प्राजक्ता माळीच्या साडीतील अदा करतील घायाळ!

प्राजक्ता माळीच्या साडीतील अदा करतील घायाळ!

प्राजक्ता माळी हे नाव मराठी घराघरामध्ये पोहचलेलं आहे. सध्या चालू असलेल्या ‘महाराष्ट्राच्या हास्य जत्रा’ या शो च्या सूत्रसंचालनाची जबाबदारीही प्राजक्ताने लिलया पेलली आहे. पण त्यातही लक्ष वेधून घेते ती तिची स्टाईल.  कोणतीही स्टाईल आणि फॅशन प्राजक्ता खूपच छान कॅरी करते.  पण त्यातही साडी असेल तर प्राजक्ताकडे  बघितल्यावर आपोआपच तोंडातून ‘उफ’ असा शब्द बाहेर पडतो. मराठमोळ्या साजाची सर्वांनाच भुरळ असते आणि प्राजक्ताने असे अनेक फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. प्राजक्ता माळीच्या या साडीतील अदा नक्कीच सर्वांना घायाळ करतात. तुम्हालादेखील साडी नेसण्याचे आणि साडीमध्ये स्टाईल करण्याचे वेड असेल तर तुम्हाला प्राजक्ताची स्टाईल फॉलो करायला काहीच हरकत नाही. 

स्टायलिश लुक

प्राजक्ता नेहमीच वेगवेगळ्या स्टाईल करत असते. नुकत्याच केलेल्या फोटोशूटमध्ये प्राजक्ताच्या या सुंदर अदा कॅप्चर केल्या आहेत फोटोग्राफर विनय राऊळ याने. प्राजक्ताचा हा एलिगंट आणि स्टायलिश लुक कोणत्याही हवाहवासा वाटेल. ऑक्सिडाईज्ड दागिन्यांसह या साडीतील फ्युजन लुक खूप आकर्षक आहे आणि प्राजक्ताच्या फोटोवरून नजर हटत नाही इतका सुंदर हा लुक दिसतो आहे. अशा परफेक्ट लुकसाठी तुम्हालाही ही स्टाईल नक्कीच करता येईल. असा मेकअप तुम्हाला हवा असेल तर MyGlamm चे आयशॅडो पॅलेट आणि Pose लिपस्टिकचा वापर करूनही तुम्हाला हा लुक मिळवता येईल. 

Beauty

Manish Malhotra 4 in 1 Eyeshadow Palette - Paparazzi

INR 1,250 AT MyGlamm

Beauty

POSE HD Lipstick - Muted Brown

INR 599 AT MyGlamm

कॉटन साडी आणि इक्कत ब्लाऊजचा मेळ

सध्या कॉटन साडी आणि इक्कत ब्लाऊजचा ट्रेंड आला आहे. पिवळी साडी आणि काळ्या इक्कतच्या ब्लाऊजमध्ये प्राजक्तांचं सौंदर्य खुलून आलं आहे. यावर अगदी भारंभार दागिने न घालता केवळ स्टाईल म्हणून काही मोजके ऑक्सिडाईज्ड दागिने घातले की तुमचा लुक पूर्ण होऊ शकतो.  मुळात अशा साड्या आणि ब्लाऊज हे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वापरासाठी उत्तम पर्याय आहेत. शिवाय या साड्यांनी एक वेगळाच लुक मिळतो. रॉयल लुक आणि अतिशय कम्फर्टेबल वाटायला हवं असेल तर तुम्ही प्राजक्ताची ही स्टाईल नक्की फॉलो करू शकता. 

मराठीबाणा आणि रूबाब

नऊवारी साडी ही तर मराठ्यांची शान आहे. मराठी मुलीने नऊवारी साडी नेसली नाही असं फार क्वचितच कुठे आढळेल. असाच मराठी थाट आणि रूबाब दाखवणारा हा प्राजक्ताचा लुक तुम्ही नक्की करू शकता. अगदी साधा पण तरीही बाणेदार असा हा अवतार मनात नक्कीच जागा करतो. थेट मनाच्या कोपऱ्यात ही स्टाईल जपली जाते.  

पैठणीतील सौंदर्य

पैठणी ही तर महाराष्ट्राची शान समजली जाते. अशाच निळ्या रंगाच्या पैठणीतील फोटोग्राफर शशांक सानेने टिपलेल्या या छबीमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे. निळ्या आणि हिरव्या रंगाच्या या पैठणीमध्ये अगदी मराठमोळा लुक पारंपरिकता आणि वारसा जपल्याचा हवाला देत आहे. तर तितकेच सुंदर हास्यही टिपले गेले आहे. त्यामुळे प्राजक्ताचा ही पैठणीतील स्टाईल नक्कीच आपल्याला कोणत्याही कार्यक्रमाला असा लुक करता येईल अशीच आहे.  

खणाचा बॅकनॉट ब्लाऊज आणि इरकल साडी

झाकू कशी पाठीवरली... चांदण गोंदणी बाई... बाई चांदण गोंदणी... झाकू नको कमळनबाई, एकांताच्या कोनी रूपखनी अंगावरली, सखे लावण्याची खाणी, लावण्याची खाणी अशी कॅप्शन या फोटोसाठी प्राजक्ताने पोस्ट केली होती आणि यातला शब्दन् शब्द या लुकसाठी खरा ठरतो. इरकल साडी आणि त्यावर खणाचा बॅकनॉट ब्लाऊज ही अफलातून फॅशन आणि स्टाईल प्राजक्ताने इतक्या सुंदररित्या कॅरी केली आहे की, आपल्यालाही असाच लुक करावा असं प्रत्येकीला वाटेल. विक्रांत मुंबईकरने प्राजक्ताची ही अदा अप्रतिम कॅमेऱ्यात कैद केली आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक