बॉलीवूड सेलिब्रेटीज एखाद्या कार्यक्रमात अथवा पार्टीत जे कपडे घालतात त्यांची फॅशन लोकप्रिय होत असते. सध्या बॉलीवूड सेलिब्रेटीजने घातलेल्या सीक्वेन साड्यांचा ट्रेंड आहे. मोठा कार्यक्रम असो, लग्न असो वा एखादी पार्टी तुम्ही सीक्वेन साडीने स्वतःचा हटके लुक नक्कीच करू शकता. गेल्या काही वर्षांपासून या साड्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. शिवाय त्यामुळे तुमचा लुक ग्लॅमसर आणि स्टायलिश दिसतो. यासाठीच पाहूया या बॉलीवूड अभिनेत्रींचे अशा साड्यांमधील काही हटके लुक्स
जान्हवी कपूर –
श्रीदेवी आणि बोनी कपूरची मुलगी जान्हवी कपर सध्या बॉलीवूडमध्ये तिचं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करत आहे. जान्हवी बऱ्याचदा सीक्वेन्स साड्या परिधान करताना दिसते. व्हायब्रंट रंग आणि चमकदार असल्यामुळे अशा साड्यांमधून तुम्हाला सहज एक ग्लॅमरस लुक मिळू शकतो. त्यामुळे क्लासी आणि फ्रेश लुकसाठी तुम्ही जान्हवी कपूरचे हे लुक ट्राय करू शकता.
करिना कपूर –
बॉलीवूड स्टार्समध्ये सीक्वेन साडीची क्रेझ आहे. पण या साडीची फॅशन करिनामुळे लोकप्रिय झाली होती. तिने एका कार्यक्रमात सीक्वेन साडी नेसली आणि तिचा तो हॉट आणि ग्लॅम लुक पाहून नंतर अनेकांना या साडीची भुरळ पडली. करिनानचा साडी पिन अप करण्याचा अंदाज आणि ब्लाऊज यामुळे साडीत तिचं सौंदर्य नेहमीच खुलून दिसतं. तुम्हीही करिनाप्रमाणे या साडीचा लुक एखाद्या पार्टीत नक्कीच करू शकता.
क्रिती सेनॉन –
क्रिती सेनॉनच्या सौंदर्य आणि अभिनयाचे जसे अनेक चाहते आहेत तसेच तिच्या फॅशन ट्रेंडला फॉलो करणारेही अनेक आहेत. क्रितीने नेसलेली ही व्हाईट आणि सोनेरी रंगाची सीक्वेन साडी तुम्ही एखाद्या लग्नात सिंपल आणि सोबर लुक करण्यासाठी नक्कीच नेसू शकता. वेडिंग रिसेप्शनसाठी हा नक्कीच एक छान पर्याय ठरेल.
तारा सुतारिया –
जान्हवीच्या लव्हेंडर आणि करिनाच्या पिच प्रमाणेच तारा सुतारियाचा हा पेस्टल रंगाच्या साडीतील लुकही खूपच फेमस झाला होता. बॉलीवूड सेलिब्रेटीजच्या स्टाईलला नेहमीच फॅशन ट्रेंड मानलं जातं. त्यामुळे एखाद्या कार्यक्रमातील त्यांचा असा खास लुक सर्व सामान्यांमध्ये फॅशन म्हणून लगेच प्रचलित होतो. तारानेही एका पार्टीत हा सीक्वेन साडी लुक केला होता आणि नंतर तो अनेकींनी फॉलो केला होता.
करिष्मा कपूर –
काळा रंग तुमचा आवडता रंग असेल तर करिष्मा कपूर प्रमाणे तुम्ही या सीक्वेन साडीचा लुक कॅरी करू शकता. काळा रंग रात्रीच्या पार्टीजमध्ये शोभून दिसतो. शिवाय सीक्वेन्समुळे या साडीला एक छान ग्लॅमसर लुकही मिळतो. मात्र साडीवर स्टायलिश ब्लाऊज कॅरी करा आणि मेकअप अगदी सिंपल ठेवा. ज्यामुळे तुमच्या साडीवर लोकांचं जास्त लक्ष केंद्रित होईल.
सीक्वेन साडीची खासियत ही आहे की या साड्या अतिशय हलक्या आणि ग्लॅमरस असतात. त्यामुळे किशोरवयीन मुलीही या साड्यांनाच जास्त पसंती देतात. आरामदायक असल्यामुळे त्या नेसल्यावर वावरणं अगदी सहज आणि सोपं होतं. शिवाय फ्युजन लुक करून तुम्ही यात थोडं स्टायलिश आणि हटके दिसू शकता. म्हणजेच पार्टी असो वा लग्न तुम्ही एकाच साडीत तुमचे दोन लुक यामधून नक्कीच करू शकता. या साड्या चमकदार असल्यामुळे रात्रीच्या कार्यक्रमात त्या जास्त उठून दिसतात. शिवाय या साड्या खूपच नाजूक असल्यामुळे त्यात तुम्ही सडपातळ आणि सुडौल दिसू शकता.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
साडीसाठी पेटीकोट निवडताना नक्की लक्षात ठेवा या गोष्टी