ADVERTISEMENT
home / Acne
Niacianmide फायदे आणि कसा होतो उपयोग

Niacianmide फायदे आणि कसा होतो उपयोग

आपण नेहमीच त्वचेची काळजी कशी घ्यावी आणि घरगुती उपायांनी आपल्या त्वचेला कसा फायदा होईल याबाबत वाचत असतो आणि ते रोजच्या रूटीनमध्ये करत असतो. पण काही व्हिटॅमीन्स अशी आहेत ज्यांच्या वापराबाबत आणि त्यांचे फायदे आपल्याला माहीत नसतात. अशाच Niacianmide या व्हिटॅमीन आणि गुणकारी घटकांबद्दल सांगत आहेत क्युटीज क्लीनिकच्या सीईओ आणि डर्मेटोलॉजिस्ट अप्रतिम गोयल.

Niacianmide म्हणजे काय ?

Niacianmide याला Nictonamide असेही म्हणतात, जे आहे व्हिटॅमीन B-3. तुमच्या शरीरात याची कमतरता जाणवल्यास त्याला पेलाग्रा असं म्हणतात. ज्यामुळे तुम्हाला डर्मायटीस, डायरिया किंवा डिमेन्शिया होऊ शकतो. मुख्यतः हा एक त्वचेच्या काळजीसाठी आवश्यक असणारा घटक आहे. Niacianmide हा एक उत्तम घटक आहे जो तुमच्या त्वचेच्या सर्व चिंता दूर करेल आणि हा कोणत्याही त्वचा प्रकारासाठी उपयोगी आहे.

ADVERTISEMENT

Shutterstock

Niacianmide आणि त्वचा

हे व्हिटॅमीन पाण्यात सहज विरघळते आणि नैसर्गिक घटकांसोबत तुमच्या चेहऱ्यावरील ओपन पोर्स टाईटन करणे, त्वचा उजळवणे, त्वचेवरील सुरकुत्या दूर करून चेहरा तजेलदार दिसण्यात मदत करते. मुख्यतः चेहऱ्याचं रूपडं पालटायचं असल्यास Niacianmide हे व्हिटॅमीन उपयुक्त आहे.

Niacianmide चे फायदे

Shutterstock

ADVERTISEMENT
  • चेहऱ्यावरील तेलग्रंथीतून अतिरिक्त तेल येत असल्यास हे व्हिटॅमीन ते नियंत्रणात आणते आणि चेहऱ्यावरील मॉईश्चराईजशेनही कायम ठेवते. 
  • चेहऱ्यावरील पोर्सचा आकार कमी करते. 
  • चेहऱ्याची जळजळ, सीबम रेग्युलेशन, चेहऱ्याचा लालसरपणा कमी करण्यात आणि एक्ने कमी करण्यातही हे उपयुक्त आहे. 
  • पिगमेंटेशनसारख्या त्वचा समस्येवरही हे गुणकारी आहे. यातील घटकांमुळे तुमच्या चेहऱ्यावरील डाग कमी होऊन त्वचा उजळण्यास मदत होते. 
  • Niacianmide तुमच्या चेहऱ्याची नैसर्गिक समस्या जसं सूर्यप्रकाश, प्रदूषण आणि विषारी घटकांपासून संरक्षण करते आणि त्वचेत अँटीऑक्सिडंट्स निर्माण करते.

केस कसे धुवावे आणि कसं करावं कंडिशन, जाणून घ्या डॉ.अप्रतिम गोयल यांच्याकडून

आहारातून मिळवा Niacianmide

हे त्वचेला आवश्यक असणारं जीवनसत्त्वं तुम्ही रोजच्या आहारातूनही मिळवू शकता. हे जीवनसत्त्वं यीस्ट, मटण, मासे, दूध. अंडी, हिरव्या पालेभाज्या, बीन्स आणि धान्यात आढळतं. तसंच हे तुम्ही बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या घेतल्यासही शरीराला मिळतं. हे व्हिटॅमीन सप्लीमेंट स्वरूपात घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Lockdown च्या तणावामुळे त्वचेवर होऊ शकतात हे दुष्परिणाम

ADVERTISEMENT

कसं करावा Niacianmide चा वापर

Niacianmide असणारे बहुतेक ब्युटी प्रोडक्ट्स हे सिरमच्या रूपात मिळतात. जे तुम्ही त्वचेवर लावू शकता. म्हणजेच तुमच्या स्कीन रूटीनमध्ये क्लिजींग, टोनिंग आणि मॉश्चराईजिंगसाठी वापरू शकता. पण लक्षात घ्या की, Niacianmide सिरम हे नेहमी मॉईश्चराइजिंगनंतर आणि टोनिंगआधी लावावं,

Shutterstock

काही क्लिंजर्स आणि क्रिम्समध्येही Niacianmide असतं. काही फेसमास्क्स जे पाण्याने धुवून टाकायचे असतात त्यातही हे आढळतं.

ADVERTISEMENT

कोरड्या त्वचेसाठी घरगुती उपाय

Niacianmide चे साईड ईफेक्टस

जर तुम्ही याचा वापर त्वचेवर लावण्यासाठी केल्यास याचे काहीच साईड ईफेक्ट्स आढळून येत नाहीत. Niacianmide हे रेटीनॉल, क्लींडामायसीन, अझेलॅक एसिड सारख्या घटकांसोबत वापरल्यास उत्तम ठरते.

जर तुम्हाला  Niacianmide चा दैनंदिन स्कीन रूटीनमध्ये वापर करायचा असल्यास तुमच्या स्कीन स्पेशलिस्टचा सल्ला नक्की घ्या.

हेही वाचा –

ADVERTISEMENT

तेलकट त्वचा असणाऱ्यांनी अशी घ्यावी काळजी

त्वचेची अशी काळजी घ्याल तर तुमची त्वचा ही राहील छान

जाणून घ्या उन्हाळ्यात कशी घ्याल त्वचेची काळजी

सणासुदीला मिळवायचा असेल चमकदार चेहरा तर करा वाफेचा उपयोग

ADVERTISEMENT
15 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT