Make Up Products

घरच्या घरी मेकअप कसा करायचा | Makeup Kasa Karaycha

Leenal Gawade  |  Apr 8, 2019
घरच्या घऱी मेकअप

मेकअप करायला आवडत असेल तर तुम्हाला मेकअप कधी,  मेकअप कसा करायचा ( Makeup Kasa Karaycha) आणि कोणता करावा हे माहीत असायला हवे.  मेकअप हा फाऊंडेशन, लिपस्टिक लावणे इतकेच नाही. यामध्ये अनेक प्रकार येतात. वेगवेगळ्या पद्धतीचे मेकअप करताना Makeup Step By Step In Marathi आज आपण जाणून घेणार आहोत. याशिवाय उत्तम मेकअप करण्यासाठी तुम्हाला मेकअपचे कोणते साहित्य लागेल हे देखील आपण पाहुया म्हणजे तुम्हाला मेकअप करणे सोपे जाईल. चला जाणून घेऊया मेकअप कधी आणि कसा करायचा ते. 

रोज करायचा मेकअप – Daily Wear Makeup

Daily Wear Makeup

रोजच्या दिवसाचा मेकअप हा साधा पण तितकाच आकर्षक असायला हवा. त्यासाठी खूप काही सामानाची तुम्हाला गरज नाही. हा मेकअप कसा करायचा ते घेऊया जाणून

वाचा – ट्राय करु शकता हा ग्लिटरी मेकअप

लग्नासाठीचा मेकअप करताना – Wedding Party Makeup

लग्नाला जाताना आपण अगदी टिपटॉप असतो. लग्नासाठी खास ट्रेडिशनल वेअर अधिक वापरले जातात. त्यामुळे अशावेळी मेकअप करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी.ट्रेडिशनल वेअरवरील मेकअप हा नेहमी ब्राईट आणि थोडा गडद असायला हवा.

विगन अथवा क्रुअल्टी फ्री मेकअपसाठी बेस्ट ब्रॅंड

उदा. तुमचा ड्रेस पर्पल रंगाचा आहे.त्याला गोल्डन जर असेल तर तुम्ही तुमचा बेस तुमच्या कपड्यांच्या रंगानुसार आणि त्यावर गोल्डन रंग लावून तुम्ही दोन रंगामध्ये तुम्ही तुमच्या डोळ्यांना आयशॅडो लावायचा आहे.

फेसशेपप्रमाणे मेकअप (Makeup According to Face Shape In Marathi

बर्थडे पार्टीसाठीचा मेकअप (Birthday Party Makeup)

वाचा – तसेच अंधुक त्वचेसाठी मेकअप टिप्स

ऑफिस पार्टीसाठी मेकअप (Office Party Makeup)

ऑफिसपार्टीसाठी कोणतीही थीम असली तरी तुम्हाला इतर दिवसांप्रमाणे मेकअप करता येत नाही.ऑफिससाठीचा मेकअप हा नेहमी डिसेंट असावा.फाऊंडेशनचा बेस आणि लूझ पावडर लावल्यानंतर गाल हायलाईट करण्यासाठी तुम्ही छान लाईट रंगाचे ब्लशर वापरा

मेकअपचे साहित्य एक्सपायर्ड झाले आहे हे कसे ओळखाल?

इनडोअर आणि आऊटडोअर मेकअप (Indoor and Outdoor Makeup)

इनडोअर आणि आऊटडोअर मेकअपमध्ये तुम्हाला काळजी घेण्याचे कारण इतकेच असते की, इनडोअर मेकअपमध्ये तुम्ही केलेला मेकअप अधिक उठावदार दिसण्यासाठी वेगवेगळ्या लाईट्स असतात. तर आऊडडोअरमध्ये कशाप्रकारची लाईट अरेंजमेंट असेल हे माहीत नसते. त्यामुळे आऊटडोअरचा मेकअप हा थोडा बँलन्स ठेवावा लागतो. तरच तुमचा मेकअप आणि लुक अधिक उठावदार दिसू शकतो. 

या व्यतिरिक्त तुम्हाला तुमचे आयब्रोज फिल करायलाही विसरायचे नाही. कारण हल्ली तो एक ट्रेंड आला आहे. जितके जाड आणि भरलेले आयब्रोज असतील तितकेच ते अधिक उठून दिसतील

वाचा – कोणत्याही हिटशिवाय केसाना कर्ल

मेकअप साहित्य लिस्ट – List Of Makeup Product You Needed

चांगला मेकअप करण्यासाठी तुम्हाला चांगले मेकअपचे साहित्य असणे देखील गरजेचे आहे. मेकअप करताना तुम्हाला काय गरजेचे आहे ते घेऊया जाणून

फाऊंडेशन (Foundation)

मेकअपच्या बेसमधील सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो म्हणजे फाऊंडेशन. जर तुमच्याकडे फाऊंडेशन असेल तर उत्तम आणि जर तुमच्याकडे फाऊंडेशन नसेल तर तुम्ही चांगल्या दर्जाचे लिक्विड फाऊंडेशन घ्या. कारण ते लावणे सोपे असते.

लूझ पावडर (Loose Powder)

फाऊंडेशन लावून झाल्यानंतर तुमचे फाऊंडेशन टिकून राहावे यासाठी लूझ पावडर लावली जाते. लूझ पावडर म्हणजे टाल्कम पावडर नाही. तुमच्या त्वचेच्या रंगाप्रमाणे तुम्हाला लूझ पावडर मिळतात. अशाच लूझ पावडरचा वापर तुम्हाला मेकअपमध्ये करायचा असतो

आयलायनर (Eyeliner)

मेकअपमधील आयलायनर ही अशी गोष्ट आहे जी तुमच्या मेकअपला खऱ्या अर्थाने न्याय देते. कारण डोळ्यांना आयलायनर लावल्यानंतर तुमचा मेकअप खुलून दिसतो.तुमचे डोळे लहान असो किंवा मोठे असोत आयलायनरच्या वेगवेगळ्या प्रकारांनी ते उठून दिसतात

काजळ (kajal Pencil)

डोळ्यांच्या मेकअपमध्ये आणखी एक महत्वाची आणि बेसिक गोष्ट आहे ती म्हणजे काजळ. अनेकांना काजळ लावण्याची सवय असतेच. त्यामुळे तुमच्याकडे काजळ असेल असे आम्ही गृहीत धरतो.

आयशॅडो (Eye Shadow)

डोळ्यांच्या मेकअपमधील आयशॅडोचे कामही फार महत्वाचे आहे. डोळ्यांच्यावर आयशॅडो लावण्यात येतात. तुमच्या आयलायनरला चांगला न्याय देण्याचे काम आयशॅडो करतात. 

मस्कारा (Mascara)

तुमच्या पापण्यांना अधिक गडद करण्याचे काम मस्कारा करत असते. तुमच्या पापण्या कितीही पातळ आणि लहान असल्या तरी देखील त्यांना उठावदारपणा आणून तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य अधिक खुलवण्याचे काम मस्कारा करत असते.

लिपस्टिक (Lipstick)

आता लिपस्टिकबद्दल काही सांगायलाच नको. मुलींच्या मेकअप बॉक्समध्ये  किमान दोन ते तीन शेड्सच्या लिपस्टिक असतात. यात लाल, गुलाबी, चॉकलेटी असे काही शेड्स हमखास असतात.

ब्लशर (Blusher)

तुमच्या गालांना लाली देऊन त्यांना चमकवण्याचे काम ब्लशर करत असते. हे जर तुमच्याकडे नसेल तर एखादे ब्लशर घ्यायला काहीच हरकत नाही.यातही तुम्हाला गुलाबी, गोल्डन असे काही शेड्स मिळतात. किंवा एकाचवेळी तुम्हाला ब्लशरचे पॅलेट मिळते.

मेकअप ब्रश (Makeup Brush)

मेकअपच्या इतर साहित्याव्यतिरिक्त मेकअप लावण्यासाठी तुमच्याकडे मेकअपचे काही ब्रश देखील असणे गरजेचे असते. अगदी महागडे प्रोफेशनल मेकअप नाही. पण तुमच्याकडे अगदी बेसिक ब्रश असायला हवे. यामध्ये फाऊंडेशन ब्रश, हायलाईटर ब्रश, लिपस्टिक ब्रश तर हवाच.

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ)

प्रश्न : मेकअपचे साहित्य जास्त काळ चांगले राहण्यासाठी काय करावे?
उत्तर: मेकअपवर त्याची एक्सपायरी लिहिलेली असते. ते किती काळासाठी वापरायला हवे ते त्यामुळेच कळते. मेकअपचे साहित्य साधारण दोन वर्षांसाठी चांगले राहावे असे वाटत असेल तर ते तुम्ही अगदी व्यवस्थित ठेवा. प्रकाश आणि खूप थंडाव्यात ठेवू नका. कारण त्यामुळेही प्रॉडक्ट गोठण्याची शक्यता असते.

प्रश्न : फाऊंडेशनचा बेस चांगला राहण्यासाठी काय करावे?
उत्तर : फांऊडेशनचा बेस चांगला लागावा असे वाटत असेल तर तुम्ही चेहऱ्याला प्राईमर लावा. त्यामुळे फाऊंडेशनचा बेस खूप चांगला राहतो. फाऊंडेशन लावण्याआधी तुम्ही प्रायमर लावायला अजिबात विसरु नका.

 प्रश्न: फाऊंडेशन लावणे गरजेचे आहे? 
उत्तर : अनेकांना फाऊंडेशन लावायला आवडत नाही हे खरे असले तरी तुम्हाला मेकअपमध्ये फाऊंडेशन लावणे हे मस्ट आहे. ते लावल्यानंतरच तुमचा चेहऱा एक सारखा दिसतो. फाऊंडेशनची निवड करताना तुम्हाला त्रास होत असेल तर एक्सपर्टचा सल्ला घ्या आणि योग्य फाऊंडेशनची निवड करा. 

प्रश्न: मेकअप ब्रश नसेल अशावेळी काय करावे? 
उत्तर: तुम्ही सतत मेकअप करणारे नसाल तर तुमच्याकडे मेकअप ब्रश असेलच असे नाही. पण मेकअप ब्रशला अन्य कोणताही पर्याय असू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला फाऊंडेशन, ब्लशर यांचे ब्रश विकत घ्यावेच लागेल.

प्रश्न: मेकअपमधील नव्या वस्तू खरेदी करताना साधारण किती खर्च येऊ शकतो?
उत्तर : जर तुमच्याकडे मेकअपचे काहीच सामान नसेल  आणि तुम्हाला नवीन साहित्य विकत घ्यायची इच्छा असेल तर तुम्हाला चांगल्या ब्रँडचे साहित्य घ्यायला साधारण 1500 ते 2000 रुपये इतका खर्च येईल.

प्रश्न : आयलायनरचे वेगवेगळे प्रकार ट्राय करण्याची इच्छा आहे? 
उत्तर : आयलायनरचे  वेगवेगळे प्रकार ट्राय करायला काहीच हरकत नाही. पण जर तुम्हाला बेसिक आयलायनर येत नसेल तर थोडे थांबा. आम्ही तुम्हाला लायनर सोप्या पदधतीने कसे लावता येईल ते देखील शिकवू.

आता घरच्या घरी तुम्हाला अगदी प्रोफेशन मेकअप लुक हवा असेल तर step by step makeup in marathi तुम्हाला चांगला लुक देण्यासाठी नक्कीच मदत करतील.

You Might Like These:

सुलभ मेकअप टिप्स

उत्कृष्ट वॉटरप्रूफ आयलायनर

नो मेकअप लुकसाठी टिप्स

चेहऱ्यावर असतील वांग (Makeup For A Face With Freckles In Marathi)

Winter Makeup Tips Accorind To Skin Type In Marathi

प्राईमर वापरण्याचे फायदे आणि प्राईमर लावण्याची योग्य पद्धत कोणती

Lipstick Shades For Indian Skin Tone In Marathi

भारंभार मेकअप कशाला ‘न्यूड’ मेकअपनेही दिसाल सुंदर

Read More From Make Up Products