पाचवारी हे तुम्हीच ठरवू शकता. सहसा महाराष्ट्रीय लग्नामध्ये नऊवारी नेसण्याची पद्धत आहे. तर लेहंगा शिऊन घ्यायचा असल्यास, तुम्हाला किती घेर हवा आहे, त्यावर अवलंबून आहे. साधारणतः तीन- चार मीटर कापड पुरसं होतं. तर ब्लाऊजसाठी साधारण एक मीटर कापड लागतं.

फोटो सौजन्य – Instagram

22 May 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT