मेकअप करायला आवडत असेल तर तुम्हाला मेकअप कधी, मेकअप कसा करायचा ( Makeup Kasa Karaycha) आणि कोणता करावा हे माहीत असायला हवे. मेकअप हा फाऊंडेशन, लिपस्टिक लावणे इतकेच नाही. यामध्ये अनेक प्रकार येतात. वेगवेगळ्या पद्धतीचे मेकअप करताना Makeup Step By Step In Marathi आज आपण जाणून घेणार आहोत. याशिवाय उत्तम मेकअप करण्यासाठी तुम्हाला मेकअपचे कोणते साहित्य लागेल हे देखील आपण पाहुया म्हणजे तुम्हाला मेकअप करणे सोपे जाईल. चला जाणून घेऊया मेकअप कधी आणि कसा करायचा ते.
Table of Contents
- रोज करायचा मेकअप – Daily Wear Makeup
- लग्नासाठीचा मेकअप करताना – Wedding Party Makeup
- बर्थडे पार्टीसाठीचा मेकअप (Birthday Party Makeup)
- ऑफिस पार्टीसाठी मेकअप (Office Party Makeup)
- मेकअप साहित्य लिस्ट – List Of Makeup Product You Needed
- फाऊंडेशन (Foundation)
- लूझ पावडर (Loose Powder)
- आयलायनर (Eyeliner)
- काजळ (kajal Pencil)
- आयशॅडो (Eye Shadow)
- मस्कारा (Mascara)
- लिपस्टिक (Lipstick)
- ब्लशर (Blusher)
- मेकअप ब्रश (Makeup Brush)
- तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ)
रोज करायचा मेकअप – Daily Wear Makeup
रोजच्या दिवसाचा मेकअप हा साधा पण तितकाच आकर्षक असायला हवा. त्यासाठी खूप काही सामानाची तुम्हाला गरज नाही. हा मेकअप कसा करायचा ते घेऊया जाणून
- सगळ्यात आधी तुमचा चेहरा स्वच्छ करुन घ्या. रोजच्या मेकअपसाठी तुम्हाला बेस असण्याची गरज नाही. एखादे चांगले मॉश्चरायझर लावले तरी देखील चालू शकते.
- मॉश्चरायझर चांगले लावले की, त्यावर तुम्ही लुझ पावडर लावा. बाजारात हल्ली टिंट मिळतात. ते तुम्हाला नैसर्गिक लाली देतात. ते गालाला, ओठाला आणि नाकाला लावा.
- जर एखादी लाईट लिपस्टिक आवडत असेल तर लावा.
- रोजच्या वापरासाठी आयलायनर वापरत असाल तर तुम्ही थोडी लाईट रंगाची शेड निवडा. ती तुम्हाला चांगली शोभून दिसेल.
वाचा – ट्राय करु शकता हा ग्लिटरी मेकअप
लग्नासाठीचा मेकअप करताना – Wedding Party Makeup
लग्नाला जाताना आपण अगदी टिपटॉप असतो. लग्नासाठी खास ट्रेडिशनल वेअर अधिक वापरले जातात. त्यामुळे अशावेळी मेकअप करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी.ट्रेडिशनल वेअरवरील मेकअप हा नेहमी ब्राईट आणि थोडा गडद असायला हवा.
- चेहऱ्यावर फाऊंडेशनचा बेस लावल्यानंतर तुम्हाला लुझ पावडर लावायची आहे. त्यावर पाण्याचा स्प्रे फवारुन तुम्हाला चेहऱ्यावरील अतिरिक्त पाणी टिपून घ्यायचे आहे. हे करण्यामागे कारण इतकेच आहे की, त्यामुळे फाऊंडेशन चेहऱ्यावर चांगले बसते.
- त्यानंतर तुम्हाला डोळ्यांच्या मेकअपकडे वळायचे आहे. तुम्ही साडी, पंजाबी ड्रेस, घागरा चोळी असा तत्सम प्रकार घातला असेल तर त्यातील जर कोणत्या रंगाची आहे हे पाहून तुम्हाला तुमचा आयशॅडोचा रंग निवडायचा आहे.
विगन अथवा क्रुअल्टी फ्री मेकअपसाठी बेस्ट ब्रॅंड
उदा. तुमचा ड्रेस पर्पल रंगाचा आहे.त्याला गोल्डन जर असेल तर तुम्ही तुमचा बेस तुमच्या कपड्यांच्या रंगानुसार आणि त्यावर गोल्डन रंग लावून तुम्ही दोन रंगामध्ये तुम्ही तुमच्या डोळ्यांना आयशॅडो लावायचा आहे.
- आयशॅडोचा रंग जर गडद असेल तर तो खूप जास्त लावू नका कारण त्यामुळे तुमच्या सगळ्या मेकअपचा लूक बदलू शकतो. त्यामुळे खूप जास्त आयशॅडो लावू नका.
- पारंपरिक कपड्यांवर आयलायनर लावताना ते थोडे जाड लावल्यास चांगले दिसते. तुम्ही इतर कोणत्याही रंगाचे आयलायनर लावण्यापेक्षा काळ्या रंगाचे लायनर लावा. डोळ्याखाली थोडे जाड काजळ लावा. त्यामुळे तुमचे डोळे अधिक उठून दिसतात. लायनर लावताना तुम्हाला अधिक काळजी घ्यायची आहे. कारण ते जराजरी फिस्कटे तरी मेकअपचा लुक बदलतो.
- त्यानंतर तुम्हाला तुमचे गाल अधिक उठावदार करण्यासाठी ब्लशर लावायचे आहे. हाच ब्लशर तुम्हाला तुमच्या नाकाच्या शेंड्यावर अगदी हलकाच लावायचा आहे.त्यामुळे तुमच्या नाकाचा शेंडा छान चमकेल.
- आता मेकअपचा शेवट तुम्हाला लिपस्टिकने करायचा आहे. अशा पेहरावावर लाल रंगाच्या शेड अधिक उठून दिसतात. लिपस्टिक अधिक चांगली लावायची असेल तर ओठांच्या कडांना एखादं चांगल्या दर्जाचं लिपलायनर लावा आणि मग ब्रशने त्यामध्ये लिपस्टिक भरा. जर तुमच्याकडे लाल रंगामध्ये दोन तीन शेड्स असतील तर तुम्ही लिपस्टिकचे रंग मिक्सही करु शकता.
फेसशेपप्रमाणे मेकअप (Makeup According to Face Shape In Marathi
बर्थडे पार्टीसाठीचा मेकअप (Birthday Party Makeup)
- बर्थडे पार्टीसाठी अनेकदा वेस्टर्न आऊटफिटची निवड केली जाते. म्हणजे एखादा गाऊन, मॅक्सी ड्रेस असे प्रकार घातले जातात. शिवाय बर्थडे पार्टी संध्याकाळीच असते.
- लग्नापेक्षा थोडा वेगळा मेकअप या वेळी करायला हवा.कारण लग्नासाठीचा मेकअप फार गडद असतो. त्यापेक्षा कमी मेकअप तुम्हाला यामध्ये करायचा आहे.
- अशा प्रकारच्या कार्यक्रमात तुमची त्वचा फ्रेश दिसणे जास्त महत्वाचे असते. त्यामुळे तुम्हाला तुमचा बेस अधिक उठावदार करायचा आहे. तुम्हाला फाऊंडेशन तुमच्या चेहऱ्यावर चांगले ब्लेंड करायचे आहे. जर तुमच्याकडे कंसिलर असेल तर ठिक नाहीतर फाऊंडेशन तुम्ही डोळ्याखाली व्यवस्थित लावले तरी चालेल. त्यावर लुझ पावडर लावायची आहे.
- डोळ्यांना आयशॅडो लावताना तुमच्या स्किनटोनवर जास्त उठून दिसणार नाही. असा रंग निवडा.
- डोळ्यांना अगदी पातळ लायनर आणि काजळ लावा. हो मस्कारा मात्र अगदी व्यवस्थित लावा. कारण तुम्ही जास्त मेकअप करणार नाही आहात. त्यामुळे डोळे खुलवण्याचे काम केवळ मस्कारा करु शकतो.
- हायलायटर ही फार गुलाबी नको त्यापेक्षा गाल शाईन करु शकेल अशी शेड निवडा.
- तुमच्या ड्रेसनुसार तुम्ही लिपस्टिक निवडा. म्हणजे अशा पार्टीजना तुम्ही गुलाबी रंगाचे शेड्स चांगले दिसतात.
वाचा – तसेच अंधुक त्वचेसाठी मेकअप टिप्स
ऑफिस पार्टीसाठी मेकअप (Office Party Makeup)
ऑफिसपार्टीसाठी कोणतीही थीम असली तरी तुम्हाला इतर दिवसांप्रमाणे मेकअप करता येत नाही.ऑफिससाठीचा मेकअप हा नेहमी डिसेंट असावा.फाऊंडेशनचा बेस आणि लूझ पावडर लावल्यानंतर गाल हायलाईट करण्यासाठी तुम्ही छान लाईट रंगाचे ब्लशर वापरा
- ऑफिसपार्टीसाठी कोणतीही थीम असली तरी तुम्हाला इतर दिवसांप्रमाणे मेकअप करता येत नाही. ऑफिससाठीचा मेकअप हा नेहमी डिसेंट असावा.
- फाऊंडेशनचा बेस आणि लूझ पावडर लावल्यानंतर गाल हायलाईट करण्यासाठी तुम्ही छान लाईट रंगाचे ब्लशर वापरा
- काजळ, लायनर आणि आयशॅडो यांचे संतुलन साधा.
- लिपस्टिकचा रंग निवडताना न्यूड शेड निवडल्यास उत्तम
मेकअपचे साहित्य एक्सपायर्ड झाले आहे हे कसे ओळखाल?
इनडोअर आणि आऊटडोअर मेकअप (Indoor and Outdoor Makeup)
इनडोअर आणि आऊटडोअर मेकअपमध्ये तुम्हाला काळजी घेण्याचे कारण इतकेच असते की, इनडोअर मेकअपमध्ये तुम्ही केलेला मेकअप अधिक उठावदार दिसण्यासाठी वेगवेगळ्या लाईट्स असतात. तर आऊडडोअरमध्ये कशाप्रकारची लाईट अरेंजमेंट असेल हे माहीत नसते. त्यामुळे आऊटडोअरचा मेकअप हा थोडा बँलन्स ठेवावा लागतो. तरच तुमचा मेकअप आणि लुक अधिक उठावदार दिसू शकतो.
या व्यतिरिक्त तुम्हाला तुमचे आयब्रोज फिल करायलाही विसरायचे नाही. कारण हल्ली तो एक ट्रेंड आला आहे. जितके जाड आणि भरलेले आयब्रोज असतील तितकेच ते अधिक उठून दिसतील
वाचा – कोणत्याही हिटशिवाय केसाना कर्ल
मेकअप साहित्य लिस्ट – List Of Makeup Product You Needed
चांगला मेकअप करण्यासाठी तुम्हाला चांगले मेकअपचे साहित्य असणे देखील गरजेचे आहे. मेकअप करताना तुम्हाला काय गरजेचे आहे ते घेऊया जाणून
फाऊंडेशन (Foundation)
मेकअपच्या बेसमधील सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो म्हणजे फाऊंडेशन. जर तुमच्याकडे फाऊंडेशन असेल तर उत्तम आणि जर तुमच्याकडे फाऊंडेशन नसेल तर तुम्ही चांगल्या दर्जाचे लिक्विड फाऊंडेशन घ्या. कारण ते लावणे सोपे असते.
लूझ पावडर (Loose Powder)
फाऊंडेशन लावून झाल्यानंतर तुमचे फाऊंडेशन टिकून राहावे यासाठी लूझ पावडर लावली जाते. लूझ पावडर म्हणजे टाल्कम पावडर नाही. तुमच्या त्वचेच्या रंगाप्रमाणे तुम्हाला लूझ पावडर मिळतात. अशाच लूझ पावडरचा वापर तुम्हाला मेकअपमध्ये करायचा असतो
आयलायनर (Eyeliner)
मेकअपमधील आयलायनर ही अशी गोष्ट आहे जी तुमच्या मेकअपला खऱ्या अर्थाने न्याय देते. कारण डोळ्यांना आयलायनर लावल्यानंतर तुमचा मेकअप खुलून दिसतो.तुमचे डोळे लहान असो किंवा मोठे असोत आयलायनरच्या वेगवेगळ्या प्रकारांनी ते उठून दिसतात
काजळ (kajal Pencil)
डोळ्यांच्या मेकअपमध्ये आणखी एक महत्वाची आणि बेसिक गोष्ट आहे ती म्हणजे काजळ. अनेकांना काजळ लावण्याची सवय असतेच. त्यामुळे तुमच्याकडे काजळ असेल असे आम्ही गृहीत धरतो.
आयशॅडो (Eye Shadow)
डोळ्यांच्या मेकअपमधील आयशॅडोचे कामही फार महत्वाचे आहे. डोळ्यांच्यावर आयशॅडो लावण्यात येतात. तुमच्या आयलायनरला चांगला न्याय देण्याचे काम आयशॅडो करतात.
मस्कारा (Mascara)
तुमच्या पापण्यांना अधिक गडद करण्याचे काम मस्कारा करत असते. तुमच्या पापण्या कितीही पातळ आणि लहान असल्या तरी देखील त्यांना उठावदारपणा आणून तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य अधिक खुलवण्याचे काम मस्कारा करत असते.
लिपस्टिक (Lipstick)
आता लिपस्टिकबद्दल काही सांगायलाच नको. मुलींच्या मेकअप बॉक्समध्ये किमान दोन ते तीन शेड्सच्या लिपस्टिक असतात. यात लाल, गुलाबी, चॉकलेटी असे काही शेड्स हमखास असतात.
ब्लशर (Blusher)
तुमच्या गालांना लाली देऊन त्यांना चमकवण्याचे काम ब्लशर करत असते. हे जर तुमच्याकडे नसेल तर एखादे ब्लशर घ्यायला काहीच हरकत नाही.यातही तुम्हाला गुलाबी, गोल्डन असे काही शेड्स मिळतात. किंवा एकाचवेळी तुम्हाला ब्लशरचे पॅलेट मिळते.
मेकअप ब्रश (Makeup Brush)
मेकअपच्या इतर साहित्याव्यतिरिक्त मेकअप लावण्यासाठी तुमच्याकडे मेकअपचे काही ब्रश देखील असणे गरजेचे असते. अगदी महागडे प्रोफेशनल मेकअप नाही. पण तुमच्याकडे अगदी बेसिक ब्रश असायला हवे. यामध्ये फाऊंडेशन ब्रश, हायलाईटर ब्रश, लिपस्टिक ब्रश तर हवाच.
तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ)
प्रश्न : मेकअपचे साहित्य जास्त काळ चांगले राहण्यासाठी काय करावे?
उत्तर: मेकअपवर त्याची एक्सपायरी लिहिलेली असते. ते किती काळासाठी वापरायला हवे ते त्यामुळेच कळते. मेकअपचे साहित्य साधारण दोन वर्षांसाठी चांगले राहावे असे वाटत असेल तर ते तुम्ही अगदी व्यवस्थित ठेवा. प्रकाश आणि खूप थंडाव्यात ठेवू नका. कारण त्यामुळेही प्रॉडक्ट गोठण्याची शक्यता असते.
प्रश्न : फाऊंडेशनचा बेस चांगला राहण्यासाठी काय करावे?
उत्तर : फांऊडेशनचा बेस चांगला लागावा असे वाटत असेल तर तुम्ही चेहऱ्याला प्राईमर लावा. त्यामुळे फाऊंडेशनचा बेस खूप चांगला राहतो. फाऊंडेशन लावण्याआधी तुम्ही प्रायमर लावायला अजिबात विसरु नका.
प्रश्न: फाऊंडेशन लावणे गरजेचे आहे?
उत्तर : अनेकांना फाऊंडेशन लावायला आवडत नाही हे खरे असले तरी तुम्हाला मेकअपमध्ये फाऊंडेशन लावणे हे मस्ट आहे. ते लावल्यानंतरच तुमचा चेहऱा एक सारखा दिसतो. फाऊंडेशनची निवड करताना तुम्हाला त्रास होत असेल तर एक्सपर्टचा सल्ला घ्या आणि योग्य फाऊंडेशनची निवड करा.
प्रश्न: मेकअप ब्रश नसेल अशावेळी काय करावे?
उत्तर: तुम्ही सतत मेकअप करणारे नसाल तर तुमच्याकडे मेकअप ब्रश असेलच असे नाही. पण मेकअप ब्रशला अन्य कोणताही पर्याय असू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला फाऊंडेशन, ब्लशर यांचे ब्रश विकत घ्यावेच लागेल.
प्रश्न: मेकअपमधील नव्या वस्तू खरेदी करताना साधारण किती खर्च येऊ शकतो?
उत्तर : जर तुमच्याकडे मेकअपचे काहीच सामान नसेल आणि तुम्हाला नवीन साहित्य विकत घ्यायची इच्छा असेल तर तुम्हाला चांगल्या ब्रँडचे साहित्य घ्यायला साधारण 1500 ते 2000 रुपये इतका खर्च येईल.
प्रश्न : आयलायनरचे वेगवेगळे प्रकार ट्राय करण्याची इच्छा आहे?
उत्तर : आयलायनरचे वेगवेगळे प्रकार ट्राय करायला काहीच हरकत नाही. पण जर तुम्हाला बेसिक आयलायनर येत नसेल तर थोडे थांबा. आम्ही तुम्हाला लायनर सोप्या पदधतीने कसे लावता येईल ते देखील शिकवू.
आता घरच्या घरी तुम्हाला अगदी प्रोफेशन मेकअप लुक हवा असेल तर step by step makeup in marathi तुम्हाला चांगला लुक देण्यासाठी नक्कीच मदत करतील.
You Might Like These:
चेहऱ्यावर असतील वांग (Makeup For A Face With Freckles In Marathi)
Winter Makeup Tips Accorind To Skin Type In Marathi
प्राईमर वापरण्याचे फायदे आणि प्राईमर लावण्याची योग्य पद्धत कोणती
Read More From Make Up Products
आमच्या 8व्या वाढदिवसानिमित्त एपिक सेलमध्ये लुटा शॉपिंगची मजा, घ्या ही 8 सौंदर्य उत्पादने
Vaidehi Raje
Best Cruelty Free Makeup Brands In Marathi | बेस्ट विगन आणि क्रुअल्टी फ्री मेकअप ब्रॅंड
Trupti Paradkar
दिवाळी पार्टीसाठी व्हा तयार, वापरा हे मेकअप पॅलेट
Trupti Paradkar