Table of Contents
नागपूरची संत्री जगप्रसिद्ध आहेत. आंबटगोड चवीचं हे फळ सर्वांनाच आवडतं. इतर फळांच्या तुलनेत स्वस्त असल्याने अगदी सर्वसामान्यांदेखील संत्री विकत घेणं नेहमीच परवडतं. शिवाय संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅrमिन ए, कॅल्शियम, फायबर्स, मॅग्नेशियम असल्यामुळे ते शरीरासाठी फायदेशीर ठरतं. संत्र्यामध्ये कॅलरिज कमी असल्यामुळे तुमचं वजन नियंत्रित राहतं. सकाळच्या नाश्त्याला संत्र्याच्या फोडी आणि ज्यूस घेण्याप्रमाणेच अनेक पारंपरिक रेसिपीजमध्येही संत्र्याचा वापर केला जातो. संत्र्यापासून तयार केलेली खास नागपूरी संत्रा मिठाई अनेकांची फेव्हरेट असेल. एवढंच नाही तर संत्र्यांचा वापर सौंदर्य वाढवण्यासाठी देखील केला जातो. यासाठी जाणून घ्या संत्री खाण्याचे फायदे
संत्र्यामधील पोषकतत्वे (Nutrients In Orange In Marathi)
संत्री खाण्याचे फायदे जाणून घेण्याआधी एका का मध्यम आकाराच्या संत्र्यामध्ये किती पोषक तत्वं असतात हे अवश्य समजून घ्या
कॅलरिज 60
फायबर्स 3 ग्रॅम
कार्बोहायड्रेड 15 ग्रॅम
साखर 12 ग्रॅम
प्रोटीन्स 1 ग्रॅम
व्हिटॅमिन ए 14 मायक्रोग्रॅम
व्हिटॅमिन सी 70 मिग्रॅ
कॅल्शियम – 52 मिग्रॅ
पोटॅशियम – 237 मिग्रॅ
जाणून घेऊया अंजीर खाण्याचे फायदे
Benefits Of Orange In Marathi
संत्र्याचे आरोग्यावर होणारे फायदे (Health Benefits Of Orange In Marathi)
संत्री खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यासाठी जाणून घ्या संत्र्यांचा तुमच्या आरोग्यावर काय फायदा होतो.
शरीराला व्हिटॅमिन सी मिळते
संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. एक संत्रे दररोज खाण्यामुळे तुमच्या शरीराला पुरेसं व्हिटॅमिन सी मिळू शकतं. शरीरात व्हिटॅमिन सीचं प्रमाण पुरेसं असेल तर तुमचे कर्करोगापासून संरक्षण होऊ शकते. कारण त्यामुळे तुमच्या शरीराचे वातावरणातील फ्री रेडिकल्सपासून संरक्षण होते. यासाठीच संत्री खाण्याचे फायदे तुम्हाला माहीत असायलाच हवे.
रोगप्रतिकारशक्ती वाढते
व्हिटॅमिन सी तुमच्या शरीरातील महत्त्वाच्या क्रिया सुरळीत सुरू राहण्यासाठी गरजेचं आहे. कारण यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते. सर्दी, खोकला, नाक आणि कानाचे इनफेक्शन अशा समस्यांपासून दूर राहण्यासाठी आहारात व्हिटॅमिन सीचा समावेश असणं गरजेचं आहे. नियमित संत्री खाण्यामुळे तुमचे अशा आजारपणापासून संरक्षण होते.
रक्तदाब नियंत्रणात राहण्यात मदत होते
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन बी 6 भरपूर असते. ज्यामुळे तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिनच्या निर्मितीला प्रेरणा मिळते. याचा परिणाम तुमच्या रक्तदाबावर होतो. कारण त्यातील मॅग्नेशियममुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहतो.
Benefits Of Orange In Marathi
कोलेस्ट्रॉल कमी होते
एका संशोधनानुसार लिंबूवर्गीय फळांमधील पोषक घटकांमुळे कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे जर तुम्हाला कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर ते कमी करण्यासाठी तुम्ही आहारात व्हिटमिन सी युक्त संत्र्याचा वापर नक्कीच करू शकता.
जाणून घेऊ या काळी द्राक्ष खाण्याचे फायदे
मधुमेहींसाठी वरदान (A Boon For Diabetics)
मधुमेहींना रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी गोड फळं खाणं वर्ज्य असतं. मात्र मधुमेही संत्री नक्कीच खाऊ शकतात. एकतर यामधील साखरेचे प्रमाण फारच कमी आहे. शिवाय त्यातील फायबर्समुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेहींसाठी जेवण्याच्या मधल्यावेळी संत्री खाणं हा एक चांगला पर्याय आहे.
कर्करोगाचा धोका कमी होतो
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि भरपूर अॅंटिऑक्सिडंट असतात. ज्यामुळे फुफ्फुसांचा कर्करोग, त्वचेचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग अशा अनेक कर्करोगापासून तुमचे संरक्षण होऊ शकते. संत्र्यामुळे वाढणारी रोगप्रतिकार शक्ती अशा कर्करोगाच्या पेशींना शरीरात वाढू देत नाही. यासाठी नियमित आहारात संत्र्याचा वापर करण्यास सुरूवात करा. आणि इतरांनाही सांगा हे संत्री खाण्याचे फायदे
वाचा – तेलकट त्वचेसाठी घरगुती उपाय
डोळ्यांचे आरोग्य सुधारते
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन ए सुद्धा असते. जे तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. ज्यांच्या शरीरात व्हिटमिन एची कमतरता असते त्यांना अंधत्व अथवा दृष्टीदोष सहन करावे लागतात. मात्र संत्री खाणं अशा रितीनेदेखील तुमच्या फायद्याचं ठरू शकतं.
वजन नियंत्रणात राहते
वजन नियंत्रणात राहण्यासाठी कमी कॅलरिज आणि फायबरयुक्त आहाराची गरज असते. संत्र्यामध्ये फायबर्सचे प्रमाण नक्कीच जा्स्त आहे. शिवाय त्यामुळे तुमच्या शरीराला कॅलरिजदेखील कमी मिळतात. म्हणूनच वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी दररोज संत्री खाण्यास जरूर सुरूवात करा. चांगल्या परिणामासाठी ज्यूसपेक्षा संत्र्याच्या फोडी खा.
किडनी स्टोनचा धोका कमी होतो
जर शरीरामध्ये सायट्रेटची कमतरता असेल तर त्यामुळे मूतखड्याचा त्रास होऊ शकतो. मात्र संत्र्यामुळे तुमच्या शरीरातील सायट्रेटचे प्रमाण वाढते. शिवाय संत्र्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. सहाजिकच यामुळे तुमचे किडनी स्टोन अथवा मूतखड्याचा त्रासापासून संरक्षण होते.
संत्र्याचे आरोग्य फायदे – Orange In Marathi
अॅनिमियामध्ये आराम मिळतो
लोहाच्या कमतरतेमुळे तुम्हाला अॅनिमिया अथवा अशक्तपणाला सामारे जावे लागते. मात्र संत्र्यामधून तुमच्या शरीराला व्हिटॅमिन सीचा भरपूर पुरवठा होतो. ज्यामुळे तुमच्या शरीराला अन्नातून लोह शोषून घेणे सोपे जाते. लक्षात ठेवा व्हिटॅमिन सी शिवाय शरीर अन्नातील लोह शोषून घेऊ शकत नाही. यासाठी जर तुम्हाला अॅनिमिया अथवा अशक्तपणा जाणवत असेल तर दररोज एक संत्रे अवश्य खा. संत्री खाण्याचे फायदे अनेक आहेत मात्र हे त्यापैकी काही निवडक तुमच्यासोबत आम्ही शेअर करत आहोत.
पीसीओडीमधून आराम मिळू शकतो
आजकाल अनेक महिलांना पीसीओडीचा त्रास जाणवत असतो. मात्र जर प्रत्येक महिलेने आहारात संत्र्याचा समावेश केला तर त्यांना हा त्रास नक्कीच होणार नाही. कारण संत्र्यामुळे महिलांच्या शरीराला आवश्यक पोषकमुल्य मिळतात.
संत्र्याचे सौंदर्यावर होणारे फायदे (Beauty Benefits Of Orange In Marathi)
आरोग्याप्रमाणेच संत्र्याचे सौंदर्य फायदेदेखील आहेत. तुम्ही घरीच संत्री वापरून असं तुमचं सौंदर्य खुलवू शकता.
Beauty Benefits Of Orange In Marathi
त्वचेचं नुकसान टाळता येतं
संत्र्यामध्ये अॅंटिऑक्सिंडट भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे जर तुमच्या आहारात संत्र्यांचा समावेश असेल तर तुमच्या त्वचेचे फ्री रेडिकल्सपासून होणारे नुकसान कमी होते. जर तुम्हाला कायम तरूण आणि उत्साही दिसायचं असेल तर संत्री खाणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. संत्री खाण्याचे फायदे केवळ शरीरावरच नाही तर सौंदर्यावरही परिणामकारक ठरतात.
कसा कराल वापर –
दररोज सकाळी नाश्त्यामध्ये एक संत्रे अथवा संत्र्याचा ज्यूस घ्या. ज्यामुळे तुमची त्वचा नेहमीच नितळ आणि सुंदर दिसेल.
एजिंगच्या खुणा कमी होतात
आजकाल महिलांना वयाआधीच चेहऱ्यावर एजिंगच्या खुणांचा सामना करावा लागतो. वातावरणातील बदल, ताणतणाव, चुकीची जीवनशैली आणि अपथ्यकारक आहार ही त्याची मुख्य कारणे आहेत. ज्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या, डार्क सर्कल्स, त्वचा सैल पडणे, फाईन लाईन्सला सामोरं जावं लागतं. मात्र जर तुम्ही संत्र्यांच्या सालीपांसून तयार केलेला फेसमास्क तुमच्या चेहऱ्यावर लावला तर तुमचे यापासून नक्कीच संरक्षण होऊ शकते.
कसा कराल वापर –
मुलतानी मातीमध्ये संत्र्यांचा रस टाका आणि एक छान फेसपॅक तयार करा. हा फेसपॅक आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर लावा आणि एजिंगच्या खुणांपासून सुटका मिळवा.
त्वचा उजळ होते
संत्र्याचा वापर करून तुम्ही तुमची त्वचा उजळ करू शकता. यातील व्हिटॅमिन सी मुळे तुमच्या त्वचेवरील काळे डाग, जुनाट व्रण, पिंपल्सचे डाग, काळी वर्तुळं, पिगमेंटेशन कमी होते.
कसा कराल वापर –
संत्र्यााची पावडर आणि दही एकत्र करा. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करा. ज्यामुळे त्यापासून एक नैसर्गिक ब्लिचिंग तयार होईल. हे मिश्रण तुमच्या चेहरा आणि मानेवर लावा. पंधरा मिनीटांनी चेहरा थंड पाण्याने धुवून टाका.
त्वचा स्वच्छ करण्यासाठी
निसर्गाकडून सतत त्चेचेची पुर्ननिमिर्ती होत असते. ज्यामध्ये त्वचेवरील डेडस्कीन निघून जाणे आणि पुन्हा नवीन त्चचापेशी निर्माण होणे हे काम सुरू असते. त्वचा फ्रेश दिसण्यासाठी ही क्रिया व्यवस्थित होणं गरजेचं असतं. संत्र्यामुळे या क्रियेला चालना मिळू शकते.
कसा कराल वापर –
कॉटन पॅडवर संत्र्याच्या रसाचे काही थेंब घ्या. या कॉटन पॅडने चेहरा पुसून घ्या. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून टाका. दररोज झोपण्यापूर्वी अशा पद्धतीने चेहरा स्वच्छ करा ज्यामुळे तुमची त्वचा नेहमीच फ्रेश दिसेल.
स्क्रबर तयार करण्यासाठी
चेहऱ्यावर वातावरणातील धुळ, माती, प्रदूषण याचा एक पातळ थर सतत निर्माण होत असतो. म्हणूनच आठवड्यातून एकदा त्वचेला चांगल्या स्क्रबरने स्वच्छ करणं गरजेचं आहे. संत्र्यापासून तुम्ही एक चांगला नैसर्गिक स्क्रबर तयार करू शकता.
कसा कराल वापर –
संत्र्याची साल मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करा. त्यात थोडं मध आणि पिठीसाखर टाका. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा आणि हळूहळू त्वचेवरून फिरवा. ज्यामुळे तुमची त्वचा मुळापासून स्वच्छ होईल. हे स्क्रबर तुम्ही चेहरा, मान आणि हात-पायांवर वापरू शकता. दहा मिनीटांनी त्वचा स्वच्छ पाण्याने धुवून टाका.
संत्र्याच्या सुकवलेली साल – Orange In Marathi
हेअर कंडिश्नरसाठी वापर करा संत्र्याचा
केस मऊ आणि मुलायम करण्यासाठी शॅंपूनंतर केस कंडिश्नर करणं फार गरजेचं आहे. तुम्ही संत्र्यांचा वापर करून तुमचे केस मऊ आणि चमकदार करू शकता.
कसा कराल वापर –
केस शॅंपू केल्यावर एका भांड्यात पाणी घ्या त्यात एक चमचा संत्र्यांचा रस आणि थोडं मध टाका. हे मिश्रण केसांना लावा आणि पुन्हा केस पाण्याने स्वच्छ करा. तुमचे केस नैसर्गिक पद्धतीने कंडिश्नर होतील.
केसातील कोंडा कमी करण्यासाठी (Reduces Dandruff)
केसांमधील कोंडा कमी करणं ही एक मोठी समस्या आहे. तुमच्या केसांमध्ये वारंवार कोंडा होत असेल आणि तुम्ही यावर उपाय करून थकला असाल तर हा उपाय जरूर करा. कारण संत्र्याच्या सालींचा तुम्ही केसांतील कोंडा कमी करण्यासाठीदेखील वापर करू शकता.
कसा कराल वापर –
नारळाच्या तेलात संत्र्यांचा रस मिसळा आणि त्या तेलाने केसांना हळूवार मसाज करा. आठवड्यातून एकदा हा उपाय करा. ज्यामुळे तुमचे केसांमधील कोंडा आपोआप कमी होईल.
पिंपल्स कमी करण्यासाठी
तेलकट त्वचेच्या लोकांना चेहऱ्यावर येणाऱ्या पिंपल्सचा सामना सतत करावा लागतो. एखाद्याय महत्त्वाच्या दिवशी चेहऱ्यावर पिंपल्स येणे नेहमीच असतं. मात्र संत्र्याचा वापर करून तुम्ही ही समस्या कमी करू शकता.
कसा कराल वापर –
संत्र्यांच्या सालीची मिक्सरमध्ये पेस्ट तयार करा. त्यामध्ये काहीच न मिसळता हा फेसपॅक तुमच्या चेहऱ्यावर लावा. संत्र्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील तेटकटपणा कमी होईल आणि चेहऱ्यावरील पिंपल्सचा त्रास हळूहळू कमी होईल.
संत्र्याचा गर – Orange In Marathi
ब्लॅकहेड्स काढण्यासाठी
चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्समुळे तुम्हाला नेहमीच संकोचल्यासारखं वाटू शकतं. मात्र महिन्यातून एक ते दोनवेळा चेहऱ्यावर ते जमा होतातच. मग महागडी ब्युटी ट्रिटमेंट करून तुम्ही हे ब्लॅकहेड्स काढून टाकता. मात्र घरात असलेल्या संत्र्यांचा वापर करूनही तुम्हाला ही समस्या कमी करता येऊ शकते.
कसा कराल वापर –
संत्र्यांची साल आणि दही एकत्र करा आणि ब्लॅकहेड्स असलेल्या भागावर हळूवारपणे सक्युर्लर मोशनमध्ये ते मिश्रण फिरवा. पंधरा मिनीटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. ब्लॅकहेड्स काढण्याचा हा एक सोपा मार्ग आहे.
त्वचेसाठी उत्तम टोनर
त्वचेची निगा राखण्यासाठी क्लिंझिंग, टोनिंग, मॉश्चराईझिंग हे डेली स्कीन केअर रूटीन फॉलो करणं फार गरजेचं आहे. संत्र्याचा वापर करून तुम्ही तुमची त्वचा टोन करू शकता.
कसा कराल वापर –
संत्र्याची साल आणि एक कप दूध एकत्र मिक्सरला लावा. या मिश्रणाने चेहरा स्वच्छ करा. थंड पाण्याने चेहरा धुवून टाका. तुम्हाला लगेच फ्रेश आणि उत्साही वाटू लागेल.
केसांची वाढ चांगली होते
केस लांबसडक आणि मजबूत असावेत असं प्रत्येकीलाच वाटत असतं. मात्र सध्याचं प्रदूषण आणि जीवनशैली यामुळे केसांची वाढ खुंटते आणि केस निस्तेज दिसू लागतात. मात्र केसांच्या वाढीसाठीदेखील तुम्ही संत्री वापरू शकता.
कसा कराल वापर –
केस मजबूत आणि दाट हवे असतील तर दररोज एक संत्र खा. ज्यामुळे तुमच्या केसांच्या वाढीसाठी आवश्यक व्हिटॅमिन सीचा पुरवठा होईल.
संत्री कशी साठवावी – Benefits Of Orange In Marathi
संत्र्याच्या फायद्यांबाबत मनात असलेले निवडक प्रश्न – FAQ’s
1- संत्री कशी साठवून ठेवावी ?
एक आठवडाभर कोणत्याही वातावरणात संत्री सहज टिकवून ठेवता येऊ शकतात. मात्र जर तुम्हाला वर्षभर संत्री टिकवायची असतील तर त्याचा पल्प काढून फ्रीजरमध्ये साठवून ठेवावा.
2- गरोदर महिलांनी संत्री खाणे योग्य आहे का ?
होय, गरोदर महिलांसाठी संत्री नक्कीच फायदेशीर असू शकतात. कारण संत्र्यामधील पोषकतत्वांमुळे त्यांच्या बाळाची वाढ आणि विकास चांगला होऊ शकतो.
3- रिकाम्या पोटी संत्री खाणे योग्य असते का ?
रिकाम्या पोटी संत्रे खाण्यामुळे तुमच्या शरीरातील अॅसिडिटी वाढू शकते. त्यामुळे शक्य असल्यास फार काळ उपाशी असताना संत्रे न खाणेच योग्य राहील.
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
अधिक वाचा –
या घरगुती उपायांनी दूर करा गुडघे आणि कोपराचा काळेपणा
Read More From xSEO
Sankashti Chaturthi Wishes, Quotes, Status In Marathi | संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
Dipali Naphade
अष्टविनायक दर्शन संपूर्ण माहिती | Ashtavinayak Darshan Information In Marathi
Vaidehi Raje