DIY सौंदर्य

केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक औषध | Ayurvedic Remedies For Grey Hair In Marathi

Leenal Gawade  |  Mar 17, 2022
केस काळे करण्यासाठी उपाय

केस सिल्की आणि शायनी असावे यासाठी तुम्ही अनेक प्रयत्न  करता. काळेभोर सुंदर केस कोणाला नको असतात. आपले केस काळे राहावे आणि चिरतरुण दिसावे असे प्रत्येकाला वाटते आणि त्यात काहीही वाईट नाही. काही जणांचे केस अकाली पांढरे होतात. केसांना कलर किंवा रंग लावून केस काळे करता येतात. पण केमिकल्सच्या अति वापरामुळे केसांचा पोत, केसांचा रंग आणि केसांची वाढ या सगळ्यांवर परिणाम होऊ शकतो. अशावेळी आयुर्वेद उपचार पद्धती  Ayurvedic Remedies For Grey Hair In Marathi या कामी येतात. म्हणूनच आम्ही केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक औषध आणि केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय निवडले आहेत. यामुळे केस काळे होतात असा दावा केला जातो. केस काळे करणयासाठी नेमके कोणते उपाय करायला हवेत आणि ते नेमके कसे करायला हवेत ते आपण जाणून घेऊया.

Table of Contents

  1. केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक औषधे | Ayurvedic Remedies For Grey Hair
  2. बदाम आणि लिंबाचा हेअर मास्क केस आयुर्वेदिक पद्धतीने काळे करू शकतात
  3. कोरा चहा चे सेवा केस काळे करण्यासाठी उपयुक्त आहे
  4. तिळ हे केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक औषध आहे
  5. तूपाचा मास्क करेल केस काळे करण्यास मदत
  6. दही आणि लिंबू च्या वापराने केस होतात काळे
  7. आवळा पावडर आणि मेथीच्या बिया – केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक औषध
  8. मेथी आणि कॉफी वापरून केस होतील काळे भोर
  9. काळीमिरी आणि लिंबाचा मास्क लावा आणि केस काळे करा
  10. कोरफड आहे केस काळे करण्यासाठी रामबाण उपाय
  11. कांद्याचा हेअर मास्क वापरून केस आयुर्वेदिक पद्धतीने होतील काळे
  12. अश्वगंधा – केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक औषध
  13. दूधी भोपळ्याचा मास्क – Ayurvedic Remedies For Grey Hair In Marathi
  14. भृंगराज हेअर मास्क केस काळे करण्याचा घरगुती उपाय
  15. FAQ’S – केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक औषध

केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक औषधे | Ayurvedic Remedies For Grey Hair

केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय शोधत असाल तर तुम्हाला खालील उपाय नक्कीच मदत करु शकतील. 

कडीपत्ता आणि नारळाचं तेल केस काळे करण्यासाठी आहे फायदेशीर

नारळाचे तेल आणि कडीपत्ता

कडीपत्ता आणि नारळाचं तेल केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक औषध म्हणून वापरले जाऊ शकते . कडीपत्त्याचे फायदे अनेक आहेत. आरोग्यापासून ते सौंदर्यापर्यंत वेगवेगळ्या कारणांसाठी कडीपत्ता आणि नारळाचे तेल हे खूपच फायद्याचे असते. केस काळेभोर राहण्यासाठी कडीपत्ता मदत करते. कडीपत्त्यामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट घटक आणि बीटा केरेटीन असते जे केसांच्या वाढीसाठी, केसांचे गळणे थांबवण्यााठी, स्काल्प स्वच्छ ठेवण्यासाठ आणि केसांचा रंग अबाधित ठेवण्यासाठी फायद्याचे असते. त्यामुळे केसांसाठी तुम्ही कडीपत्ता आणि नारळाचे तेल असे कॉम्बिनेशन वापरायला हवे.

कसे वापरावे –

बदाम आणि लिंबाचा हेअर मास्क केस आयुर्वेदिक पद्धतीने काळे करू शकतात

बदाम आणि लिंबाचा हेअर मास्क

सुक्यामेव्यामधील बदाम हा देखील खूपच फायद्याचा आहे. बदामाचे फायदे अनेक आहेत. त्यामुळेच त्याचा आहारात समावेश केला जातो. पण आरोग्यासोबत बदाम सौंदर्यवर्धक देखील आहे. यामध्ये असलेले ओमेगा 3 आणि 6 केसांच्या वाढीसाठी खूपच चांगले असते. केसांची जोमाने वाढ करण्यासाठी, केसांना सुंदर आणि चमकदार बनवण्यासाठी बदाम हे फायद्याचे असते. म्हणून बदाम आणि लिंबाचा हेअर मास्क केस आयुर्वेदिक पद्धतीने काळे करणासाठी उत्तम आहे.

बदाम आणि लिंबाचा केसांसाठी कसा वापर करायचा ते जाणून घेऊया.

कोरा चहा चे सेवा केस काळे करण्यासाठी उपयुक्त आहे

कोरा चहा

खूप जण कोरा चहा म्हणजेच दूध न घातलेला काळा चहा पितात. काळा चहा पिण्याचे फायदे अनेक आहेत. खूप जण रोज काळा चहा पितात. पण काळा चहा हा केसांसाठी देखील चांगला आहे. अनेक जण काळा चहा केसांना वापरतात. त्यांचा असा दावा आहे की, काळ्या चहाचा उपयोग केल्यामुळे केस काळे होण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्ही अगदी आवर्जुन काळा चहा वापरायला हवा.

वाचा सुंदर आणि मजबूत केसांसाठी सोप्या टीप्स

तिळ हे केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक औषध आहे

तिळ

थंडीत तीळ अगदी आवर्जून खाल्ला जातो. तिळाचे सेवन हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते. तिळाच्या सेवनामुळे शरीरारा उर्जा मिळते. म्हणूनच बरेचदा आहारात तिळाचा समावेश केला जातो. इतकेच नाही तर आपल्या सणांच्या दिवसातही तिळ कधी खाल्ला जावा यासाठी एक ठराविक काळ आहे. तिळाचा उपयोग करुन तेल बनवले जाते. तिळाचे तेल शरीरासाठी फारच फायद्याचे असते. तिळामध्ये व्हिटॅमिन बी 6, खनिजे, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, तांबे, झिंक, फायबर यांसारखे पोषक घटकांचा समावेश आहे
  बाजारात काळ्या तिलाचे खास तेल मिळते. केसांसाठी या तिळाचा उपयोग केल्यामुळे केस काळे होण्यास मदत मिळते. इतकेच नाही तर त्यामुळे केसांची वाढ देखील चांगली होण्यास मदत मिळते. 

तूपाचा मास्क करेल केस काळे करण्यास मदत

तूपाचा मास्क

तूप हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे आपण सगळेच जाणतो. तूपाचा उपयोग करुन अनेक पदार्थ बनवता येतात. पण तूपाचा उपयोग केसांसाठी केला जातो हे तुम्हाला माहीत आहे का? केसांसाठी तूपाचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. साजूक तूप वापरुन केसांचा मसाज केला तर त्यामुळे केस काळे होण्यास मदत मिळते. तूपामध्ये असलेले घटक केसांच्या अनेक समस्या दूर करण्याचे काम करतात. त्यामुळे तुपाचा मास्क किंवा तूप मसाज करुन तुम्ही केसांची काळजी घ्यायला हवी. 

वाचा – दाट केस हवे असतील तर फॉलो करा हे डाएट

दही आणि लिंबू च्या वापराने केस होतात काळे

दही आणि लिंबू

केस काळे राहावे यासाठी दही आणि लिंबू हे देखील खूपच फायद्याचे आहेत. केसांसाठी दही आणि लिंबूचा मास्क तयार केला तर त्यामुळे केसांना काळे राहण्यास मदत मिळते.

आवळा पावडर आणि मेथीच्या बिया – केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक औषध

आवळा पावडर आणि मेथीच्या बिया

आवळा हा केसांसाठी, त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी वरदान आहे. आवळ्याचे फायदे अनेक आहेत. वेगवेगळ्या कारणांसाठी आवळा वापरला जातो. बाजारात आवळ्याची पावडर अगदी सहज  मिळते. इतकेच नाही तर मेथीच्या बिया या देखील खूपच फायद्याच्या असतात.
आवळा पावडर आणि मेथीच्या काही बिया भाजून घ्यावा. एकत्र करुन त्यांची पावडर करावी.
त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून केसांना लावावे. हा मास्क वाळल्यानंतर चांगला धुवून घ्यावा. केसांना योग्य कंडिशनर लावावे त्यामुळे केस चांगले राहण्यास मदत मिळेल.

मेथी आणि कॉफी वापरून केस होतील काळे भोर

मेथी आणि कॉफी

जर तुम्ही केसांना मेंदी लावत असाल तर मेंदी भिजवण्याची योग्य पद्धत  तुम्हाला नक्कीच माहीत असेल. अनेक जण मेंदी नुसती कालवत नाही तर त्यामध्ये केसांना पोषण देणारे घटक घालतात. मेंदीनंतर केस कोरडे होऊ नये यासाठी व्हिटिॅमिन्स कॅप्सुल, दही असे यात घातले जाते. पण केसांना नॅचरल रंग येण्यासाठी तुम्ही त्यात मेंदी घातली तर तुमच्या केसांना एक छान रंग मिळतो.  अनेक संशोधनांती असे सिद्ध झाले आहे की, कॉफी ही केसांसाठी खूपच जास्त फायद्याची असते. कॉफीचे फायदे  अनेक आहेत. कॉफी ही केसांच्या वाढीला चालना देण्याचे काम करते. इतकेच नाही तर त्यामुळे स्काल्प स्वच्छ राहतो. ज्याचा परिणाम केसगळती कमी होते. पण कॉफीचा अतिरेक देखील केसांसाठी चांगला नसतो. त्यामुळे त्याचा वापर जपून करावा. 

वाचा – सुंदर केसांसाठी आयुर्वेदिक टीप्स

काळीमिरी आणि लिंबाचा मास्क लावा आणि केस काळे करा

काळीमिरी आणि लिंबाचा मास्क

गरम मसाल्यातील अत्यंत महत्वाचा आणि तिखट असा घटक म्हणजे काळीमिरी. जराशी काळीमिरी घातली तरी देखील जेवणाची चव बदलते. अशा काळीमिरीचे फायदे अनेक आहेत. त्याचा उपयोग करुन केसांना काळे करण्यासाठी देखील मदत होते. यामध्ये  व्हिटॅमिन A,  व्हिटॅमिन C,  व्हिटॅमिन E,  व्हिटॅमिन K आणि व्हिटॅमिन B 6 चे भरपूर प्रमाण आहे. या विटामिन्सशिवाय यामध्ये रायबोफ्लेविन, थायामिन, पोटॅशियम, सोडियम, फॉलेट, बेटेन आणि नियासिन हे घटक असतात ज्यामुळे काळेमिरी फारच फायद्याची ठरते. केसांसाठी काळेमिरीचा उपयोग हा देखील फायद्याचा आहे. केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक औषध यामध्ये त्याचा समावेश होतो.

कोरफड आहे केस काळे करण्यासाठी रामबाण उपाय

कोरफड

केसांसाठी कोरफड हे वरदान आहे. कोरफडीचे फायदे अनेक आहेत. आरोग्यापासून सौंदर्यापर्यंत कोरफडीचा उपयोग केला जातो.  कोरफडीमध्ये अँटीऑक्सिडंट घटक असतात. जे केसांसाठी आणि त्वचेसाठी फारच फायद्याचे असते. केसांमधील कोंडा कमी करुन त्यांना स्वच्छ ठेवण्याचे काम कोरफड करते. केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक औषध पाहताना कोरफडीचा उपयोग नक्कीच करायला हवा. 

कांद्याचा हेअर मास्क वापरून केस आयुर्वेदिक पद्धतीने होतील काळे

कांद्याचा हेअर मास्क

दररोज जेवणात वापरला जाणारा कांदा केसांसाठी वरदान आहे. केसांसाठी कांद्याचा उपयोग केल्यामुळे केसांची वाढ चांगली होण्यास मदत मिळते. त्यामुळेच हल्ली अनेक ठिकाणी कांद्याचा उपयोग केला जातो. अनेक संशोधनानंतर असे सिद्ध झाले आहे की, कांद्याचा उपयोग केसांसाठी केल्यामुळे पांढरे झालेले केस काळे होण्यास मदत मिळते. कांद्यामध्ये सल्फर असते जे केसांची वाढ होण्यासाठी फायदेशीर असते. या शिवाय यामध्ये असलेले कोलॅजन केसांची वाढ जोमाने करण्यास मदत करतात. केसगळती कमी करतात. आणि केसांचा रंग टिकवून ठेवतात. त्यामुळे पांढरे केसांना काळे करण्यासाठी कांद्याचा उपयोग नक्कीच करायला हवा.

अश्वगंधा – केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक औषध

अश्वगंधा

आयुर्वेदात अश्वगंधाला खूपच जास्त महत्व आहे. अश्वगंधा ही वनस्पती अत्यंत औषधी आहे. तिचा उपयोग अनेक ठिकाणी केला जातो. अश्वंगधाचे फायदे   पाहता त्याचा उपयोग केसांसाठी खूपच चांगला मानला जातो. केसांसाठी अश्वगंधा हे वरदान आहे. अश्वगंधामध्ये अँटिऑक्सिडंट्स, अँटि इन्फ्लेमेटरी, अँटिस्ट्रेस आणि अँटिबॅक्टेरियल गुण अधिक.प्रमाणात असतात. केसांना काळे ठेवण्याचे काम हे मेलनिन करते. मेलनिन अबाधित ठेवण्याचे अश्वगंधा करते. त्यामुळे अकाली पांढऱ्या होणाऱ्य केसांसाठी अश्वगंधा वापरले जाते. त्यामुळे केस चांगले राहण्यास मदत मिळते.

दूधी भोपळ्याचा मास्क – Ayurvedic Remedies For Grey Hair In Marathi

दुधी भोपळ्याचा मास्क

दूधी भोपळा हा देखील खूपच फायद्याचा आहे. दूधी भोपळ्याचा आहारात समावेश केल्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. खूप जण दुधी भोपळ्याचा रस पितात. लाल भोपळ्याचा देखील अनेक ठिकाणी वापर केला जातो. लाल भोपळ्याचे फायदे  अनेक आहेत.
दुधी भोपळ्याचा उपयोग करुन केसांचा मास्क बनवला जातो. 

भृंगराज हेअर मास्क केस काळे करण्याचा घरगुती उपाय

केस काळे करण्याचा घरगुती उपाय

केसांच्या आरोग्यासाठी भृंगराज हे वरदान आहे. भृंगराजचा उपयोग करुन केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.  व्हिटॅमिन ई, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी नी युक्त असलेल्या घटकांमुळे केसांचे पोषण होण्यासाठी मदत मिळते.  केसगळती, कोंडा, केसांची वाढ होण्यासाठी भृगंराज हे फारच फायद्याचे ठरते. म्हणून अनेक केसांच्या प्रॉडक्टमध्ये भृंगराजचा वापर केला जातो.

FAQ’S – केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक औषध

अकाली केळ पांढरे होणे हे सर्वसामान्य आहे का?

 हो, हल्ली अनेक लहान मुलांचे केस देखील पांढरे होतात. त्यामागे त्यांच्या शरीरातील मेलनिन कारणीभूत असते.पूर्वी लहान मुलांमध्ये केस अकाली पांढरे होण्याची समस्या दिसत नव्हती. पण आता खूप लहान मुलांचे डोके एखाद्या वयोवृद्धाप्रमाणे पांढरे झालेले दिसते. त्यामुळे घाबरुन जाण्याचे काहीच कारण नाही. यावर बरेच इलाज देखील उपलब्ध आहेत. 

पांढरे केस पुन्हा काळे होऊ शकतात का?

असा दावा करता येत नाही. पण पुढे होणाऱ्या पांढऱ्या केसांसाठी नक्कीच काही इलाज करता येतात. केस काळे करण्यासाठी डाय किंवा रंग हा उपाय आहे. पण पांढरे केस काळे करण्यासाठी तुम्ही काही आयुर्वेदिक उपाय नक्कीच करु शकता. 

केस पांढरे होण्यापासून थांबवता येते का?

 हो, असे करता येऊ शकते. केस पांढरे लवकर होऊ द्यायचे नसतील तर केसांची योग्य काळजी घेणे खूपच जास्त गरजेचे असते.केसांसाठी आयुर्वेदिक असे पर्याय निवडून तुम्ही केस पांढरे होण्यापासून वाचवू शकता.

हे हि वाचा,

अशी घ्या कलर हेअरची काळजी

केस लवकर वाढवण्यासाठी घरगुती उपाय

Essential Oils To Get Rid Of White Hair In Marathi

Oils For Hair Growth & Tips In Marathi

Read More From DIY सौंदर्य