ADVERTISEMENT
home / Vastu
यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा ‘या’ गुडलक वास्तू टीप्स (Goodluck Vastu Tips)

यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा ‘या’ गुडलक वास्तू टीप्स (Goodluck Vastu Tips)

अनेक वेळा आपण एखाद्या कामात यश मिळावं यासाठी त्यात अक्षरशः झोकून देतो. पण तरीही आपण जो विचार करतो अगदी त्याच्या उलट होतं आणि हाती लागतं ते अपयश. मग ते ऑफिसमध्ये प्रमोशन मिळणं असो वा परीक्षेत फर्स्ट क्लास मिळणं असो वा यशस्वी आयुष्य असो. कधी कधी एखादं काम होता होता राहतं. यामागे अनेक कारण असतात. जी तुमच्या गुडलकचं रूपांतर बॅडलकमध्ये करतात. जर तुम्ही रोजच्या आयुष्यातील काही गोष्टी लक्ष देऊन केल्या तर तुमचं गुड लक नेहमीच चांगल राहील. फक्त यासाठी तुम्हाला वास्तूबाबत काही गोष्टी लक्षात घ्यावा लागतील. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या अशा सोप्या वास्तू टीप्स आहेत, ज्या तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं गुडलक कायम राहील.

good-luck-vastu-tips-5

– एक गोष्टी नक्की लक्षात ठेवा की, घरात कधीही कोमेजलेली फूल ठेऊ नये, यामुळे घरात नकारात्मक एनर्जी निर्माण होते. खासकरून आपल्या देवघरातील देवाला वाहिलेली आदल्या दिवशीची फूल दुसऱ्या दिवशी नक्की काढून टाका.

– रोज जेवायच्या आधी एक घास गायीसाठी नक्की काढून ठेवा आणि त्यावर थोडी साखर आणि तूप घाला. शक्य असल्यास स्वतःच्या हाताने तो घास गाईला खाऊ घाला.

ADVERTISEMENT

good-luck-vastu-tips-3

– आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याबाहेर हत्तीच्या जोडीची मूर्ती ठेवा आणि घराबाहेर पडताना ती बघून निघा. यामुळे तुमचं गुडलक नेहमी कायम राहील आणि घराची रक्षा होईल. तसंच कोणत्याही प्रकारची नकारात्मक एनर्जी घरात प्रवेश करणार नाही.

– तुमच्या बेडरूममध्ये अशा ठिकाणी विंडचाईम लावा जिथे नेहमी हवा खेळती असेल. विंडचाईमचा मधुर आवाज जेव्हा कानावर पडतो तेव्हा मनाला एक प्रकारची मानसिक शांतता मिळते. ज्यामुळे तुमचा तणाव कमी होतो. तसंच घरातील सकारात्मक एनर्जी भरपूर राहते.  

– लक्षात ठेवा, घरात कधीही दोन वेळा केर काढू नये किंवा लादी पूसू नये. एकदाच केर-लादी केल्याने नकारात्मक एनर्जी दूर होते. पण दुसऱ्यांदा केल्याने सकारात्मक एनर्जी समाप्त होते.

ADVERTISEMENT

– जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा डोकं अशा दिशेला असावं की जेणेकरून तुम्ही जागे व्हाल तेव्हा तुम्ही उत्तर-पूर्व दिशेला असेल. कारण या दिशेला कुबेराचा वास असतो आणि असं केल्याने तुमच्या घरातील सुख-समृद्धीही वाढेल.

– जर घरातील कोणी व्यक्ती महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाणार असेल तर लक्षात ठेवा की, बाथरूममध्ये एकही बादली रिकामी ठेऊ नका. प्रत्येक बादली पाण्याने भरलेली असली पाहिजे. बाथरुममध्ये शक्यतो निळ्या रंगाच्या बादल्यांचा वापर करावा. बाथरूममध्ये निळा रंग वापरण चांगलं मानलं जातं. वास्तूशास्त्रानुसार बाथरुममध्ये नेहमी एक तरी निळ्या रंगाची बादली स्वच्छ पाण्याने भरून ठेवलेली असावी. असं केल्याने तुमचं गुडलक नेहमी चांगलं राहील आणि यशही मिळेल.

– वास्तूशास्त्रानुसार, सकाळी उठून कधीही आरसा बघू नये. जर तुम्ही असं केलंत तर तुमचा दिवस वाईट जाऊ शकतो किंवा एखादी दुःखी करणारी घटना घडू शकते. यासाठी उठल्यानंतर तुम्ही असा एखादा फोटो पहावा, ज्याने तुम्हाला सकारात्मक उर्जा मिळेल.  

good-luck-vastu-tips-1

ADVERTISEMENT

– चूकूनही बेडरूममध्ये जेवू किंवा खाऊ नये, असं केल्याने दारिद्र येतं. जेवण नेहमी किचन किंवा डायनिंग रूममध्ये बसून स्वच्छ ठिकाणी खावं.

घरातील वास्तू दोष दूर करण्यासाठी रोज पहाटे उठून सूर्योदयावेळी तांब्याच्या भांड्यातून सूर्याला पाणी अर्पण करावे.

– पूजा करताना तांब्याच्या भांडयामध्ये पाणी भरून ठेवावे आणि पूजा झाल्यावर ते पाणी संपूर्ण घरात शिंपडावे. नकारात्मक उर्जा दूर होते आणि सकारात्मक उर्जा कायम राहते.

good-luck-vastu-tips-2
– तुळशीच्या रोपाला नियमित पाणी वाहावे आणि संध्याकाळच्या वेळी धूपारती दाखवावी किंवा शक्य असल्यास दिवा लावावा. लक्ष्मीची कृपा कायम राहते.

ADVERTISEMENT

– घरात जेवताना शक्य असल्यास उत्तर दिशेकडे तोंड करून जेवावे. लक्षात ठेवा दक्षिण दिशेने कधीही जेवायला बसू नये.

– घरामध्ये तांब्याचा कलश, हत्तीची मूर्ती किंवा चित्र, मध, मोराच्या जोडीचं चित्र किंवा मूर्ती, तूप या वस्तू नेहमी असाव्यात मार्कडेंय पुराणानुसार या वस्तू लक्ष्मीला आमंत्रित करतात. 

– देवघरात आपल्या कुलदेवतेची स्थापना करुन तिची पूजा रोज झालीच पाहिजे. वास्तूशास्त्रानुसार देवघर असणं गरजेचं आहे.

(या लेखात दिलेली माहितीबद्दल आमचा दावा नाही की, माहिती पूर्णतः सत्य आणि योग्य आहे. तसंच हे केल्यास अपेक्षित परिणाम मिळेलच. या गोष्टी करण्याआधी संबंधित क्षेत्रातील विशेषज्ञाचा सल्ला नक्की घ्या.)

ADVERTISEMENT

हेही वाचा 

‘साईबाबांची ११ वचनं’ जी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चिंता दूर करतील

वास्तू टीप्स: चूकून ही तुमच्या बेडजवळ ‘ह्या’ वस्तू ठेऊ नका, होऊ शकतं नुकसान

उशांमुळे घराला आणा वेगळा ‘लुक’

ADVERTISEMENT

 

27 Feb 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT